Login

नाती मनाची

नाते मनाचे
जुळतात नाती घेऊन
आपुलकीची जाणीव
भासू देत नाहीत
कोणाची उणीव.......


   एकमेकांशी जोडली जातात
प्रेमाच्या धाग्यात
घट्ट बांधली जातात
जुळलेल्या नात्यात.......


    नाते हे जुळलेले
मनाने मनाशी
केलेले वादे.......


    प्रत्येक नात्याची असते
वेगळी परिभाषा
बदलून टाकते
जीवनाची दिशा.......


    जुळलेली नाती असतात
मोलाची खूप
त्यातून मिळते रक्ताच्या
नात्याहून ही जास्त ऊब.......


     रक्ताची नसली तरी
मनाशी जोडलेली असतात
जुळलेली नाती
नशीबाने मिळत असतात....

  
     जुळलेली नाती
जपावी लागतात खूप
गैरसमजाने बदलते
नात्याचे रूप.......


     नाती ही जुळलेली
ठेवावी जपून
त्यानेच बदलेल
जीवन जगण्याचे स्वरूप......
0