शिवानी -" अगं ... एकटी कसं राहणार तू ?"
श्रावणी -" अगं ... मी परत माझ्या ..."
इतक्यात किरणचा आवाज आला .
किरण -" हाय ..."
ती शिवानीला तिच्या निर्णयाबद्दल सांगणार होती . पण तेंव्हाच किरण आला . मग ती सांगायचं थांबली .
शिवानी -" हाय ...कसा गेला दिवस ?"
किरण -" छान ..."
शिवानी -" आता तुम्ही जा . मला झोपायचं आहे ."
ती दोघांना बोलण्यासाठी वेळ देणार होती . त्यासाठी तिने हे कारण सांगून वेळ मारून नेली . हे इशारा श्रावणी आधीच समजून घेतली होती . त्यासाठी ती म्हणाली .
श्रावणी -"हो ... तू झोप आम्ही संद्याकाळी परत येतो ."
शिवानी -" हो ..."
किरण -" अगं मी तर आताच आलो ."
शिवानी -" आता परत जा . मला झोपू देत ."
ती पांघरून ओढून झोपली . किरण तिला तसाच पहात उभा राहिला .
श्रावणी -" चल . आपण जाऊयात ."
किरण -" हम्म .."
दोघेही गाडीवरून घराकडे निघाले . श्रावणीच्या मनात खूप सारे विचार चालू होते . तिला हे सगळे विचार किरणला सांगावं लागणार होतं . भविष्याबद्दल घेतलेली निर्णय ती किरणला पटवून सांगणार होती .
किरण पार्किंगमधून गाडी काढला . श्रावणी मागच्या सीटवर बसली . काहीवेळात ते अपार्टमेंटच्या खाली पोहचले . श्रावणी गाडीवरून उतरली आणि अपार्टमेंटच्या पायऱ्या चढू लागली . किरणला नवलच वाटलं. त्याला श्रावणीची चिंता होतीच , पण तो तिला समजावून सांगू शकत नव्हता .
श्रावणी दार उघडली आणि किचनमध्ये गेली . काहीवेळाने ती पाण्यानी भरलेल दोन पेले घेऊन . तेवढ्यात किरणही सोफ्यावर बसला होता . त्याला एक पेला देऊन ती सोफ्यावर बसली .
श्रावणी -" चहा घेणार ??"
किरण मान हलवत होकार दिला . ती उठली आणि चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली . तिला त्याच्याशी खूपकाही बोलायचं होत . किरणच्या मनात खूप काही विचार चालू होते . त्याला त्याच्या भविष्याविषयी विचार सतावत होती .
थोड्यावेळात श्रावणी हातात दोन कप घेऊन आली .
श्रावणी -" चहा ..."
तिच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला . चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत तो तिच्या कडून चहाचा कप घेतला .
श्रावणी -" बाल्कनीमध्ये जायचं ?"
किरण -" चालेल ..."
दोघेही हातातले कप घेऊन बाल्कनीकडे निघाले . श्रावणी मनातल्या मनात प्रश्नांचे जाळे विणत होती . किरण बाल्कनीत येऊन चहाचा एक घोट घेतला . श्रावणी मात्र विचारात पडली होती .
श्रावणी - " कसा वाटला चहा ?"
किरण -" मस्त .."
तो तिच्याकडे पाहत म्हणाला . ती मात्र शून्यात पाहत होती . हे पाहून तो म्हणाला .
किरण -" मला माहिती आहे श्रावणी . तू पुढच्या आयुष्याबद्दल विचार करत आहेस ."
तो गंभीर आवाजात म्हणाला . ती अजूनही शांत उभारली होती . बाल्कनीच्या खालील परिसर शांत मनाने पाहत होती . तिच्या मनात खूप सारे विचार चालू होते . त्याच विचारात ती अगदी शांत उभी होती . किरण तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता . त्याच्याही मनात खूप सारे प्रश्न चालू होते .
किरण -" काय विचार करत आहेस ?"
श्रावणी -" काय नाही ... माझ्या भविष्याचा विचार करत आहे ."
किरण -" मग काय ठरवलीस ?"
श्रावणी -" किरण तुला एक विचारु?"
किरण -" हा विचार .."
श्रावणी -" माझ्याबद्दल तू काय विचार करतोस ?'
किरण हे प्रश्न ऐकताच शांत बसला . त्याला हे प्रश्न अनपेक्षित होता .
किरण -" काय??? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ?"
श्रावणी त्याच्याकडे पाहिली .
श्रावणी -" तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत ?"
किरण -" म्हणजे तू ... तू तर फक्त माझी चांगली.. चांगली मैत्रीण आहेस .."
श्रावणी स्मित करत बाल्कनीच्या खाली पाहू लागली.
श्रावणी -" तुला तर खोटं ही बोलता नाही .."
किरण हे ऐकून मान खाली घातला. काही क्षण शांततेत निघाली .
किरण -" श्रावणी .."
श्रावणी -" ह्म्म.."
ती खाली पाहत म्हणाली .
किरण -" मी तुझ्यावर प्रेम करतो ..."
श्रावणी -" माहितीये.."
किरणला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला . पण पुढच्या क्षणी तो सावरला देखील .
किरण -" तुला याबद्दल काही वाटत नाहीये ."
श्रावणी -" यात वाटण्यासारखं काय आहे ? हे तुझ्या मनातील भावना आहेत . फक्त तू ते मांडू शकला नाहीस ."
किरण -" मग ?"
श्रावणी -" मी सध्यातरी फक्त शिवानीचा विचार करत आहे ."
किरण -" म्हणजे ?"
श्रावणी -" शिवानीच्या अखेर श्वास मला ती खुशीत ठेवायचं आहे ."
किरण -" मग? "
श्रावणी -" माझ्यासाठी एक करशील ?"
किरण -" हा सांग ."
श्रावणी -" आपण दोघांनी प्रेमाचा जोडा म्हणून शिवानीसमोर वागूयात का?"
किरण -" का ?"
श्रावणी -" शिवानीची शेवटची इच्छा म्हणून आपण हे पूर्ण करूयात ."
किरण -" आणि नंतर . ती गेल्यावर ?"
श्रावणी शांत झाली .
किरण -" सांग ना."
श्रावणी -" त्यानंतर आपण आपल्या रस्त्यावर जाण्यासाठी मोकळे होऊ ."
किरणला हे ऐकून थोडसं वाईट वाटलं . पण तो चेहऱ्यावरून दाखवून दिला नाही .
बाल्कनीतून मंद हवेची झुळूक श्रावणीच्या केसातून वाहू लागली . तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होती . तिच्या कोमल हातांच्या बोटांनी ती केस मागे घेऊ लागली . हे सर्व प्रसंग किरण पाहत होता . पण यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके वाढली नाही . कारण काही क्षणापूर्वी संवादच अशी झाली होती .
अखेर श्रावणी म्हणाली .
श्रावणी -" चहा संपला .."
किरण -" अहह .."
श्रावणी -" चहा संपला का?"
ती अजून एकदा विचारली .
किरण -" हो ..."
त्याच्या हातातून कप घेऊन श्रावणी किचनमध्ये गेली. किरणला वाईट वाटलं की त्याच्या प्रेमाच्या भावनेचा उपयोग श्रावणी शिवानीचा शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी करणार होती.
काहीवेळाने श्रावणी किचनमधून आली . तिच्या हातात शिवानीसाठी डब्बा होता .
श्रावणी -" निघायचं ? शिवानीला भूक लागली असेल."
किरण फक्त मान हलवला . दोघेही अपर्टमेंटच्या खाली पोहचले . किरण गाडी काढला . श्रावणी मागच्या सीटवर बसली आणि दोघे हॉस्पिटलला निघाले . किरणच्या मनात फक्त त्याच्या भावनेबद्दलची विचार चालू होते .
गाडी हॉस्पिटलच्या खाली थांबली . श्रावणी मागच्या सीटवरून उतरली . दोघेही हॉस्पिटलमध्ये शिरले . श्रावणी पुढे होती . शिवानीच्या बेडजवळ पोहचली . शिवानी झोपलेली होती .
श्रावणी -" शिवानी ... शिवानी उठ .."
शिवानी आवाज ऐकताच हळू डोळे उघडली. समोर श्रावणी हातात पिशवी घेऊन उभी होती आणि थोड्या अंतरावर किरण उभा होता .
शिवानी -" अरे तुम्ही आलात ?"
ती वेळ न घालवता उठून बसली.
शिवानी -" बस की .. "
ती श्रावणीला बेडवर बसवली .
शिवानी -" मग काय ठरवलीस ?"
श्रावणी -" कशाबद्दल ?"
शिवानी -" तुमच्या दोघांच्या भविष्याबद्दल ?"
ती दोघांकडे पाहत म्हणाली.
श्रावणी -" आधी तू काहीतरी खाऊन घे ."
शिवानी -" नाही ... तुम्ही आधी सांगा ."
श्रावणी आधी शांत झाली . नंतर लाजत म्हणाली .
श्रावणी -" आम्ही दोघेही एकत्र राहणार आहोत ."
हे ऐकून किरण ही स्मित केला. त्याला माहिती होतं की हे सर्व नाटक आहे .पण शिवानीसमोर हे करावं लागणार होतं .
श्रावणी -" आम्ही आता प्रेमाचा जोडपं झालो आहोत ."
शिवानी -" अरे व्हा .. "
असं म्हणत ती श्रावणीच्या गळ्यात पडली .
शिवानी -" मी आज खुप खुश आहे . किरण इकडं ये श्रावणीच्या बाजूला थांब ."
किरण श्रावणीच्या बाजूला येऊन थांबला . शिवानी दोघांवरून हात फिरवून बोटे मोडली .
शिवानी -" कुणाची नजर लागु नये . बया.."
श्रावणी लाजली . पण हेही नाटक होतं .
श्रावणी -" झालं आता तुझं ? खाऊन घे आता .."
शिवानी -" हो.."
किरण फक्त स्मित करत होता. पण आतून तो खूप तुटलेला होता .
किरण -" मी आलोच .."
किरण मागे फिरला . बाहेरच्या दाराकडे जाऊ लागला . जाताना मात्र त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावरून खाली येत होते . त्याला हे नाटक अजुन काही दिवस चालू ठेवायची होती . शिवानीच्या शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला हे करावंच लागणार होतं .
***********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
मला माहिती आहे की हा भाग येण्यासाठी खुप खूप वेळ लागला . पण माझ्या व्यस्त दिनक्रमामध्ये मला वेळच भेटत नव्हता. ही कथा तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे काही भाग वाचावं लागेल . त्याबद्दल क्षमस्व ..
पुढील भाग लवकरच ... हा भाग कसा वाटला नक्की कळवा ... धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा