संध्याकाळ होत आलेली होती . श्रावणी आणि शिवानी यांच्या गप्पा अजून सुरूच होती . शिवानी आज खूपच खुश होती. तिची शेवटची इच्छा आता पूर्ण होऊ लागली होती. किरण आणि श्रावणी आता एकत्र होणार होते अशी तिची समज होती . पण श्रावणी आणि किरण या दोघांनाच माहिती होतं कि हे सगळं नाटक आहे . श्रावणी शिवानीच्या खुशीतच ती समाधान होती . तिच्या हसरा चेहरा पाहून तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटत होतं.
शिवानी -" मग लग्न कधी करायचं ठरवलंय ?"
हे प्रश्न ऐकून श्रावणी शांत झाली. याच उत्तर काय द्यावं हे तिला सुचेना .
शिवानी -" अगं सांग ना.."
अचानक तिला सुचलं आणि ती म्हणाली .
श्रावणी -" असं कसं लग्न होईल ?"
शिवानी -" का होणार नाही ?"
श्रावणी -" पहिलं लग्न मोडल्याशिवाय मी लग्न कसं करू शकेन?"
हे कारण शिवानीला ही पटलं. ती विचारात पडली.
शिवानी -" मग डिओर्स कधी देणार आहेस ?"
श्रावणी -" अगं ते काय मिनिटात होणारी गोष्ट नाहीये . त्याला खूप वेळ लागतं ."
शिवानी -" वेळ तर नाही ना माझ्याकडे श्रावणी .."
दोघामध्ये थोडा वेळ शांतता पसरली . अखेर शांतता मोडण्यासाठी श्रावणी म्हणाली .
श्रावणी -" ते जाऊदेत . आज रात्री काय खाणार ते सांग ?"
शिवानी अजूनही शांत होती . श्रावणीला शिवानीची शांतता मोडायची होती . म्हणून ती म्हणाली.
श्रावणी -" शिवानी .. किरण आणि मी दोन दिवसानंतर रिंग एक्सचेंज करणार आहे . तुला यायचं आहे बरं का .."
हे ऐकताच शिवानीच्या चेहऱ्यावर परत तेज पसरली .
शिवानी -" खरंच?? हे शक्य आहे ?"
श्रावणी -" मी म्हणतेय मग शक्य असणारच ना ?"
हे ऐकून शिवानी श्रावणीच्या गळ्यात पडली .
शिवानी -" थँक् यु श्रावणी .."
पण श्रावणीला हे सुद्धा नाटक करावं लागणार होतं . त्यामुळे तिला वाईट वाटलं . पण ती शिवानीसाठी काहीही करू शकणार होती .
श्रावणी -" बरं आता सांग . काय खाणार ?"
शिवानी -" तू जे बनवशील ते खाते ."
श्रावणी -" बरं .. आता मी निघते . किरणही घरीच असेल . त्याला घेऊन येईन मी ."
शिवानी -" ठीक आहे ."
श्रावणी उठली आणि हॉस्पिटलच्या बाहेरच्या दिशेने निघाली .
हॉस्पिटलच्या खाली येऊन ती रिक्षा पकडली आणि घरी निघाली . रिक्षात सुद्धा ती फक्त शिवानीबद्दल विचार करत होती.
काहीवेळाने रिक्षा अपार्टमेंटच्या खाली थांबली . पैसे देऊन ती पायऱ्या चढू लागली .पार्किंगमध्ये तिला किरणची गाडी दिसली . यावरून ती ओळखली की किरण घरीच आहे
ती दारात पोहचली तर दार उघडाच होता .किरण तिथेच सोफ्यावर बसला होता . तो शून्यात पाहत होता . तो विचारात हरवून गेला होता. त्याचे डोळे ओले होते. जणू तो नुकताच रडला असावा .किरणला पाहत श्रावणी त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली .
श्रावणी -" किरण ..."
तो अजूनही शून्यात पाहत होता.
श्रावणी -" किरण.."
थोड्या मोठ्या आवाजाने ती म्हणाली .
त्याच लक्ष तिच्या आवाजाने विचलित झालं .
किरण -" हम्म .."
श्रावणी -" काय झालं ?"
किरण ओले डोळे पुसत म्हणाला.
किरण -" काय नाही ..."
श्रावणी -" खरंच??"
किरण -" ह्म्म.."
असं म्हणत तो उठला आणि बाल्कनीच्या दिशेनी जाऊ लागला. शिवानीला रिंग एक्सचेंज बाबतीत झालेलं संवाद श्रावणीला सांगायचं होतं.
तीही त्याच्या पाठोपाठ बाल्कनीच्या दिशेनी गेली . किरण बाल्कनीत येत असलेली थंड हवा अनुभवत होता . ती त्याच्या बाजूला येऊन थांबली.
श्रावणी -" आज खूप काम होतं का?"
किरण -" ह्म्म.."
बाल्कनीतून दिसणारे नजारे पाहत तो म्हणाला .
श्रावणी -" शिवानी तुला विचारत होती .."
किरण -" ह्म्म.."
श्रावणीला कसं ही करून त्याला शिवणीसोबतची झालेली संवाद सांगायची होती .
श्रावणी -" आज शिवानीला आपल्या बद्दल सांगितले. "
किरण -" ह्म्म.."
श्रावणी -" पण..."
हे ऐकताच किरण तिच्याकडे पाहिला.
किरण -" पण काय??"
श्रावणी -" तिला आपलं लग्न पाहायचं आहे ."
किरण -" आणि तू हा म्हणलीस ?"
श्रावणी -" नाही ... मी म्हणलं की पहिलं लग्न मोडल्याशिवाय दुसरं लग्न कसं करणार ? "
किरण -" मग ती काय म्हणाली ?"
श्रावणी -" ती जेवायला नको म्हणत होती. म्हणून ..."
किरण -" म्हणून ??"
श्रावणी -" म्हणून मी तिला म्हणलं की आपण रिंग एक्सचेंज करणार आहोत ..."
किरण हे ऐकला आणि शांतपणे पुढचे नजारे पाहू लागला. त्याच असं वागणं पाहून श्रावणी त्याच्याकडे पाहत म्हणाली .
श्रावणी -" काय झालं?"
किरण -" काय नाही ."
श्रावणी -" मग शांत का आहेस ?"
किरण -" माझ्या भावनांचे खेळ होताना पाहतोय ."
श्रावणी -" म्हणजे ?"
तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला.
किरण - " मी तुझ्यावर प्रेम करतो. ही माझी भावना आहे . तुझी भावना मला माहितीच नाही. म्हणजे तुझ्या मनात माझ्याबद्दल भावना आहेत का नाही माहिती नाही आणि तू म्हणतेस मी तुझ्यासोबत शिवानीसमोर लव्हर म्हणून नाटक करू? आणि त्यानंतर आपले रस्ते वेगळे? ही गोष्ट माझ्या प्रेमाच्या भावनेचा अपमान नाही का? "
तो आता रागात म्हणत होता .
किरण -" सुरुवातीपासून हेच होत आलेला आहे . एक मुलाला एका मुलीवर प्रेम होतो आणि तो त्याच्या प्रेमाची कबुली देतो . ती मुलगी त्याच्या भावनेला समजून न घेता त्याचा अपमान करते . म्हणजे आम्हा मुलांच्या भावनेची कदरच नाही . जर एक मुलगी मुलाच्या प्रेमात पडते आणि मुलगा तिच्या भावनेचा आदर करून तिला नाही म्हणतो , तर त्या मुलीला ' बेचारी ' या नावाने पाहतो . असं का? आम्हाला प्रेमात पडण्याचं अधिकारच नाही मग ..."
तो अजूनही रागात होता. श्रावणी फक्त तिला ऐकत होती.
किरण -" आणि अजून एक तुझ्या रिंग एक्सचेंजच्या नाटकामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही."
तो रागात जोरात हात एकमेकांना जोडला आणि म्हणाला.
किरण -" गुड बाय.."
तो रागात बाल्कनीतून निघाला. श्रावणी काही म्हणणारच होती की तो पर्यंत तो दार जोरात आपटून बाहेर गेला होता .
श्रावणीला खूप वाईट वाटत होतं . न कळत तिच्या गालावरून अश्रू खाली येत होते . तिला आता काय करावं हे सुचत नव्हतं . ती किरणला फोन लावली. पण तो उचलत नव्हता . ती सतत फोन लावत होती . पण तो उचलत नव्हता . शिवानीची इच्छा तिला पूर्ण करायची होती . पण ती इच्छा आता पूर्ण होताना दिसत नव्हती .
असेच कित्येक वेळ ती बाल्कनीत उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते . काहीवेळातच संध्याकाळ होणार होती . तिला शिवानीसाठी स्वयंपाक करायचं होतं. ती स्वयंपाक घरात गेली आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करू लागली.
ती विचारात पडली . त्याला शिवानी आणि किरण या दोघांना सांभाळणं गरजेचं होतं. या विचारात ती डब्बा पण घेतली आणि हॉस्पिटलला निघाली .
रिक्षा हॉस्पिटलच्या खाली थांबली. श्रावणी उतरली आणि पायऱ्या चढू लागली. ती शिवानीसमोर राडवलेला चेहरा घेऊन जायचं नव्हतं . म्हणून ती जबरदस्तीने हसू आणत होती.
शिवानीच्या बेडजवळ ती गेली . शिवानी नुकतीच झोपून उठली होती.
श्रावणी -" झाली का झोप?"
शिवानी -" हो.."
श्रावणी -" चल आता जेवून घे . तुला भूक लागली असेल."
शिवानी -" अग पण किरण कुठे आहे ?"
श्रावणी -" त्याला काही काम आलं. म्हणून येऊ शकला नाही ."
शिवानी -" तुझ्यासाठी रिंग घेत असेल ."
ती चेष्टेच्या सुरात म्हणाली . श्रावणी फक्त स्मित केली.
शिवानी -" मी रिंग एक्सचेंज साठी खुप उत्सुक आहे ."
श्रावणी -" ते राहुदेत .. पहिला जेवून घे .."
असं म्हणत ती वेळ मारून नेली . शिवानीला ती जेवायला वाढली . शिवानी गप्पा मारतच जेवू लागली. पण श्रावणी मात्र फक्त ऐकत होती. पुढे काय होणार याचा विचार ती करत होती. किरण कुठे आहे ? याबद्दल तिला माहिती करून घ्यायची होती . तो पुन्हा येईल का नाही याची खात्री तिला नव्हती .
*************************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच .. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा .. किरणची भूमिका तुम्हाला पटली का हे ही कळवा . धन्यवाद