आली दिवाळी दिवाळी
सोन्या रूपाने ओवाळी
सण हा दिपकांचा
ठेवा हा संस्कृतीचा......
दिव्याची ही वात
जळे तेला तुपाची ही ज्योत
करून तिमीर दूर
करी लख्ख हा प्रकाश......
जळे तेला तुपाची ही ज्योत
करून तिमीर दूर
करी लख्ख हा प्रकाश......
जळतो हा दिवा
देई जगण्या आधार
स्वत सोसून तो ताप
देई इतरांना सुखाचे ते माप......
देई जगण्या आधार
स्वत सोसून तो ताप
देई इतरांना सुखाचे ते माप......
दिपकांच्या जळण्याने
लक्ष्मी ओलांडते माप......
लक्ष्मी ओलांडते माप......
सकाळच्या पारामंधी
येई लक्ष्मी आपल्या दारा
करून सडा सारवण
दारी रांगोळी ही काढा.....
येई लक्ष्मी आपल्या दारा
करून सडा सारवण
दारी रांगोळी ही काढा.....
सण हा पूजनाचा
शस्त्र अन साहित्याचा
वसा हा परंपरेचा
आपल्या घरच्या लक्ष्मीचा.......
शस्त्र अन साहित्याचा
वसा हा परंपरेचा
आपल्या घरच्या लक्ष्मीचा.......
सण हा औक्षणाचा
बहिण भावाच्या नात्याचा
ओवाळून भावाला
मागे वरदान देवीला......
बहिण भावाच्या नात्याचा
ओवाळून भावाला
मागे वरदान देवीला......
सुखी ठेव माझा भाऊराया
माझा हा पाठीराखा. ....
माझा हा पाठीराखा. ....
घट्ट होऊ दे ते नाते अन
आमच्या नात्याची ती वीण
बहिण भावाचे ते नात
वाढे भाऊबीजेच्या सणात......
आमच्या नात्याची ती वीण
बहिण भावाचे ते नात
वाढे भाऊबीजेच्या सणात......
पती पत्नी च्या नात्याला
येतो गोडवा पाडव्या ने
ओवाळून पतीला
पत्नी मागे सुख हे हक्काने......
येतो गोडवा पाडव्या ने
ओवाळून पतीला
पत्नी मागे सुख हे हक्काने......
सण हा आनंदाचा
वारसा हा परंपरेचा
ठेवतो बांधून एकमेकांना
सण हा आपुलकीचा.......
वारसा हा परंपरेचा
ठेवतो बांधून एकमेकांना
सण हा आपुलकीचा.......
सण हा दिवाळीचा
दीपोत्सव हा नात्याचा........
दीपोत्सव हा नात्याचा........
प्रेमाच्या ज्योतीचा अन
आपुलकीच्या धाग्याचा
बहरतो हा संसार
संस्काराच्या दिव्यांचा.......
आपुलकीच्या धाग्याचा
बहरतो हा संसार
संस्काराच्या दिव्यांचा.......
सण दिवाळीचा आला
घेऊन मायेचा प्रकाश हा सारा
झगमगती दाही दिशा
तेज प्रेमाचा पसरला........
घेऊन मायेचा प्रकाश हा सारा
झगमगती दाही दिशा
तेज प्रेमाचा पसरला........
आली दिवाळी आली
सोन्या रूपाने ओवाळी
सण हा दिपकांचा
ठेवा हा संस्कृतीचा........
✍️स्वागंधरा
सोन्या रूपाने ओवाळी
सण हा दिपकांचा
ठेवा हा संस्कृतीचा........
✍️स्वागंधरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा