Login

ओढ नात्याची

ओढ नात्याची
साथ तुझी मला लाभली
आस ही उरी जागली
न सांगता तुजला
माझ्या मनाची
व्यथा का रे कळली

साद ही ह्रदयाला
ह्रदयाने घातली
अबोल ही प्रिती
भावनेने वाढली

नकळत नयनही
बोलती तुज
गुपित माझ्या मनाचे
सांगती ते गुज

कळेल का तुला
कधी न सांगताही सर्व
समजतील का कधी
माझ्या मनाची रे आस

हाच असतो सतत
प्रश्न माझ्या मनी
करशील का कधी
मला तुझ्या ह्रदयाची रे राणी

भावनेचा स्पर्श हा
मनाला लागला
वेड हा प्रेमाचा तुझ्या
जीवाला लागला

ओढ सतत तुझी
माझ्या मनात आहे
आठवणीत तरी मी
तुझी आहे का रे राजा
0