Login

मकर संक्रांति

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
मराठमोळा सण आपला
मकर संक्रांतीचा आज
सगळे मिळून साजरा
करु आनंदाचा हा साज

रंगबिरंगी पतंग हवेत
वर उंच उंच उडू दे
सगळ्यांवरचे संकट देवा
येण्या आधीच टळू दे

कृषी संस्कृतीचा महिना
परंपरा ही भारताची
सुगडभरून वाण देऊन
प्रार्थना करू सौभाग्याची

दान तिळाचे पुण्य लाभते
गुळ ही त्यात घाला
सगळ्यांच्या हातात तीळ लाडू देऊन
' तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...'