Login

मन उधाण वाऱ्याचे भाग -34

Shivani left this world.

       श्रावणी शिवानीला भरवत होती. भरवत असतानाच ती किरण विषयी विचार करत होती. तो कुठे असेल ? तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल ? त्याला कसे तिचे विचार पटवून द्यायची . असले सगळे प्रश्न तिच्या मनात येत होत्या . तिला काहीही करून किरणला बोलवायचं होत .कारण शिवानी जवळ खूप कमी वेळ उरला होता . उद्याचा दिवस तिचा शेवटचा दिवस ठरणार होतं . 

        जेवण संपताच श्रावणी तिला गोळ्या व औषध दिली आणि झोपवली. ती झोपताच श्रावणी किरणला फोन लावली . रिंग वाजत होती , पण तो फोन उचलत नव्हता . त्याचा राग तिला आता समजत होतं. त्यात त्याचा काही दोष नव्हता . ती उठली आणि घरी जायला निघाली . या आशेने की किरण तिथे आला असावा . 

         काहीवेळाने ती घरी पोहचली. पण तो तिथे नव्हता . तिने घर बंद केलेलं होतं. दाराला कुलूप तशीच होती . तिला आता खूप वाईट वाटू लागलं . ती जे करत होती , ते फक्त तिच्या मनाने करत होती. त्यात किरणला त्याची बाजू मांडायला देत नव्हती .

        किरण कुठे असेल ? हे विचार ती करत होती . तो राहत असलेला रूमची खबर ही तिला नव्हती . 

         इतक्यात तिचा फोन वाजला . स्क्रीनवर ' डॉक्टर ' हे नाव झळकत होतं . ती वेळ न घालवता फोन उचलली.

श्रावणी -" हॅलो ..."

डॉक्टर -" डॉक्टर बोलतोय ."

श्रावणी -" हो बोला डॉक्टर .."

डॉक्टर -" शिवानीला अटॅक आलाय . लवकर या."

      हे ऐकताच तिचे हात पाय लुळे पडल्यासारखे तिला जाणवू लागले . वेळ न घालवता पळतच खाली आली आणि ऑटो पकडली .

        थोड्यावेळात ती हॉस्पिटलच्या खाली पोहचली . पैसे देऊन ती धावतच हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू लागली . ती डॉक्टरांच्या केबिन बाहेर आली . डॉक्टर केबिनमध्ये नव्हते . ती थेट ऑपरेशन थेटर बाहेर आली . किरण पहिल्यापासूनच थेटर बाहेर उभा होता . त्याला पाहून ती जरा चकित झाली.

        ती बाहेर असलेल्या बाकावर बसली. किरण तिच्या बाजूलाच उभा होता . थेटर बाहेरील लाल दिवा विजला. थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर आले . त्यांना पाहताच दोघेही त्यांच्याजवळ गेले .

किरण -" काय झालं डॉक्टर ?"

डॉक्टर -" तिला जोराचा अटॅक आला होता आणि ..."

श्रावणी -" आणि ??"

डॉक्टर -" आणि हा तिचा शेवटचा अटॅक होऊ शकतो . तिच्या जवळ काही तासच आहेत ."

श्रावणी -" पण डॉक्टर तिच्या जवळ आणखी एक दिवस होता ना ??"

डॉक्टर -" आम्ही दिवस अंदाजाने सांगत असतो . मृत्यू त्या अगोदर ही येऊ शकते, त्याच्या नंतर ही येऊ शकते .पण या केसमध्ये दुर्देवाने मृत्यू लवकर आहे ."

        हे ऐकताच श्रावणीला रडू कोसळलं. तिला काय करावं सुचत नव्हतं . किरणही अचंबित झाला होता .तेवढ्यात शिवानीला ऑपरेशन थेटरमधून बाहेर घेऊन आले.तिच्या डोक्याला पट्टी लावलेली होती . तिचे डोळे बंद होते. एक नर्स तिला स्ट्रेचर वरून घेऊन जात होते . आय . सी . यु मध्ये  तिला घेऊन जात होते . तिच्या चेहऱ्यावरून तेजच नाहीशी झाली होती. तिला होत असलेली त्रास ती कधीच सांगत नव्हती .

       किरणला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. श्रावणी तीच अवतार पाहून खाली बसली. तिला रडू आवरत नव्हतं. तिच्या रडण्याने किरणला अजून वाईट वाटत होतं.

        आय . सी . यु च्या पलंगावर तिला झोपवण्यात आलं. तिचे डोळे अजूनही बंद होते. तिच्या पूर्ण डोक्याला पट्टी बांधलेली होती . तिचा चेहराही उतरलेला होता . श्रावणी तिच्याजवळ आली. तिला पाहताच तिचे अश्रू अजून अनावर आले . किरण तिच्या बाजूला उभा होता . किरणला शिवानीसाठी काहीतर करायचं होतं. म्हणून तो लगेच हॉस्पिटलच्या बाहेर निघाला. श्रावणी त्याला पाहिली, पण त्याला थांबवण्यासाठी तिच्याजवळ आता शक्ती उरलेली नव्हती.

किरण श्रावणीच्या जवळ गेला आणि म्हणाला.

किरण -" मी आलोच.."

      असं म्हणत तो बाहेर जाऊ लागला . श्रावणीला काही सुचत नव्हतं . आय. सी . यु मध्ये ती शिवानीजवळ बसली होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.   

       इतक्यात शिवानीचे डोळे हालचाल करू लागले. हळू हळू ती डोळे उघडू लागली. श्रावणी तिच्याजवळच बसली होती. 

शिवानी -" श्रावणी ..."

       तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता . तरीही ती जीव एकवटून बोलू लागली.श्रावणी तिचा आवाज ऐकताच तिला पाहिली. 

श्रावणी -" बोल शिवानी ...काय हवाय?"

शिवानी -" किरण कुठे आहे ?"

श्रावणी -" तो आता इथेच होता . बाहेर गेला असेल . येईल थोड्या वेळात..."

शिवानी -" आल्यावर मला सांगशील? मला त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ."

श्रावणी -" तू मला का नाही सांगत ? मी त्याला सांगेन ."

शिवानी -" नको ... मला ही गोष्ट त्यालाच सांगायची आहे ."

श्रावणी -" ठीक आहे . तो आल्यावर तुला सांगेन . तू आता झोप पाहू . "

श्रावणी तिचे अश्रू न काढता म्हणाली . 

शिवानी -" हम्म..."

ती डोळे मिटली. श्रावणी आता तिच्या अश्रूला वाहू देऊ लागली. 

     थोड्यावेळाने किरण हॉस्पिटलला आला. तो थेट आय . सी. यु मध्ये गेला आणि श्रावणीच्या बाजूला उभा राहिला . श्रावणी त्याला पाहली आणि म्हणाली.

श्रावणी -" कोठे गेला होतास ?"

तो त्याच्या हातातली दोन हार आणि दोन रिंग तिला दाखवला .

किरण -" शिवानीसाठी तिच्या शेवटची इच्छा पूर्ण करणार आहोत आपण?"

श्रावणी -" हम्म ... त्याआधी शिवानी तुला बोलावत होती ."

किरण -" का ?"

श्रावणी -" तिला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ."

       हे ऐकताच तो वेळ न घालवता आत गेला . शिवानीचे डोळे बंद होते .किरण तिच्या जवळ गेला आणि म्हणाला .

किरण -" शिवानी ..."

      त्याची हाक ऐकल्यावर तिच्या डोळे उघडले . त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं . 

शिवानी -" किरण ..."

तिचा आवाज खूपच लहान येत होता.

म्हणून तो तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा कान घेतला.

किरण -" हो बोल.."

ती हळू आवाजात म्हणाली.

शिवानी -" माझं एक काम करशील ?"

किरण -" हा नक्कीच.. बोल .."

शिवानी -" मी जग सोडून गेल्यावर माझ्या कपाटात तुझ्यासाठी एक चिट्टी आहे. ती तू घे .."

किरण -" असं का म्हणतेस ? तू अजून खूप वर्ष जगशील ."

शिवानी हलकीशी स्मित केली आणि म्हणाली .

शिवानी -" खोटी आशा देऊ नकोस किरण . मला माझं भविष्य माहिती आहे . पण तू ती चिट्टी वाच ."

किरण हे ऐकताच होकार देत मान हलवला. 

शिवानी -" श्रावणी कुठे आहे ?"

किरण -" ती बाहेर आहे ."

तो अगदी नैराश्य आवाजात म्हणाला.

शिवानी -" तिला बोलवशील?"

किरण -" हो .."

       हे म्हणत तो उठला आणि बाहेर आला.श्रावणी बाहेरच्या बाकावर बसली होती. तिचे डोळे ओले होते. किरण लांबूनच तिला आवाज दिला.

       ती उठली आणि दोघेही आत गेले. शिवानी तिच्यासमोर दोघांना पाहून आनंदित होती . श्रावणीच्या हातात दोन हार पाहून तिने त्या हारेकडे बोट केली. त्या बोटाकडे पाहताच किरण म्हणाला.

किरण -" तुला माहिती आहे का ? आज आम्ही दोघे रिंग एक्सचेंज करणार आहोत ."

श्रावणी ऐकताच ती शिवानीला म्हणाली .

श्रावणी -" हो .."

असं म्हणत ती तिच्या हातातील हार तिला दाखवली. 

शिवानी फक्त स्मित करत होती. 

किरण -" हे बघ . मी दोन रिंग सुद्धा आणलीय."

      शिवानीला खूप आनंद होत होता . पण तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. दोघांना हे समजत होतं.

श्रावणी लगेच पुढं झाली.

श्रावणी -" अरे मुहूर्त निघून जाईल . आपल्याला घाई करायला हवी."

तिच्या या वाक्यात रडण्याचा आवाज ही येत होता. 

किरण -" हो ... "

        असं म्हणत किरण तयारी करू लागला. स्वतः साठी तो सूट आणि बूट आणला होता. तो घालण्यासाठी त्याची गडबड चालली होती .

       श्रावणीही तयारी करत होती. त्या दोघांची तयारी शिवानी बेडवरून पाहत होती. तिला खूप त्रास होत होता. पण ती चेहऱ्यावरून दाखवत नव्हती.

       श्रावणी एक रिंग घेतली आण. किरणचा हात हातामध्ये घेतली . तिला शिवानीच्या शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे करावं लागणार होतं . चेहऱ्यावर खोटं स्मित पसरवत ती किरणच्या बोटात ती रिंग घातली . शिवानी पूर्ण ताकदीने हात उचलली आणि टाळ्या वाजवण्यासाठी हात एकमेकांवर आदळू लागली . किरण तिच्याकडेच पाहत होता .

   त्याच्या मनात श्रावणी बद्दल प्रेम होतं खरं , पण श्रावणीला हे नातं नको होतं . म्हणून तो फक्त शिवानीसाठी हे सगळं करत होता . हळुवार पणे तो श्रावणीचा हात हातात घेतला . त्याचे हात कापत होते . श्रावणी किरणची परिस्थिती जाणून होती . तो रिंग श्रावणीच्या बोटात घालतच होता कि पलंगाजवळील व्हेंटिलेरमधून आवाज येऊ लागला . दोघेही शिवानीकडे पाहिले . तिचे डोळे उघडे होते . तिच्या चेहऱ्यावरील स्मित नाहीशी झाली होती . ती फक्त शून्यात पाहिल्यासारखी दिसत होती .

किरण -" नर्स ..."

     तो जोरात ओरडला . नर्स लगेच तिथे आली . ती सर्वकाही तपासू लागली . अखेर ती उघडे असलेल्या डोळ्यांना बंद केली आणि म्हणाली .

नर्स -" सॉरी ... शी इस नो मोर ..."

       हे ऐकताच श्रावणीला रडू कोसळल . ती मोठ्याने रडत खाली बसली . किरणलाही धक्का बसला होता . एक अनाथ मुलगी , मैत्री जपणारी , कधीही मदतीला धावणारी शिवानी या जगातुन निरोप घेतली होती .

***********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच ... हा भाग कसा वाटलं नक्की सांगा .... पुढे काय होईल ? हे सुद्धा सांगा ... धन्यवाद