मनातल्या नात्याला
आस ही प्रेमाची
कधी कशी उजागर होईल
प्रीत ही मनातली
आस ही प्रेमाची
कधी कशी उजागर होईल
प्रीत ही मनातली
प्रेम हे दोघांतले
माहीत या मनाला
शब्दावाचून अडवले
उगाच या क्षणाला
माहीत या मनाला
शब्दावाचून अडवले
उगाच या क्षणाला
प्रेम गीत हे कानी पडता
नाव येते तुझेच ओठी
कधी कळेल का तुला
माझ्या मनातील हळवी
प्रेमाची रे प्रचिती
नाव येते तुझेच ओठी
कधी कळेल का तुला
माझ्या मनातील हळवी
प्रेमाची रे प्रचिती
मनातल्या भावना
मनातल सावरल्या
तुच यावे समोरून
अन् मागणी घालावी या
आपल्या प्रेमाच्या नात्याला
मनातल सावरल्या
तुच यावे समोरून
अन् मागणी घालावी या
आपल्या प्रेमाच्या नात्याला
प्रेम हे आपले व्हावे पूर्ण जीवनात
आशिर्वाद घेऊन मोठ्यांचा
सुरू करावा संसार
स्वप्न हे माझे साकार व्हावे
आशिर्वाद घेऊन मोठ्यांचा
सुरू करावा संसार
स्वप्न हे माझे साकार व्हावे
तुच माझं जग अन्
तूच माझा जीवनसाथी बनावे
तूच माझा जीवन साथी बनावे....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा