Login

मन उधाण वाऱ्याचे भाग - 23

Shivani , shravni and kiran are going to experience their important time .

      तो त्याचा फोन नंबर दिला . किरण नंबर घेतला आणि गडाच्या पायथ्याशी आला . त्याच्या सोबत श्रावणी आणि शिवानीही आले . 

किरण -" चालायचं ."

शिवानी -" हो .."

श्रावणी -" हो .."

     श्रावणी जरा घाबरतच म्हणाली . किरण बॅग काढला आणि त्यातून मोठीशी बॅटरी काढला . 

किरण -" तुम्ही माझ्या मागे या आणि दुसरीकडे चुकूनही पाय ठेऊ नका ."

       दोघीही हो म्हणल्या . थंडी तर होतीच आणि 

आजूबाजूला धुकेही पसरलेल होत . किरण बॅटरीच्या  प्रकाशामध्ये मार्ग काढत चढू लागला . त्याच्या मागे शिवानी त्याच्या पाउलांवर पाय ठेवत होती आणि तिच्या मागे श्रावणी चढत होती . एवढ्यात तिला मागे असलेली झुडुपात हालचाल जाणवली . झाडे हलण्याचा आवाज हि आला .

श्रावणी - " किरण .... मला वाटत माझ्या मागे काहीतरी आहे ."

किरण मागे पाहत म्हणाला .

किरण -" काय आहे ?"

    असं म्हणत तो बॅटरीचा प्रकाश तिच्या मागे असलेल्या झुडुपात मारला . 

किरण -" इथे काहीच नाहीये . "

श्रावणी -" पण मला आवाज आला होता . "

किरण -" अगं इथे काहीही असू शकत . डुकर , कुत्रा वैगरे ... चिंता नको करुस . चल "

श्रावणी -" पण तू माझ्या मागे येशील ."

किरण -" ठीक आहे . पण पुढे पायवाट सापडत नसेल तर मला लगेच सांगायचं ."

श्रावणी -" ठीक आहे ."

      किरण दोघींच्या मागे आला . दोघींच्या पुढे प्रकाश पाडत तो चढू लागला . त्या रात्रीत किड्यांचा आवाज , बॅटरीच्या प्रकाशात दिसणारे किडे , थंडी अजून थोडी वाढलेली होती . इतक्यात श्रावणी थांबली .

शिवानी -" काय झालं श्रावणी ?"

किरण -" आता काय झालं ?"

श्रावणी -" मला भीती वाटतंय किरण ."

शिवानी -" अगं अंधार आहे . भीती तर वाटणारच . आपण फक्त चालत राहायचं ."

किरण -" एक मिनिट शिवानी . तू बॅटरी पकड ."

      असं म्हणत तो पाठीवरील बॅग खाली ठेवला आणि बॅगेत हात घातला .

शिवानी -" काय झालं ?"

किरण - " एक मिनिट .."

     तो बॅगेतून स्पीकर काढला . दिसायला लहान आणि हातात मावणारा स्पीकर तो पुढे केला. खिशातून मोबाइल काढला आणि त्या स्पीकरला ब्लूटूथ नी जोडला . मोबाइलमधून गाणे लावला . त्या शांत वातावरणात गाण्याचं अनुभव अगदी उत्तमरीत्या घेता येत होत . 

किरण -" आता तुला भीती नाही वाटणार ."

      त्या गाण्यामुळे शांतता दूर होत होती . त्यामुळे श्रावणीला आता भीती वाटत नव्हतं . शिवानी अगदी गाणं गुणगुणत चढत होती . किरणही अगदी मजेत चढत होता . काहीवेळाने गडाचे मोठे पायऱ्या दिसू लागले. 

किरण -" आता येईल बघा गड ."

      खूप वेळ चालत असल्याने थंडीतही तिघांना घाम सुटलं होत . बघता बघता गडाच प्रवेशद्वार आलं . बॅटरीच्या प्रकाशाने पूर्ण प्रवेशद्वार दिसत होत . गडाच्या भिंतीवर काही प्रेमाचे जोडे निशाणी सोडलेले होते . दिल असलेलं चिन्ह आणि त्यात त्या प्रेयसी आणि प्रियकराचे पहिले अक्षर दडलेलं होत . त्या दिलमधून बाण आरपार जात असलेलं चिन्ह त्या भिंतीवर कोरलेलं होत .

किरण -" छत्रपती शिवाजी महारांजाच्या या गडाची अवस्था आधीच ठीक नाहीये आणि त्यात यांची भर .."

तो निराश होऊन म्हणाला .

शिवानी -" एक मिनिट ."

असं म्हणत ती बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि त्या प्रेमाच्या चिन्हावर घातली . 

श्रावणी -" छान केलीस ..."

किरणही स्मित करत पाहत होता .

किरण -" चला पुढे ."

    प्रवेशदारातून  ते आत आले . आतही झाडेझुडपे होते . त्यामुळे गड अगदी वाईट स्थितीत असल्याचं जाणवलं . आकाशात चांदण्याचा पाऊस पडला होता . 

       किरण थोडीशी मोकळी जागा पाहिला आणि पाठीवरील बॅग खाली ठेवला . बॅगेतून छोटीशी बॅटरी काढला आणि दोघींकडे पाहत म्हणाला .

किरण -" तुम्ही मोठी बॅटरी घ्या आणि इथेच बसा . मी लाकडं शोधून येतो ."

श्रावणी -" एकटाच ??"

किरण -" हो ... मला सवय आहे याची ."

शिवानी -" काळजी घे ..."

किरण -" तुम्हीही काळजी घ्या . मी आलोच ."

      श्रावणी आणि शिवानी वरच्या चांदण्याकडे पहात होते . शिवानी गडाच्या कडेला हळूच जाऊ लागली . श्रावणी तिला बघताच म्हणाली .

श्रावणी -" अगं काय करायलीस ? "

शिवानी पुढचे दृश्य बघताच म्हणाली . 

शिवानी -" अगं श्रावणी इकडे ये ."

ती गडाच्या कडेला येत म्हणाली .

      श्रावणी घाबरतच तिच्याजवळ गेली . पुढचं दृश्य पाहताच दोघींचे डोळे चमकू लागले . त्या उंच गडाच्या कडेला उभे राहून ते खाली असलेल्या गावाकडे पाहत होते . प्रत्येक घरातील प्रकाश अगदी स्पष्टपणे दिसत होत . अगदी पूर्ण गाव प्रकाशाने उजळत होत आणि त्यात हलकीशी धुकेच चादर हि गावामध्ये पसरलेलं होत . अगदी मनाला समाधान देणारी दृश्य वरून दिसत होतं . 

      स्पीकर वाजू लागलं होत . ' कल हो ना हो ' हे गाणं वाजू लागलं . त्या परिस्थितीत हे गाणं अगदी मनाला समाधान वाटून देणार होतं . त्याचे बोल अगदी त्या ट्रेकिंगला अनुसरून वाटू लागलं .

       शिवानी आणि श्रावणी गडाच्या कडेला बसले . दोघांमध्ये बॅटरीचा प्रकाश पडत होता . शिवानीच्या गालावरून अश्रू मार्ग काढत खाली येऊ लागले . तिचे डोळे ओले झाले . श्रावणी दृश्य पाहण्यात मग्न होती . शिवानीला काही म्हणण्यासाठी ती तिच्याकडे पाहिली तर तिला तिचे अश्रू दिसले .

श्रावणी -" शिवानी ... काय झालं ?"

    ती शांतपणे पुढे पाहत होती . श्रावणी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली .

श्रावणी -" शिवानी ... काय झालं ?"

शिवानी अखेर बोलती झाली .

शिवानी -" जीवन पण कसं असत ना ? कधी दुःख असत कधी सुख असत . काही घटना मनाने घडतात , काही घटना नको असून घडून जातात आणि अखेर कोणतीही आशा न बाळगता जगावं लागतं . "

श्रावणी -" पण झालं तरी काय ?"

शिवानी -" श्रावणी .... मी आयुष्य हरले ."

     श्रावणीला याच अर्थ माहिती होतं . पण तिला शिवानीच्या तोंडून ऐकायचं होत . 

श्रावणी -" म्हणजे ?? हारलीस म्हणजे ??"

    शिवानी लगेचच सावरली . तिला तिच्या ब्रेन ट्युमर बद्दल सांगायचं नव्हतं . म्हणून ती वेगळं विषय काढली.

शिवानी -" म्हणजे प्रेम हा भाग माझ्या आयुष्यात नाहीये ."

श्रावणीला काहीच कळतं नव्हतं . 

श्रावणी -" तुझं कुणावर प्रेम होत ?"

शिवानी फक्त मान हलवत होकार दिली . 

श्रावणी -" कुणावर ?"

शिवानी -" किरण .."

श्रावणी -" काय ???"

शिवानी -" हो ..."

श्रावणी -" मग तू त्याला सांगितली नाहीस ?"

शिवानी खालच्या दृश्याकडे पाहत म्हणाली .

शिवानी -" फक्त सांगितलीच नाही . प्रपोज केले होते ."

श्रावणी -" मग ?"

शिवानी -" तो माझ्या प्रेमाला नकार दिला ."

श्रावणी -" का ?"

शिवानी -" तो मला त्या नजरेने कधी पाहिलाच नाही . पण मी जेंव्हा त्याला विचारले कि तू कुणावर प्रेम करतोस का ? "

श्रावणी -" तो काय म्हणाला ."

शिवानी -" तो काही म्हणलाच नाही . तो शांत झाला . म्हणजे तो कुणावर तरी प्रेम करत आहे ."

श्रावणी विचारात पडली . 

श्रावणी -" कुणावर करत असेल ?"

शिवानी इतक्यात म्हणाली . 

शिवानी -" तुझ्यावर श्रावणी .."

श्रावणी -" काय ?????"

श्रावणी चकित झालेली होती . 

श्रावणी -" तो तुला सांगितला ?"

शिवानी -" नाही ..."

श्रावणी -" मग तुला कसं कळालं ?"

शिवानी -" मी त्याच्यासोबत ऑफिसला असताना तो नेहमी तुझ्या विषयी सांगत होता . श्रावणी असं करत होती .. तसं करत होती ..तो तुझ्यावरच प्रेम करत आहे . आता तूच पाहा ना कोण मैत्रिणीला एवढं मदत करत का ?"

       हे ऐकून श्रावणी गोंधळात पडली . शिवानी या दोघांना एक करू पाहत होती . तिच्याजवळ खूप कमी आयुष्य राहिलेलं होत . निदान यात ती किरणला प्रेम मिळवण्यात मदत करणार होती . स्पीकर वर गाणे अजून सुरूच होतं . इतक्यात किरण लाकडं घेऊन आला .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

हा भाग उशिरा आला या बद्दल क्षमा मागतो .पूढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की कळवा .कंमेंट करा , तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद