Login

मन उधाण वाऱ्याचे भाग - 31

There is hard time between these three birds .

श्रावणी -" सगळ्यांचं आयुष्य खुशीत जात नसत किरण .."

     हे म्हणत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू खाली येऊ लागले . किरण हे ऐकताच त्याला त्याच्या मनातील भावना सांगू शकला नाही . त्याला आता त्याच्या आयुष्यातला महत्वाच निर्णय घ्यावा लागणार होत . तो विचारात पडला . त्याला लवकर काहीतरी निर्णय घ्यावं लागणार होतं .

        संद्याकाळ होत आलेली होती . दोघांमध्ये शांत वातावरण निर्माण झाली होती . श्रावणी वेळ पाहत म्हणाली .

श्रावणी -" अरे ... आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल . उशीर झालाय ."

किरण विचारातून बाहेर आला .

किरण -" हो ... "

श्रावणी तयार झाली . किरणला काहीच कळत नव्हतं .

श्रावणी -" चल ..."

किरण -" हम्म .."

     एवढं म्हणत दोघेही हॉस्पिटलला निघाले . वाटेत किरण अजूनही विचार करत होता . काहीवेळात ते हॉस्पिटलला पोहचले . पायऱ्या चढत दोघे शिवानीच्या वार्डात गेले . शिवानी जागीच होती . नुकतीच झोपेतून उठली होती . दोघांना पाहताच तिच्या चेहऱ्यावर वेगळीच तेज निर्माण झाली  .

शिवानी -" अरे आलात ??"

श्रावणी -" हो ..."

ती स्मित करत म्हणाली . किरण शांतच होता .

श्रावणी -" तू चहा घेतलीस ??"

शिवानी -" नाही ..."

श्रावणी -" थांब मी घेऊन येते .."

     ती उठली आणि हॉस्पिटलच्या कॅन्टीनकडे निघाली. शिवानी वेळ पाहताच किरणला म्हणाली .

शिवानी -" अरे काय झालं ?"

      तो अजूनही शांत होता . त्याच्या मनात वेगळीच विचार चालू होती . तो शिवानीला श्रावणी घेतलेली निर्णय सांगणार नव्हता . तो आधी श्रावणीला समजवणार होता . ती समजून घेतली नाही , तरीही शिवानीला तो अजून त्रास देणार नव्हता .

किरण -" काही नाही .."

शिवानी -" मग सांगितला का नाहीस ?"

किरण -" काय ??"

शिवानी -" तुझ्या मनातील भावना ?"

किरण -" नाही .."

तो नाराज सुरात म्हणाला .

शिवानी -" का ?"

किरण -" वेळच भेटला नाही आणि ..."

शिवानी -" आणि काय ?"

किरण -" आणि मला भीती वाटत होती ."

    तो खरं कारण सांगणार नव्हता . म्हणून तो वेळ मारून नेण्यासाठी म्हणाला . 

शिवानी -" अरे मग कधी सांगणार आहेस ? माझ्याकडे जास्त वेळ उरला नाहीये किरण ..."

किरण -" माहिती आहे शिवानी . पण मला थोडं वेळ दे .." 

      श्रावणीने घेतलेला निर्णय त्याला पटत नव्हतं . तिला समजवण्यासाठी त्याला वेळ हवी होती . त्याला आता त्याच्या मनातील भावनेचा जराही कदर उरली नव्हती . सर्वात आधी त्याला तिचा निर्णय बदलायचा होता . त्यासाठी तो काहीही करण्यासाठी तयार होता . 

शिवानी - " अरे पण ...." 

ती बोलणारच होती कि तेंव्हाच श्रावणी चहा घेऊन आली . 

श्रावणी -" हे घे चहा ..."

ती शिवानीला चहाचा एक कप देत म्हणाली . 

श्रावणी -" काय बोलणं चालू आहे दोघात ?"

शिवानी -" अगं काही नाही , सहज गप्पा मारत होतो ." 

श्रावणी -" अच्छा .." 

शिवानी -" श्रावणी ... "

श्रावणी -" काय ?"

शिवानी -" मी गेल्यावर तू प्लिज माझ्या घरी राहा ,"

श्रावणी - " का ?"

ती आश्चर्याने म्हणाली .

शिवानी -" अगं मी गेल्यावर माझं घर मोकळाच राहील ना आणि तू एकटी कुठं राहणार ?"

श्रावणी -" अगं पण ..."

शिवानी -" पण वैगरे काही नाही . तू राहायचं म्हणजे राहायचंस  . "

यावर ती शांत झाली . 

शिवानी -" या आधीच मी माझं घर तुझ्या नावाने केले आहे . "

हे ऐकताच श्रावणीला धक्काच बसला .

श्रावणी -" अगं पण का ?"

शिवानी -" का म्हणजे .. माझ्या मागे पुढे कोण नाहीये . माझ्या आयुष्यात जवळील माणसं खूप कमी जण आहेत . त्यापैकी तुम्ही दोघे आहेत आणि तुला माझ्या शिवाय एकटी राहावं लागणार . म्हणून तू माझ्या घरात राहा . मी मेल्यावर माझं अस्तित्व त्या घरात तुझ्यासोबत असेल ."

     श्रावणीच्या गालावरून नकळत अश्रू खाली येऊ लागले . अचानक ती शिवानीला मिठीत घेतली . तिच्या मनात वेगळीच योजना तयार होती . शिवानी गेल्यानंतर ती एका नर्कात जाणार होती . तिथे तिला नाही ते सहन करावं लागणार होतं . 

शिवानी -" अगं .. मी सांगितले ना मी असू पर्यंत तू रडणार नाहीस म्हणून ..."

     ती श्रावणीचे ओले डोळे पुसत म्हणाली . किरण मात्र गप्प होता . 

  बघता बघता तीन दिवस गेले . शिवानी दररोज किरणला विचारायची . पण किरण मात्र काहीतरी कारण सांगून वेळ मारून न्यायचा . कधी कामाचं कारण सांगायचा , कधी भीतीचं कारण सांगायचा . श्रावणी मात्र शिवानीसमोर खुशीत राहायची . तिला तिच्या मनातील काहीही कळू देत नव्हती . शिवानीला नंतर किरणवर शंका येऊ लागलं . ती मनातल्या मनात ठरवली कि किरण नाहीतर नाही , ती श्रावणीला किरणच्या मनातील भावना ती सांगणार . 

      दुपारची वेळ होती . श्रावणी रोजच्या प्रमाणे शिवानीसाठी डब्बा आणली होती . श्रावणी तिला एका ताटात सर्वकाही वाढून दिली . शिवानी जेवणाचा एक घास उचलली आणि तोंडात घातली . श्रावणी तिच्याजवळ बसली होती .

शिवानी -" श्रावणी .. "

श्रावणी -" हम्म ..."

शिवानी -" पुढे काय करायचं ठरवलंय ?"

      श्रावणीने आधीच निर्णय घेतलेला होता . पण ती शिवानीला सांगणार नव्हती .

श्रावणी -" अजून काही ठरवलं नाही ."

ती नजर चुकवत म्हणाली .

शिवानी -" मग एक सांगू ?"

श्रावणी -" सांग .."

शिवानी -" तू वाईट वाटून घेत नसशील तर सांगेन ."

श्रावणी -" हा गं ... सांग ."

शिवानी -" तू आणि किरण एकत्र का नाही राहत ?? "

श्रावणी -" काय ?????"

शिवानी -" अगं तू परत घरी तर जाणार नाहीस . एकटी कसं राहू शकतेस ? तू आणि किरण दोघे एकत्र राहा ना ."

श्रावणी -" शिवानी .. अगं काय बोलतेस ? माझं लग्न झालाय आणि मी कसं राहू शकते ?"

शिवानी -" का राहू शकत नाहीस ?"

ती गप्प झाली .

श्रावणी -" अगं पण ..."

शिवानी -" पण वैगरे काही नाही ."

श्रावणी -" अगं पण तू एवढं का हट्ट करत आहेस ?"

शिवानी -" कारण किरण तुझ्यावर प्रेम करत आहे ."

ती डोळे बंद करून जरा मोठ्याने म्हणाली .

श्रावणी - " काय ??"

शिवानी -" हो . हो .. किरण तुझ्या प्रेमात पडलाय ."

श्रावणी शांत झाली . 

शिवानी -" मला माहितीय श्रावणी . तुझ्या मनातही त्याच्याबद्दल भावना आहेत . "

श्रावणी खाली पाहत म्हणाली .

श्रावणी - " पण समाज काय म्हणेल ?"

शिवानी -" जेंव्हा तुझा नवरा तुला मारायचा ,तेंव्हा कुठे गेला होता समाज ? जेंव्हा तू एकटी बाहेर पडलीस , तेंव्हा कुठे होता समाज ? तेंव्हा फक्त किरण तुझ्यासोबत होता . तोच तुला सावरला . तो फक्त तुझ्यावर असलेला प्रेमापोटी तुला सावरला . " 

श्रावणी -" पण मन मानत नाहीये शिवानी ."

शिवानी -" अगं ... एकटी कसं राहणार तू ?"

श्रावणी -" अगं ... मी परत माझ्या ..."

इतक्यात किरणचा आवाज आला . 

किरण -" हाय ..."

     ती शिवानीला तिच्या निर्णयाबद्दल सांगणार होती . पण तेंव्हाच किरण आला . मग ती सांगायचं थांबली .

********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा . पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतंय . कंमेंट करून सांगा . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद