श्रावणी -" आपण ते कसं करू शकतो ?"
किरण विचार करू लागला .
किरण -" एक मार्ग आहे . "
श्रावणी -" काय ?"
किरण -" लवकरच कळेल ."
तो खिशातून फोन काढला आणि कुणाला तरी फोन लावला .
किरण -" हॅलो अन्या ..."
तो फोनवर बोलत बाहेर गेला . श्रावणी तिथेच थांबली होती . काहीवेळात तो बोलून झाल्यावर बाल्कनीकडे आला .
किरण -" आता आपण एक वेगळीच क्षण अनुभवणार आहोत ."
श्रावणी -" म्हणजे ?"
इतक्यात घरातून आवाज आला .
शिवानी -" श्रावणी ..."
जोरात आवाज ऐकू आल्याने दोघेही पळतच आत आले .
किरण -" काय झालं ?"
श्रावणी -" काय झालं एवढं ओरडायला ?"
शिवानी -" मला कॉफी हवाय ."
दोघेही एक मोठासा दीर्घश्वास सोडले .
श्रावणी -" आणते . किरण तू हि पिणार ?"
किरण -" हो ."
थोड्यावेळात श्रावणी ट्रेमध्ये तीन कॉफीचे कप घेऊन आली . किरण आणि शिवानी बेडवर बसले होते .
किरण -" आता कसं वाटतंय ?"
शिवानी -" चांगलं वाटतंय ."
श्रावणी दोघांना एक कप देऊन स्वतःही एक कप घेतली .
किरण -" ऐका ना ."
श्रावणी -" काय ?"
ती खुर्चीवर बसत म्हणाली .
किरण -" आपण उद्या ट्रेकिंगला जाणार आहोत ."
शिवानी -" काय ??? खूप मस्त ..."
शिवानी उत्सुकतेने म्हणाली .
श्रावणी -" उद्या सकाळी ??"
किरण -" नाही ... संद्याकाळी .."
श्रावणी -" काय ??? संद्याकाळी ?"
किरण -" हो ."
श्रावणी -" अरे ट्रेकिंग दिवसा करतात ना ? रात्री कसं जमेल ?"
किरण -" अगं होईल . त्यालाच नाइट ट्रेकिंग म्हणतात . दिवसा ट्रेकिंग केलं तर ऊन आणि घामामुळे त्रास होणार .नाइट ट्रेकिंगला खूप मज्जा येईल ."
शिवानी -" हो ... खूप मज्जा येईल ."
श्रावणी चिंतेत वाटत होती .
श्रावणी -" पण ट्रेकिंग कुठे करायचं ?"
किरण -" चंदन गडावर ."
शिवानी -" हे कुठं आलं ?"
किरण -" सातारा .."
शिवानी -" वॉव ... खरंच खूप मज्जा येणार आहे ."
किरण -" आणि हा . आपण जाताना ट्रेननी जाणार आहोत . ट्रेनमध्ये तर अजून खूप मज्जा येईल ."
शिवानी -" हो ... श्रावणी आपल्याला बॅग पॅक करावं लागेल ."
श्रावणी -" हो .."
श्रावणीची ट्रेकिंगची इच्छा होती खरी पण तिला भीतीही वाटत होती . शिवानी बॅग भरायला घेतली . ट्रेकिंगसाठी लागेल ते सामान घेऊ लागली . किरण तिला मदत करू लागला .
शिवानी -" श्रावणी ."
श्रावणी -" काय ?"
शिवानी -" आपल्याला शॉप्पिंगला जावं लागेल . काही सामान आणावं लागेल ."
श्रावणी -" अच्छा ... मग जाऊयात ."
किरण -" चला मग जाऊयात ."
शिवानी -" हो ... चला . मी तयार होऊन येते ."
शिवानी अगदी उद्या मारतच तिच्या बेडरूममध्ये गेली आणि दार बंद केली . तिला जाताना पाहताच श्रावणी किरणकडे आली .
श्रावणी -" नाइट ट्रेकिंगला रिस्क वाटत नाही का ?"
किरण -" अगं तिच्याजवळ फक्त 14 दिवस आहेत . तिच्यासोबतच चांगलं क्षण अनुभवायचं आहे . मग थोडी रिस्क घ्यावं लागणार ."
श्रावणी -" ट्रेकिंग करताना काय झालं तर ?"
किरण -" काही नाही होणार . विश्वास ठेव ."
इतक्यात शिवानी तयार होऊन बाहेर आली .
शिवानी -" चला निघायचं ? "
ती उत्सुकतेने म्हणाली . ती जीन्सची शॉर्ट आणि पांढरी रंगाची टी शर्ट घातली होती . किरणच लक्ष तिच्यावरून जातच नव्हतं .
शिवानी -" जायचं ना ? "
किरण -" हो .."
श्रावणी -" चला ."
तिघेही घराबाहेर निघाले . श्रावणी आणि शिवानी एका स्कुटीवर बसले आणि किरण त्याच्या गाडीवरून मॉलच्या दिशेनी निघाले .
थोड्यावेळात तिघे मॉलच्या खाली पोहचले . मॉलमध्ये शिरताच शिवानी बॅगच्या दुकानात गेले . ट्रेकिंगसाठी एक छानशी बॅग खरेदी केले . पाण्याची बाटली , टॉर्च अजून खूप काही सामान खरेदी करून ते परत घरी निघाले .
सूर्यास्ताची वेळ होती . तिघे घरी पोहचले . शिवानी आता थकली होती . श्रावणीही आता थकली होती . किरणला आता रूमकडे जायचं होत .
किरण -" चला ... मला निघावं लागेल . माझंही सामान पॅक करावं लागेल . सगळी तयारी करावं लागेल ."
शिवानी -" अरे ... जेवून जा ना ."
किरण -" अगं मला उशीर होणार ."
शिवानी -" प्लिज ... थांब ना . प्लिज .."
ती अगदी लहानमुलांसारखं हट्ट करू लागली होती . श्रावणीही त्याला इशाऱ्याने थांबण्यास सांगितल.
किरण -" ठीक आहे . मी जेवूनच जाईन . "
शिवानी -" थँक्स .."
तिला दोघांच सहवास हवं होत . म्हणून ती हट्ट धरत होती . श्रावणी स्वयंपाक घरात जेवणाची तयारी करू लागली . तिला मदत करण्यासाठी किरण स्वयंपाक घरात गेला . त्या दोघांना एकत्र बघून तीच मन जळू लागलं होत . पण तीच एक मन सांगत होत कि तिच्याजवळ थोडेच दिवस उरले आहेत , त्या दोघांना एकत्र राहणंच बरं ठरेल . याच मनःस्तिथीमुळे ती शांत होती . तिला आता मनापासून वाटू लागलं कि ती जग सोडून गेल्यावर किरण आणि श्रावणी एकत्र असावं .
काहीवेळात स्वयंपाक तयार झालं . किरण आणि श्रावणी जेवण टेबलवर ठेवले .
श्रावणी -" चल शिवानी जेवायला ये ."
त्या दोघांना बघून तिला बरं वाटू लागलं होत .
किरण -" शिवानी .... येणार आहेस ना ?"
तीच लक्ष विचलित झालं .
शिवानी -" हो ..."
ती उठली आणि टेबलजवळच्या खुर्चीवर बसली . श्रावणी तिला ताट वाढून दिली . तिने एक घास तोंडात घातली .
शिवानी -" अगदी मस्त झालंय श्रावणी . तुम्हीही बसा ना ."
किरण -" हो .."
तिघेही जेवण आटपले . किरण रूमकडे निघाला . श्रावणी आणि शिवानी रात्रीची गप्पा मारत बसले .
शिवानी -" मी उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे ."
श्रावणी -" पण उद्यासाठी अजून वेळ आहे ."
शिवानी -" माझ्या जीवनातील शेवटची ट्रिप .."
श्रावणी -" शेवटची ??"
शिवानीची जीभ घसरली होती . श्रावणीही तीच बोलणं समजून घेतली होती .
शिवानी -" म्हणजे या नंतर परत कधी फिरणं होईल सांगता येत नाही ना ."
ती काहीतरी बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केली . अखेर श्रावणी म्हणाली .
श्रावणी -" आता गप्पा पुरे शिवानी . चल गोळी घे आणि झोप ."
असं म्हणत ती उठली आणि तिला गोळी दिली . शिवानी नाक मुरडत गोळी घेतली आणि झोपी गेली . श्रावणीही बेडवर पडली . पण तिला उद्याच चिंता वाटत होती . काय होईल ? कसं होईल ? असे कित्येक प्रश्न तिच्या मनात येत होते . विचार करतानाच तिला झोप आलं आणि झोपी गेली .
दिवस उजाडलं तस श्रावणी कामाला लागली . ऑफिसमधून रज्जा तिने आधीच घेतली होती . दुपारची ट्रेन असल्याने तिला कामात गडबड करावं लागणार होत . शिवानीही तिला कामात मदत करत होती . सर्वकाही बॅग पॅक झाल्यावर हे दोघे शांत झाले .
दुपारचे बारा वाजले होते . हे पाहून दोघेही तयार होऊ लागले . शिवानीने रोजच्या प्रमाणे शॉर्ट्स आणि वरून टि शर्ट घातली होती . डोक्यावर गोल अशी टोपी आणि मोकळे सिल्की केस सोडलेली , पाठीवर मोठंसं बॅग घातली होती . शिवानी त्यात खूप खुलून दिसत होती . श्रावणीलाही शिवानीने तशीच ड्रेस घालण्यासाठी सांगितली . तीही तशीच तयार झाली .
इतक्यात किरण घरी आला . तोही तसाच तयार झाला होता . पाठीवर मोठीशी बॅग , शॉर्ट्स घातलेला , त्यावर टी शर्ट आणि डोळ्यावर गॉगल .
किरण -" चला निघूया . मी तिकीटही काढलोय . "
शिवानी -" चला ... आज खूप मज्जा येणार आहे . "
श्रावणी -" हो चला ... "
घर बंद करून ते स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षा पकडले . काहीवेळात ते स्टेशनमध्ये पोहचले होते . गाडी प्लॅटफॉर्मवर नुकतीच लागली होती . तिघेही त्यांच्या सीटवर बसले . शिवानी आणि किरण एकमेकांच्या समोर बसले होते . श्रावणी शिवानीच्या बाजूला बसलेली होती .
गाडी निघण्याची वेळ झालेली होती . अचानक एक मुलगी किरणच्या बाजूला येऊन बसली . किरणला थोडं धक्का लागल्याने तो तिकडे पाहिला . श्रावणी आणि शिवानी या दोघींचं लक्ष तिकडे गेलं . ती गडबडीत गाडीमध्ये चढली होती . ती खूप सुंदर दिसत होती .
*******************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच . सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराच्या सदस्यांना दिवाळीचे खूप सारे शुभेच्छा ... हि दिवाळी गोड जावं हि ईश्वरी प्रार्थना .... हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद