Login

निर्भय

निर्भय ती
चिडीचूप शांतता अन काळोखी रात्र होती।
दुनियेत साऱ्या जणू तीच एकमात्र होती।।

रस्ता परि रोजचाच तीही निश्चिन्त होती।
नव्हते ठाऊक तिज की आज काळरात्र होती।।

डाव साधण्यास सज्ज गिधाडांची फौज होती।
डोळ्यात त्या राक्षसांच्या वासनेची लाट होती।।

परि ती न आज अबल, नाही भयभीत होती।
राक्षससंहारक ती दुर्गेचे रूप होती।।

जगास भिडवून डोळे निर्भय ती आज होती।
जाणले तिने आज, तीच तिचा कृष्ण होती।।

कु अभा बोडस