Login

मनातले प्रेम

प्रेम
मनातले प्रेम हे मनातच विरले
कधी कोणा ते कधीच नाही कळले
मनाला मनाची आस जरी कळली
तरी ते शब्दातून कधीच न बहरली...

मनातले प्रेम मनातच राहिले
मनातच त्याचे गुपित हे दडले
कोणा न त्याची लागावी चाहूल
सगळ्यांच्या नजरे पासून लपवून ते ठेवले.

मनातले प्रेम हे मनातच भिजले
आपल्या प्रेमाचे
रोज नवे स्वप्न ते सजले
नको तो नकार
अन नको त्या नजरा या जगाच्या
लपवून प्रेम हे मनातच केले...

मनातले प्रेम
कधी ना उजागर केले
मनातले प्रेम हे स्वप्नात जगले
प्रेमा सोबत नवे विश्व उभारले....

आता आली आठवण जरी मन भरून येते
एक होता क्षण परि झाली नाही हिंमत कधी
प्रेम आहे तुजवरि न बोलताच
तसेच ते क्षण मागे हरवून गेले.....

मनातले प्रेम हे मनातच राहिले
मनातल्या गाभाऱ्यात
त्याचे चित्र हे रेखाटले.
आठवणीत त्याच्या प्रेम हे जिवंत राहिले.
मनातले प्रेम हे मनातच राहिले....