काहीवेळाने श्रावणी शांत झाली . किरण तसाच शांत उभा होता .
शिवानी -" श्रावणी ..."
श्रावणी डोळे पुसत म्हणाली .
श्रावणी -" काय?"
शिवानी -" मला खूप भूक लागलीय .."
छोट्या मुलांसारखं केविलवाण्या सुरात शिवानी म्हणाली . हे वाक्य ऐकताच श्रावणीला हसू पुटल . किरणही स्मित केला .
श्रावणी -" मी विसरलेच... मी एक काम करते . मी घरी जाते आणि स्वयंपाक करून लगेच डब्बा आणते . "
किरण -" अगं बाहेरून मागवूयात ना ?"
शिवानी -" हा अगं. तू कशाला त्रास करून घेतेस ?"
श्रावणी -" नको ... मी माझ्या हातानेच तुला खाऊ घालीन ."
शिवानीचा हसरा चेहरा पाहून श्रावणीला समाधान वाटत होतं .
श्रावणी -" किरण.. तू इथेच शिवानी सोबत राहा . मी घरून डब्बा करून घेऊन येते ."
शिवानी - " पण लवकर येशील ना?"
श्रावणी -" हो बाबा... येईन लवकर ."
शिवानीला मिठी मारत ती म्हणाली . वेळ न घालवता ती घराकडे निघाली . किरण तिथेच शिवानीजवळ बसला .
श्रावणी रिक्षातून अपार्टमेंटच्या खाली पोहचली . कुठूनतरी ' राम राम सत्य है .' असे घोष वाक्य ऐकू येत होत्या . अपार्टमेंटच्या खालून कुणाचीतरी अंत्ययात्रा निघत होती . वर्दळ जास्त नव्हती . पाच ते दहा जणच त्या अंत्ययात्रेत सहभाग होते . श्रावणीला कळत नव्हतं की अंत्ययात्रा कुणाची आहे ?
बाजूचं एक महिला त्या अंत्ययात्रेकडे पाहत होती . श्रावणी त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली .
श्रावणी -" अंत्ययात्रा कुणाची आहे ?"
ती - " ती बाजूच्या अपार्टमेंट मधील सरिताची आहे ."
हे ऐकताच तिला धक्काच बसला . ती गार्डनमध्ये तिच्यासोबतच गप्पा मारायची . वयाच्या 57 वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला .
हि तीच सरिता होती , जिचा नवरा दारूच्या नशेत बुडून गेला होता . हि तीच सरिता होती , जिचा नवरा दुसऱ्या बाईसोबत पळून गेला होता.हि तीच सरिता होती , जी मुलांना शिकवली , वाढवली आणि ते शिकून बाहेरच्या देशात स्थिरावले . हि मात्र एकटीच इथे राहत होती. अचानक हि खबर ऐकून श्रावणीच मन अगदी मौन झालं होतं.
उरलेलं आयुष्य एकटी घालवलेली सरिता वारंवार तिच्या नजरेसमोर येत होती. तिने सुद्धा बाकीचं आयुष्य एकटी घालवणार होती . पण सरिता अचानक गेल्यामुळे तिचा हा निर्णय तिलाच विचारात घालवणारी होती .ती विचार करत करत अपार्टमेंटच्या पायऱ्या चढत होती . तिला तिच्या आयुष्याचा विचार करावं लागणार होतं. तिच्या कडे दोन पर्याय उरले होते . एक म्हणजे ती परत तिच्या नवऱ्याकडे जावं आणि उरलेलं आयुष्य घालावं . दुसरा पर्याय म्हणजे एकटीने आयुष्य काढावं . एकटी आयुष्य जगणं हे सोपं काम नव्हतं . तिला भीती वाटू लागलं कि तीच आयुष्य सरिता सारखं गेलं तर . तीच एकटेपणा दूर करणारी एकटीच होती . ती म्हणजे शिवानी . पण शिवानीजवळ कमी वेळ उरला होता . ती जग सोडून गेल्यावर काय करायचं ? कसं जगायचं ? कुठे जायचं ? अशे कित्येक प्रश्न तिच्या मनात येत होते .या प्रश्नावर विचार करत असताना ती स्वयंपाक करू लागली . पण स्वयंपाक करत असताना तिला हे प्रश्न सतावत होते . तिला सरिताच आयुष्य आठवून रडू कोसळत होतं , पण ती स्वतःला सावरत होती . ती सरिताच्या जागी स्वतःला ठेवून विचार करत होती .
------------------------------------------------------
किरण शिवानीच्या जवळ बसला होता . पण दोघांमध्ये एक वेगळीच शांततेचा वातावरण निर्माण झाला होता . किरणला खूप काही बोलायचं होतं . पण कुठून सुरुवात करायचं हे त्याला कळत नव्हतं . अखेर तो म्हणाला .
किरण -" शिवानी .."
शिवानी -" हम्म ..."
ती त्याच्याकडे पाहत म्हणाली .
किरण -" खरं सांगू ??"
शिवानी -" हा सांग ..."
किरण -" तुझ्या डोक्यावर एकही केस नाहीये . पण तरीसुद्धा तू खूप सुंदर दिसत आहेस ."
शिवानी जरा लाजत म्हणाली .
शिवानी -" थँक्स ."
किरण -" आणि ..."
शिवानी -" आणि ???"
किरण -" सॉरी .."
शिवानी -" सॉरी का ?"
किरण -" तू जेंव्हा माझ्याजवळ प्रेमाची कबुली दिली . तेंव्हा माझ्या नकारामुळे तुला वाईट वाटला असेल . त्याबद्दल सॉरी ."
शिवानी हलकीशी स्मित करत होती . काही क्षण परत शांततेत गेलं .
किरण -" काय झालं ? बोल ना ."
शिवानी -" तू जेंव्हा मला नकार दिलंस . तेंव्हा माझ्या हृदयाचे तुकडे झाले होते . त्या रात्री खूप रडले होते आणि ..."
किरण -" आणि ??"
शिवानी -" आणि त्या रात्रीच मला कॅन्सरचा पहिला अटॅक आला होता ."
हे ऐकताच त्याला धक्का बसला . तो तिचा हात धरला .
किरण -" आय एम रिअली सॉरी शिवानी .."
शिवानी -" राहूदे रे . आता नशिबात प्रेम नसल्यावर काय करणार .."
किरण -" सॉरी यार .."
शिवानी -" पण तू मला सांगितला नाहीस ."
किरण -" काय ?"
शिवानी -" तू कुणावर प्रेम करतोस ?"
किरण -" मी ??"
शिवानी -" हा तूच .."
किरण गप्प झाला .
शिवानी -" सांग ना .."
किरण -" म्हणजे आहे एक मुलगी . पण तिला मी कधी सांगितलं नाही ."
शिवानी -" ती मुलगी श्रावणी आहे ना ?"
हे ऐकताच किरण आश्चर्याने तिच्याकडे पाहिला .
किरण -" तुला कसं कळालं ?"
शिवानी -" तू ज्या प्रमाणे तिला स्टेशन पासून आणला . तिची सगळी व्यवस्था केला आणि ज्याप्रमाणे तू तिच्या व्यवस्थासाठी माझ्याकडे आला . तेंव्हाच मला कळालं ."
किरण -" पण तीच तर लग्न झालाय ना ?"
शिवानी -" पण ती खुश नाहीये ना ?"
किरण -" मग ??"
शिवानी -" तू तिला तुझ्या भावना बद्दल का नाही सांगत ?"
किरण -" ती नाही म्हणली तर .."
शिवानी -" ती हो म्हणली तर .."
किरण विचारात पडला .
शिवानी -" अरे जास्त विचार करू नकोस . तू एकदा मनातलं बोलून टाक . तिच्या मनात हि तुझ्याबद्दल भावना आहेत ."
किरण -" तुला कसं कळालं ?"
शिवानी -" एक मुलगीच दुसऱ्या मुलीच्या मनातील भावना ओळखू शकते आणि .."
किरण -" आणि ??"
शिवानी -" आणि हि माझी शेवटची इच्छा म्हणून समझ . मी गेल्यावर तीच काय होईल ? ती परत तिच्या नवऱ्या कडे जाईल आणि परत तो तिला त्रास द्यायला सुरुवात करेल . त्यापेक्षा तुम्ही दोघे सुखात राहा .मारण्याच्या आधी मला तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं आहे ."
तीच हे बोलणं ऐकून तो शांत झाला . ती त्याच्या हाताला धरली .
शिवानी -" तू करशील ना माझी शेवटची इच्छा पूर्ण ??"
तो मान हलवत होकार दर्शवला . शिवानीला समाधान वाटलं . किरणला त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी मनातल्या मनात घाबरत होता . पण शिवानीची शेवटची इच्छा म्हणून त्याला हे करावं लागणार होतं .
------------------------------------------------------------
श्रावणी डब्बा भरून घरातून निघाली होती . पण तिच्या मनात प्रश्नाचे जाळे निर्माण झाले होते . तीच लक्ष पूर्ण त्या विचारात हरपून गेलं होतं . एक मन तिला सांगत होत कि ' तू जा तुझ्या घरी . तुझा नवरा जे करेल ते तुझ्या नशिबात मांडून ठेवलाय , नाहीतर तुझं आयुष्य सरिता सारखं होऊन बसेल .' दुसरं मन सांगत होत कि ' काहीही होऊदेत तू एकटी राहा .' तिला काहीही कळत नव्हतं . हेच विचार करता करता ती हॉस्पिटलला पोहचली .
*********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . पुढे काय होईल ???? हे नक्की तुम्ही कंमेंट मध्ये सांगा . धन्यवाद