Login

भोगी

भोगी चा सण
भोगी चा सण

भोगीचा सण आज
आला आपल्या अंगणी
सणांची ही सुरुवात पाहून
आनंद आज झाला मनी

बाजरीच्या पिठाला तीळ
लोणी लावून करू भाकर
मिश्रित भाजी एकत्र करू
स्वाद येईल त्याला रुचकर

रब्बी हंगामातील पिकांचे
देवाला आपण पूजन करूया
धनधान्याची भरभराट राहो
असे मागणे मनापासून मागूया

भोगीच्या भाजी प्रमाणे
आपल्यातली विविधता दिसावी
भाकरीच्या स्वादा प्रमाणे
यशाची नवी शिखरे गाठावी

झाली आहे आता नवीन
वर्षाच्या ही सणांची सुरुवात
आनंद घेऊन येवो हे सण
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात....

एकता निलेश माने