श्रावणी डब्बा भरून घरातून निघाली होती . पण तिच्या मनात प्रश्नाचे जाळे निर्माण झाले होते . तिचं लक्ष पूर्ण त्या विचारात हरपून गेलं होतं . एक मन तिला सांगत होत कि ' तू जा तुझ्या घरी . तुझा नवरा जे करेल ते तुझ्या नशिबात मांडून ठेवलाय , नाहीतर तुझं आयुष्य सरिता सारखं होऊन बसेल .' दुसरं मन सांगत होत कि ' काहीही होऊदेत तू एकटी राहा .' तिला काहीही कळत नव्हतं . हेच विचार करता करता ती हॉस्पिटलला पोहचली .
तिच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना नव्हती . तिच्या मनातील प्रश्नांमुळे ती अगदी शांत होती .
शिवानी -" हि बघ आली श्रावणी ."
ती किरणला म्हणाली . श्रावणी डब्बा घेऊन शिवानीजवळ आली .
शिवानी -" मला खूप भूक लागलीय . मला जेवायला दे ना ."
अगदी केविलवाण्या स्वरात म्हणाली . पण श्रावणीच लक्ष दुसरीकडे लागून होती . तिच्या मनात खूप सारे विचार येत होते .
शिवानी -" श्रावणी ..."
तीच लक्ष तरीही वेगळीकडेच लागून होती .
शिवानी -" श्रावणी .."
ती जरा मोठ्यानेच म्हणाली . यावेळी तीच लक्ष विचलित झालं .
श्रावणी -" हा ..."
शिवानी -" मला भूक लागलीय . कुठं आहे लक्ष तुझं ??"
श्रावणी -" कुठं नाही . "
असं म्हणत ती डब्बा उघडली . ती शिवानी जवळ गेली .
शिवानी -" हा दे .."
ती डब्बा घेत असताना श्रावणी डब्बा मागे घेतली .
शिवानी -" काय झालं ?"
श्रावणी -" मी खाऊ घालते ."
असं म्हणत ती तिच्या जवळ बसली आणि एक घास तिच्या तोंडाजवळ घेऊन गेली . श्रावणी शिवानीला जेऊ घालू लागली . खाऊ घालत असताना तिच्या डोळ्यातून न कळत अश्रू खाली वाहू लागले . तिच्या मनात खूप सारे प्रश्नाचे खिचडी तयार झाली होती . तिला एकटी आयुष्य घालवण्यात भीती वाटत होती . वरून शिवानी हे जग सोडून जाण्याचं दुःख तिला होतीच. हे सगळे भावना अश्रूच्या रूपात बाहेर येत होते .
शिवानी अश्रूला पाहिली आणि तिचे डोळे पुसत म्हणाली .
शिवानी -" काय झालं गं ?"
श्रावणी मन हलवत म्हणाली .
श्रावणी -" काही नाही गं ..."
शिवानी -" खरंच ??"
श्रावणी -" आय मिस यु शिवानी .."
ती रडत तिच्या मिठीत गेली .
शिवानी -" अगं अजून मला वेळ आहे वेडी .."
ती स्मित करत म्हणाली . श्रावणी तिच्या मिठीतुन बाहेर आली . शिवानी तिचे डोळे पुसत म्हणाली .
शिवानी -" मला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हा दोघांसोबत जगायचं आहे . "
तिच्या चेहऱ्यावर मरण्याच दुःख दिसत नव्हतं . तिला फक्त एक एक क्षण मनाने जगायचं होतं .
श्रावणी - " हम्म .."
ती घास भरवत म्हणाली . जेवण संपताच श्रावणी शिवानीला गोळी दिली . काहीवेळ शांततेत गेलं .
शिवानी -" अरे गप्प का झालात ? "
श्रावणी -" अगं असं काही नाहीये . फक्त थोडं थकले ."
शिवानी -" अरे तुम्ही बाहेर जा . बोलून घ्या ."
श्रावणी -" अरे मग तू ?"
शिवानी -" मला खूप झोप यायलीय . मी झोपणार आहे . तुम्ही जा ."
किरण -" ठीक आहे ."
श्रावणी -" हम्म .."
दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर आले . दोघात एक वेगळीच शांतता पसरली होती . शांतता मोडण्यासाठी किरण म्हणाला .
किरण - " तू जेवलीस ?"
ती फक्त मान हलवत नकार दर्शवली .
किरण -" पण मला भूक लागलीय ."
श्रावणी -" घरी स्वयंपाक करून ठेवले ."
किरण -" चल मग घरी ."
श्रावणी -" हम्म .."
किरण गाडी काढला . श्रावणी गाडीच्या मागे बसली. किरण गाडी घरच्या दिशेनी चालवू लागला . श्रावणीच्या मनात खूप काही विचार चालू होते . त्याबाबत तिला किरणला सांगायचं होत .
किरण गाडी अपार्टमेंटच्या खाली थांबवला . श्रावणी गाडीवरून खाली उतरली . उतरताच ती पायऱ्या चढू लागली . गाडी पार्किंगला लावून किरणही तिच्या मागे पायऱ्या चढू लागला . श्रावणी शांत वाटत होती . किरणला तीच हे शांतपणा खटकत होता . घरी पोहचताच श्रावणी किचनमध्ये गेली. दोन ताट लावली आणि किरणला बसण्यास सांगितली . दोघे शांतपणे जेवून घेतले . जेवण्याचा वेळी दोघेही शांत होते . किरणला त्याच्या मनातील भावना व्यक्त करायचं होतं . पण त्याला तशी वेळ भेटत नव्हती .
श्रावणी किचनमधील काम आटपली. किरण बाल्कनीत तिच वाट पाहत उभा होता . श्रावणीलाही त्याच्याशी बोलायचं होतं . म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन उभी झाली . दोघेही बाल्कनीत शांतपणे उभे होते . किरण तिला पाहताच म्हणाला .
किरण -" अरे .. तू आलीस ? सांग कि तुला काय सांगायचं होत ?"
श्रावणी शांतपणे बाल्कनीच्या खाली पाहत होती . तिला शांत पाहून किरण म्हणाला .
किरण -" शिवानी विषयी विचार करत आहेस काय ?"
श्रावणी -" हम्म .."
किरण -" काय विचार करायलीस ?"
श्रावणी त्याच्याकडे पाहत म्हणाली .
श्रावणी -" शिवानी नंतरच्या आयुष्याबद्दल .."
किरण -" हम्म .."
तोही शांत झाला . त्याला मनातल्या मनात भीती वाटत होती . प्रेमाची कबुली देताना ती काय म्हणेल ? याची भीती त्याला वाटत होती .
श्रावणी -" तुला सरिता माहिती आहे का ?"
तो तिच्याकडे पाहिला आणि म्हणाला .
किरण -" नाही .."
ती सारिताविषयी त्याला सांगू लागली . लग्नानंतरच्या तिच्या आयुष्याविषयी त्याला सांगितली . सरिता आयुष्यभर एकटीपणात घालवली आणि अखेरचा श्वासही एकटेपणात घेतली .
किरण -"हम्म ... खूप वाईट घडलं ."
श्रावणी बाल्कनीच्या खाली पाहत होती .
किरण -" मग ? तुझ्या आयुष्याचं आणि सरिताच काय संबंध ?"
श्रावणी त्याच्याकडं पाहत म्हणाली .
श्रावणी -" शिवानी गेल्यावर मी कुठं जाऊ ? परत नवर्याकडे का माहेरी ? माहेरी तर आयुष्यभर राहू शकत नाही ना . जर एकटी राहिली तर सरिता सारखं आयुष्य होऊन बसेल याची भीती वाटत आहे ."
किरण -" मग काय ठरवलीस ?"
श्रावणी -" या वयात मी बाबांवर ओझं होऊ शकत नाही . एकटी ही राहण्याची ताकद माझ्यात नाहीये . "
किरण -" मग ?"
ती हळू आवाजात म्हणाली .
श्रावणी -" मी परत त्यांच्याकडे जाणार आहे ?"
किरण -" काय ???"
तिचा हा निर्णय ऐकताच किरणला धक्काच बसला .
किरण -" म्हणजे राहुलकडे ??"
तो परत तिला प्रश्न विचारला .
श्रावणी -" हो .."
किरण -" अगं मग तुझ्या आयुष्याचं काय ? तो परत तुझ्याशी पाहिल्यासारखं वागेल . "
श्रावणी -" एकटी राहण्याच्या दुःखापेक्षा ते दुःख छान वाटेल मला ..."
किरण -" अगं पण ??"
श्रावणी -" पण काय ? किरण एका मुलीला समाजात एकटी राहायला अवघड असतं . "
किरण -" तुझ्या आयुष्याचं काय ?"
श्रावणी -" सगळ्यांचं आयुष्य खुशीत जात नसत किरण .."
हे म्हणत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू खाली आले . किरण हे ऐकताच त्याला त्याच्या मनातील भावना सांगू शकला नाही . त्याला आता त्याच्या आयुष्यातला महत्वाची निर्णय घ्यावा लागणार होता . तो विचारात पडला .
*********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच . परीक्षा असल्याने हा भाग उशिरा आला आहे . त्याबद्दल क्षमस्व . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . पुढे काय होईल असं तुम्हाला वाटत ????
आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा