Login

मन उधाण वाऱ्याचे भाग - 27

Kiran is about to tell the feeling of him to Shravni .

     ती स्मित करत म्हणाली. खूप झोप लागल्याने शिवानी डोळे बंद केली . श्रावणी हळुवारपणे तिच्या डोक्यावर थोपटत होती. आयुष्यात कधीही आईची माया शिवानी अनुभवली नव्हती. आता ती आईची माया अनुभवत होती. 

      अगदी गाढ झोपेत ती श्रावणीच्या मांडीवर झोपली होती . ट्रेन वेगाने धावत होती . किरण खिडकीला डोकं ठेवून झोपला होता. श्रावणी मात्र खिडकीतून बाहेर पाहत विचार करत होती .पुढच्या आयुष्याचा विचार तिला करावं लागणार होतं . शिवानी जगातून सोडून गेल्यावर तिला दुःख पचवायला वेळ लागणार होतं. ती परत घरी जाणार नव्हती . याचं पुढचं आयुष्य तिला एकटीच जगावं लागणार होतं. शिवानीच्या म्हणण्यावरून ती किरणला त्याच्या मनातील भावना विषयी विचारणार होती. पण त्यासाठी योग्य वेळ अजून आलेली नव्हती .

     दुपार होत आलेली होती. श्रावणी मागे डोकं ठेवून झोपली होती. शिवानी तिला उठवत म्हणाली.

शिवानी -" श्रावणी .. अगं श्रावणी उठ... सांगली आलं."

     सांगली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबली होती. शिवानी श्रावणीला उठवत होती . किरण बॅग्स घेऊन उभा होता. श्रावणी डोळे उघडली. 

श्रावणी -" सांगली आलं??"

शिवानी -" हो ... आणि चल लवकर ."

श्रावणी आळस देत उठली. 

श्रावणी -" चला..."

     तिघेही प्लेटफॉर्मवर आले. गर्दीतुन मार्ग काढत ते स्टेशनच्या बाहेर आले. बाहेर उभे असलेल्या रिक्षात ते तिघे बसले आणि घरी निघाले.

     थोड्यावेळाने तिघे शिवानीच्या घरात पोहचले. तिघांना भूक लागलेली होती.

शिवानी -" मला खूप भूक लागलीय."

श्रावणी -" मला पण.... थांब काहीतरी बनवते . " 

किरण -" अगं कशाला त्रास करून घेतेस ? मागवूयात की बाहेरून काहीतरी ..."

श्रावणी -" मी बनवते ना ?"

शिवानी -" अगं राहुदेत ... तो मागवेल. तू बस बघू.."

     किरण मोबाइल काढला आणि दुपारच्या जेवणासाठी तिघांना काहीतरी मागवून घेतला. तिघे आता निवांत झाले होते . वेळ मारण्यासाठी ते नाइट ट्रेकिंग बद्दल गप्पा मारू लागले.

      काहीवेळात ऑर्डर केलेलं जेवण घरी आलं . वेळ न घालवता श्रावणीने जेवण ताटात वाढून आणली . खूप भूक लागल्याने ते जेवायला सुरुवात केले. जेवताना त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हतं . जेवण आटप्ल्यानंतर श्रावणी शिवानीला गोळी दिली . गोळीच्या गुंगीमुळे तिला आणखी झोप येऊ लागलं. मोठ्याने जांभई देत ती म्हणाली .

शिवानी -" मी जरा आडवी होते. " 

    ती बेडवर आडवी झाली आणि काही मिनिटाने तिचा डोळा लागला.

     किरण आणि श्रावणी मात्र शांत होते . श्रावणीला मनातली शंका दूर करायची होती , पण कसं करायचं हे तिला कळत नव्हतं. बघता बघता सूर्य मावळतीला आला होता. किरण गॅलरी कडे गेला आणि सूर्याला पाहू लागला . श्रावणी हीच संधी साधून त्याच्याजवळ गेली.

किरण विचार करत उभा होता.

श्रावणी -" काय झालं ?? एवढं विचार करतोयस?"

    किरण शांतपणे त्या आकाशाकडे पाहत उभा होता . नारंगी पिवळसर आकाश अगदी मनाला शांत देणारी होती. 

श्रावणी -" किरण.."

ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. 

श्रावणी -" काय झालं?"

किरण - " विचार करतोय ."

श्रावणी -" कशाचा ?"

किरण -" शिवानीबद्दल विचार करत होतो."

श्रावणी -" कसला विचार करतोय ?"

किरण -" ती अनाथ म्हणून जन्माला आली . स्वतःच्या मेहनतीने शिकून नौकरी ला लागली. पण अचानक तिच्या आयुष्यात असलं आजार आलं. आयुष्यात कधी न हारणारी आज ती एक आजारामुळे आयुष्य हारत आहे."

श्रावणी -" तिच्या मेहनतीला रंग मिळायला हवं?"

किरण -" आपण काय करू शकतो ? आपल्या हातात आता काहीही उरलेलं नाही ."

श्रावणी -" पण आता विचार तर करावं लागेल ना ."

किरण -" एवढ्या कमी वेळात काय करू शकतो?"

     दोघेही अचानक शांत झाले. वातावरण शांत वाटत असली , तरी मनामध्ये खूप गोंधळ चालू होती. 

श्रावणी -" तुझ्या आणि शिवानी मध्ये मैत्री कशी झाली?"

किरण शुन्यात नजर टाकून म्हणाला.

किरण -" आम्ही दोघे ऑफिसमध्ये एकत्र काम करत होतो . अशीच कामामध्ये ओळख झाली . त्यानंतर आम्ही मित्रमैत्रिणी झालो आणि .."

श्रावणी -" आणि ?"

किरण - " ती मला तिची माझ्यावर असणारी प्रेमाची कबुली दिली . पण माझ्या मनात असं काही नव्हतंच आणि .."

श्रावणी - " आणि तुला आधीच कुणावर तरी प्रेम  होतं ."

तो फक्त मान हलवत होकार दिला.

श्रावणी -" मग तू तिला प्रेमाची कबुली का नाही दिलास ?"

श्रावणीला त्याच्या मनातील सर्वकाही जाणून घ्यायचं होतं.

किरण -" तशी वेळच नाही आली कधी . कबुली द्यावी म्हणलं की माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होत होती ."

     श्रावणीला ठाऊक होतं की तो तिच्याबद्दलच बोलत आहे . आज ती सर्वकाही जाणून घेणारच होती . 

श्रावणी -" कसली भीती ?"

किरण -" आमची मैत्री तुटेल याची भीती वाटत होती ."

श्रावणी -" पण याची भीती बाळगून तू मनाला का मारत आहेस ?"

किरण -" तिच्यामुळेच ... तिच्याशी मैत्रीची संबंध तरी राहील ."

श्रावणी -" बरं... ते जाऊदेत . तू मला नाही सांगणार का ? कोण आहे ती मुलगी ?"

    आता किरण फसला होता . त्याला उत्तर देणं अनिवार्य होऊ लागलं . 

किरण -" तीच नाव ऐकून तू काय करणार आहेस ?"

श्रावणी -" प्रयत्न .."

किरण -" कसला प्रयत्न ?"

श्रावणी -" तुला प्रेम मिळवण्यात तुझी मदत करू शकते . म्हणजे प्रयत्न तर करू शकते ."

    किरणला आता कोणताही पर्याय उरला नव्हता . त्याला उत्तर न देता जाता येत नव्हतं . एकदा कारण सांगून वेळ मारून नेला होता . पण सारख हे करणं शंका निर्माण करणारी होती. अखेर तिला त्याच्या मनातील भावना तो सांगणार होता . हे सांगताना सुद्धा त्याच हृदय जोराने धडधडत होत . त्याच शरीर थरथर कापत होत .पण तो मन घट्ट करून म्हणाला .

किरण -" मी जिच्यावर प्रेम करतो . तीच नाव आहे ...."

श्रावणी अगदी कान लावून ऐकू लागली .

किरण -" तीच नाव आहे......."

     अचानक बेडरूममधून शिवानीचा आवाज आला . त्या आवाजामुळे दोघे दचकले. आवाज ऐकताच दोघे पळतच तिच्या बेडरूमकडे निघाले . तिचा आवाज अजूनही येत होता . 

    बेडरूममध्ये पोहचताच त्यांना दिसलं की शिवानी डोक्याला हात लावून किंचाळत होती .तिच्या आवाजामुळे तिच्या डोके दुखीचा अंदाज घेता येत होता . श्रावणी तिच्याजवळ गेली आणि तिला सांभाळत म्हणाली .

श्रावणी -" काय झालं शिवानी ?"

    ती तशीच किंचाळत होती . तिच्या आवाजामुळे दोघांचं काळीज चर्र करत होत. 

श्रावणी -" किरण .. आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल ."

भीतीपोटी तिचा आवाजही भीतीदायक वाटत होता .

किरण -" हो ... "

     वेळ न घालवता किरण गाडीचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला . श्रावणी शिवानीला सांभाळत होती . शिवानीच किंचाळण अजून बंद होत नव्हता. किरण गाडी घेऊन लगेच आला . श्रावणी शिवानीला घेऊन घराच्या बाहेर आली . मागच्या सीटवर श्रावणी शिवानीला बसवलं आणि तिच्या बाजूला ती बसली .

    गाडी हॉस्पिटलकडे निघाली . गाडीतही तिचा आवाज कमी होत नव्हता . किरण जमेल तितक्या वेगाने गाडी चालवत होता. 

     काहीवेळाने गाडी हॉस्पिटलला पोहचली. श्रावणी वेळ न घालवता शिवानीला घेऊन डॉक्टरकडे नेऊ लागली. किरणही गाडी लावून पळतच त्यांच्याजवळ गेला . डॉक्टरला माहिती पडताच ते कॅबिनमधून बाहेर आले . शिवानीला घेऊन डॉक्टर आपत्कालीन कक्षात नेले. श्रावणी आणि किरण दोघे बाहेर उभे होते . आतून किंचाळण्याचा आवाज अजूनही येत होता. हळू हळू आवाज नाहीशी होऊ लागली आणि नंतर बंद झाली . काहीवेळाने डॉक्टर बाहेर आले .

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यासाठी स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all