शीर्षक: निःशब्द भावना
भावना व्यक्त करण्यासाठी
शब्द पडले खूपच कमी
निःशब्द राहूनही सखा
सखीला देई प्रेमाची हमी
शब्द पडले खूपच कमी
निःशब्द राहूनही सखा
सखीला देई प्रेमाची हमी
तिच्यापुढे नेहमी कसा?
होतो तो निःशब्द
प्रश्न पडे त्याला असा
कुठे गेले कोशातले सारे शब्द?
होतो तो निःशब्द
प्रश्न पडे त्याला असा
कुठे गेले कोशातले सारे शब्द?
निःशब्द भावना
झाल्या अनावर
वार प्रेमळ स्पर्शाचा
केला असा मनावर
झाल्या अनावर
वार प्रेमळ स्पर्शाचा
केला असा मनावर
नि: शब्द भावना
मनात येती दाटून
घेतले जणू त्यांनी
प्रीतशब्द दोघांत वाटून
मनात येती दाटून
घेतले जणू त्यांनी
प्रीतशब्द दोघांत वाटून
तिने समजून घेतले
निःशब्द त्याचे बोल
उमजले दोघांनाही
खऱ्या प्रीतीचे मोल
निःशब्द त्याचे बोल
उमजले दोघांनाही
खऱ्या प्रीतीचे मोल
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा