श्रावणी हसरा चेहरा ठेवू शकत नव्हती .
श्रावणी -" वॉशरूम कुठं आहे ?"
शिवानी बोट दाखवली . ती वेळ न घालवता उठली आणि वॉशरूममध्ये गेली . तिला अश्रू अनावर आले होते . तिला खूप वाईट वाटत होत . तिची लहानपणाची मैत्रीण वृणाली सुद्धा अशीच सोडून गेली होती आणि आता शिवानीही सोडून जाणार होती. तिला अश्रू रोखताही येत नव्हतं .
अखेर काही वेळाने ती शांत झाली . डोळे पुसली आणि चेहरा पाण्यानी धुतली . हसरा चेहरा ठेवत ती वॉशरूमच्या बाहेर आली . शिवानी बेडवर उठून बसली होती आणि तिच्याजवळ किरण बसला होता .
श्रावणी तिच्या चेहऱ्यावरचे अश्रुंचे डाग पुसून तिच्यासमोर उभी होती .
श्रावणी -" शिवानी ... तू काय खाल्ली नाहीस का ?"
शिवानी -" काल रात्री जेवण केले होते . नंतर मला इथेच यावं लागलं ."
तेवढ्यात नर्स त्यांच्याजवळ आली .
नर्स -" डॉक्टरांनी तुम्हाला बोलवलं आहे ."
शिवानी -" मी जाते ."
तिच्या आजार बद्दल तिला किरण आणि श्रावणीला कळू द्यायचं नव्हतं . म्हणून ती उठायचं प्रयत्न करत होती . पण तिला हे माहिती नव्हतं कि या दोघांना कळालं आहे .
श्रावणी -"अगं वेडी आहेस का ? आम्ही जातो . "
किरण -" हो ... तू झोप आम्ही जाऊन येतो ."
तिला भीती वाटत होती . पण ती काहीही करू शकत नव्हती . किरण आणि श्रावणी डॉक्टरांच्या केबिनच्या दिशेनी निघाले .शिवानी बेडवर पडली होती आणि विचार करू लागली .
किरण आणि श्रावणी कॅबिनमध्ये गेले . डॉक्टर खुर्चीवर बसले होते . त्यांना पाहून डॉक्टर म्हणाले .
डॉक्टर -" या बसा .."
किरण -" सर तुम्ही बोलवलात ?"
किरण बसत म्हणाला .
डॉक्टर -" हो .... शिवानीला आता डिस्चार्ग देणार आहे . "
श्रावणी -" म्हणजे आता आम्ही घरी घेऊन शकतो ना ?"
डॉक्टर -" हो ... पण अध्येमध्ये तीच डोकं खूप दुखेल तेंव्हा तिला मी दिलेली गोळी द्या . त्याने दुखणं कमी होईल . जर खूपच दुखणं वाढलं तर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या ."
किरण -" ठीक आहे सर .."
असं म्हणत दोघे उठले . केबिनच्या बाहेर आले . शिवानी अजून तशीच बेडवर पडली होती . त्या दोघांना पाहताच ती उठली .
शिवानी -" काय म्हणाले डॉक्टर ?"
किरण -" तुला आता डिस्चार्ग देणार आहेत ."
शिवानी -" डॉक्टर अजून काय म्हणाले ?"
किरण -" अजून काय नाही ."
हे ऐकून तिला समाधान वाटलं . तिला वाटत होत कि डॉक्टर दोघांना सर्वकाही सांगतील . पण या दोघांच्या चेहऱ्यावरून तिला वाटू लागलं कि यांना काहीही माहिती नाही .
श्रावणी -" चल ... शिवानी आपल्याला जायचं आहे ."
ती शिवानीला उद्देशून म्हणाली .
शिवानी -" हो ..."
ती बेडवरुन उठली . श्रावणी तिला उठण्यास मदत करू लागली .
श्रावणी -" आता कसं वाटतंय ?"
शिवानी -" आता छान वाटतंय . फक्त थोडं डोकं दुखत आहे ."
किरण -" ठीक होईल . काळजी नको ."
तो तिला बरं वाटावं म्हणून म्हणाला .
सगळी आवराआवर झाली आणि सगळे हॉस्पिटलमधून बाहेर आले . बाहेर येताच किरण आणि श्रावणीला रिक्षातून घरी पाठवला आणि तो पार्किंग मधून गाडी काढला . थोड्यावेळात तो शिवानीच्या अपार्टमेंटच्या खाली गाडी घेऊन उभा होता . श्रावणी आणि शिवानी हे नुकतेच रिक्षातून उतरले होते . शिवानीच्या हातात हात घालून श्रावणी तिला पायऱ्या चढण्यास मदत करत होती .
श्रावणी -" सावकाश .."
शिवानी हसत म्हणाली .
शिवानी -" मी म्हातारी झाली नाहीये श्रावणी . मी चढू शकते ."
श्रावणी -" तू आजारी आहेस ना ? मग सांगते तस ऐकायचं ."
ती डोळे मोठे करत म्हणाली .
शिवानी -" ओके ."
किरण त्यांच्या मागोमाग पायऱ्या चढत होता . दार उघडून श्रावणी शिवानीला बेडवर बसवली .
श्रावणी -" तुला पाणी हवाय ."
शिवानी -" नको .... पण ?"
श्रावणी -" पण काय ?"
शिवानी -" पण मला भूक लागलीय ."
अगदी केविलवाणी चेहरा करत शिवानी म्हणाली .
श्रावणी -" ठीक आहे . मी स्वयंपाक करते . थोडावेळ थांब ."
शिवानी -" लवकर कर ."
किरण मध्येच म्हणाला .
किरण -" मी जरा बाहेर जाऊन येतो ."
शिवानी -" कुठे चालास ?"
किरण -" तुझे गोळ्या औषध आणायचे आहेत ."
शिवानी -" अरे मी मागवेन कि .."
किरण -" अरे मी आणतो ...."
असं म्हणत तो वेळ न घालवता बाहेर पडला . शिवानी तशीच बेडवर बसली होती .
थोड्यावेळाने श्रावणी सगळंकाही आटपून स्वयंपाकघराच्या बाहेर आली . ती पाहू लागली कि शिवानी लॅपटॉप घेऊन काम करत होती . ती पुढे झाली आणि तिचा लॅपटॉप बंद केली .
शिवानी -" अगं काय करायलीस ?"
श्रावणी -" आता तर हॉस्पिटलमधून आलीस आणि लगेच काम होय ."
शिवानी -" अगं महत्वाचं काम होत ."
श्रावणी -" काम वैगरे काही नाही . आधी तब्येत बघायचं . चल आता जेवायला . "
ती शिवानीला बेडवरुन उठवत म्हणाली . शिवानी थोडी नाराजीने उठली . श्रावणीने तिला जेवायला वाढलं .
शिवानी -" तू पण जेव ना ."
श्रावणी -" आधी तू जेव . तुला गोळ्या घ्यायचे आहेत ."
काहीवेळाने तीच जेवण संपलं . त्याचवेळेला किरण घरी आला .
किरण -" हे घे . आता गोळी घे ."
शिवानी -" थँक यु ... आता तुम्ही पण जेवण करा ."
श्रावणी -" हो ... पण आधी तू गोळी घे ."
शिवानी गोळी घेतली . श्रावणी आणि किरण दोघेही जेवून घेतले . आज दोघेही ऑफिसला जाणार नव्हते . जेवण झाल्यानंतर तिघे गप्पा मारत बसले . त्या गप्पांमध्ये दुपार सरत जात होती .
इतक्यात शिवानी कपाळाला हात लावली .
श्रावणी -" काय झालं ग ?"
शिवानी -" डोकं दुखत आहे ."
किरण -" थांब . "
तो लगेच उठला आणि गोळी दिला . श्रावणी पिण्यासाठी पाणी दिली .
श्रावणी -"आता शांतपणे झोप . "
ती तिला बेडवर झोपवली आणि तिच्यावर चादर ओढवली . गोळीमुळे तिला लवकर झोप लागली .
श्रावणी आणि किरण या दोघांमध्ये वेगळीच शांतता निर्माण झाली . सूर्य मावळतीला आलेला होता . श्रावणी उठली आणि बाल्कनी कडे गेली . वरून खालचा नजारा पाहताना वेगळीच मनाची शांती लाभत होती . ती शांतपणे उभी होती . किरण तिच्याजवळ आला .
किरण -" इथून पाहिल्यावर शांत वाटत ना ?"
श्रावणी शांत होती . तिला पाहत तो म्हणाला .
किरण -" काय झालं गं ?"
तिच्या गालावरून अश्रू खाली येत होते .
किरण - " ठीक आहेस ना ?"
ती त्याच्याकडे पाहिली आणि त्याच्या मिठीत गेली . किरणला धक्काच बसला . ती रडत होती . त्याचा हृदय रेल्वेसारखी धड घडत होत .
श्रावणी -" मी हसरा चेहरा घेऊन तिच्यासमोर जाऊ शकत नाही किरण . वृणाली हि तशीच गेली आणि आता शिवानीही मला सोडून जाणार . मी एक श्राफ आहे किरण . मी जर कुणाशी मैत्री केली तर ती या जगातून मला सोडून जाते ."
किरण -" असं काही नाहीये . आता हि फक्त योगायोग आहे . "
ती मिठीतुन बाहेर आली .
श्रावणी -" कसलं योगायोग ? मलाच श्राफ आहे ."
किरण तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला .
किरण -" तिच्या जवळ खूप कमी वेळ आहे श्रावणी . आपण स्ट्रॉंग नाही राहिलो तर तीही नीट नाही जगणार . आपणच तिच्या जीवनाची शेवट सुंदर बनवू शकतो . तू असं रडशील तर कसं होईल ?"
तिला हे पटत होत .ती डोळे पुसत मान हलवली .
श्रावणी -" आपण ते कसं करू शकतो ?"
किरण विचार करू लागला .
किरण -" एक मार्ग आहे . "
श्रावणी -" काय ?"
किरण -" लवकरच कळेल ."
तो खिशातून फोन काढला आणि कुणाला तरी फोन लावला .
किरण -" हॅलो अन्या ..."
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती मिळते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद