मनातील भावना!
मनातील भावना सांगण्यास
शब्द पडले माझे अपुरे
अक्षरांनी केला संप
अबोलतेचा सुटला गंध
कासावीस ह्या मनाला
अबोलतेने केले हैराण
कैक प्रयत्न करूनही
जुळले नाही प्रेमबंध
कातरवेळी आठवण
मनाला करे वेडे
चूक माझी काय?
प्रश्न भेडसावे सदा
भूतकाळाचे पान
भविष्यावर पडे भारी
पुन्हा वर्तमानातही
लागे आस नवी
जीवघेण्या अस्तानंतर
दिसे आशेचा सूर्य नवाकोरा
शब्द पडले माझे अपुरे
अक्षरांनी केला संप
अबोलतेचा सुटला गंध
कासावीस ह्या मनाला
अबोलतेने केले हैराण
कैक प्रयत्न करूनही
जुळले नाही प्रेमबंध
कातरवेळी आठवण
मनाला करे वेडे
चूक माझी काय?
प्रश्न भेडसावे सदा
भूतकाळाचे पान
भविष्यावर पडे भारी
पुन्हा वर्तमानातही
लागे आस नवी
जीवघेण्या अस्तानंतर
दिसे आशेचा सूर्य नवाकोरा
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा