अस्तित्व एक संघर्ष
भाग-७३
प्रेरणा आणि रेखा दोघींच्या हातावरच्या मेहेंदीचा रंग दुसऱ्या दिवशी खुलला होता. दोघींच्या मामेभाऊ, बहिणींनी त्यांना प्रतिक आणि राजीवच्या नावाने चिडवून चिडवून हैराण करुन सोडलं होतं. हातातल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या मेहेंदीचं सौंदर्य वाढवत होत्या.
***
प्रतिकच्या रुममध्ये प्रतिक आणि राजीव बाजू बाजूला बसून प्रेरणा-रेखाने त्यांना मोबाईल वर पाठवलेला डान्स पाहत होते. ते दोघे विडिओ बघण्यात इतके मग्न होते की त्या दोघांच्या मध्ये येऊन सोना चिप्स खात बसली आहे हे ही त्यांच्या लक्षात आलं नाही.
सोना: (दोघांना) काय बघताय, तुम्ही दोघ... मला पण बघू दे की...
प्रतिक, राजीव: दीदी तू कधी आलीस...
सोना: हं, अजून तुमच्या बायका ही घरात आल्या नाहीत आणि आतापासूनच तुम्ही दोघे मला विसरलात...
राजीव: (मुद्दामून तिला चिडवण्यासाठी) हो ना दीदी, मी ही तोच विचार करतोय आता... खरंच आम्ही तुला विसरलो तर तू एकटी पडशील... तुझ्या बरोबर प्रतिकची मस्करी करणार कोणी नसेल... राजीवचं बोलणं ऐकून सोना ही थोडी इमोशनल होऊन विचार करु लागते आणि राजीव प्रतिक तिला असं पाहून एकमेकांना टाळी देऊन हसू लागतात. विचारात बुडून गेलेल्या सोनाचं त्यांच्या कडे बिलकुल लक्ष नसतं.
सोना: (विचारात असतानाच मोठयाने बोलते) नाही नाही असं नको व्हायला...
दोघे: (हसणं लपवत) दीदी, काय नको व्हायला...?
एव्हाना सोनाच्या चांगलंच लक्षात आलं की ते दोघे तिची मस्करी करत आहेत.
सोना: (दोघांचा कान पकडून) माझी मस्करी करतात काय रे...
दोघे: दीदी, दुखतंय सोड ना...
सोना: मग say sorry to me... असं इग्नोर नाही करायचं मला...
प्रतिक: दीदी, actually आम्ही तुला इग्नोर नव्हतं केलं... ते आम्ही प्रेरणा आणि रेखाच्या मेहेंदीच्या वेळचा डान्स विडिओ बघत होतो.
सोना: what... मला पण दाखवा... मला पण बघायचा आहे... म्हणत तिने चिप्स प्लेट प्रतिकच्या हातात देऊन त्याचा मोबाईल खेचून घेतला. मग तिघेही चिप्स खात खात विडिओ बघू लागले.
***
चौघांच्या घरी बरेच नातेवाईक आले होते. रेखाच्या मावशीच्या 2 जुळ्या मुली होत्या. रेखा आणि त्यांच्या मध्ये जास्त वयाचं अंतर नसल्याने त्या रेखाशी बहिणीपेक्षा मैत्रीणी म्हणून वागायच्या. दोघी जुळ्या असल्या तरी एकमेकींच्या अगदी विरुद्ध होत्या. एक होती लीना जिला फक्त traditional look मध्ये रहायला आवडे. लांबसडक केस, हातात बांगड्या, डोक्यावर बिंदी आणि कानात झुमके. त्याच्या अगदी विरुद्ध तिच्यापेक्षा काही मिनिटे मोठी असलेली तिची जुळी बहीण टीना. मानेपर्यंतचे केस, कानात tops earrings, सदैव western look prefer करणारी, कोणा मुलाने कोणत्या मुलीची छेड काढली तर सनकन कानाखाली वाजवणारी... दोन्हीही मुली सगळ्या कामात निपुण असल्या तरी त्यांचे बाबा म्हणजे राजेश फाटक आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नाच्या विचाराने सतत काळजीत असायचे. कारण बघायला यायचे टीनाला आणि पसंत करायचे लीनाला... आता तर रेखाचं ही लग्न ठरलं आहे म्हणताक्षणी त्यांना आपल्या मुलींची अजूनच काळजी वाटू लागली होती. त्यांना असं काळजीत सोफ्यावर एका ठिकाणी गप्प बसलेलं पाहून रेखाच्या बाबांनी म्हणजे आनंद सरनाईक यांनी न राहवून त्यांना त्यामागचं कारण विचारलंच..
आनंद: काय झालं फाटक साहेब तुम्ही असे शांत शांत का...?
राजेश: एका मुलीच्या बापाला अजून कसली काळजी असणार... आपल्या मुली चांगल्या घरात जाव्यात आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये.
आनंद: अहो मग कशाला एवढी काळजी करत आहात...!! आपल्या टीना-लीना दोघीही लाखात एक अशा आहेत. चला बघू तुम्ही माझ्या बरोबर...
राजेश: कुठे आनंदराव...?
आनंद: आमच्या सौ नी काही सामान आणायला सांगितलं आहे... त्याच निमित्ताने पाय मोकळे करुन येऊ... आणि नका करु इतकी काळजी... लग्नाच्या गाठी या त्या वरच्याने बांधल्या आहेत... त्या जुळणार त्या आपोआपच जुळणार... आणि काय माहिती आमच्या रेखाच्या लग्नात टीना-लीना ला स्थळं ही स्वतःहून येईल.
राजेश: (एकदम आनंदाने सोफ्यावरुन उठत) तुम्ही माझं मन एकदम शांत केलं... खरंच असंच झालं तर हे आकाश पण मला ठेंगणच होईल...
आनंद: (हसून) चला तर मग माझ्या बरोबर सामान खरेदीला...
तसे दोघेही हसत हसत सामान आणायला बाहेर पडले.
***
दुसऱ्या दिवशी...
"अरे मिलिंदा, हळदीचा कार्यक्रम कधी सुरु करायचा तो...." आजींनी मोठ्याने प्रतिकच्या बाबांना आवाज दिला.
मिलिंद: आई, हो हो करूया सुरु... टेरेसवर एकदा अरेंजमेंट बघायला नंदाचा भाचा सुमित आणि राजीवचा मावसभाऊ राजन गेले आहेत.
आजी: बरं... बाकी हळद वगैरे सगळं तयार आहे ना... आणि लवकर सुरु करा रे... ते मुलींच्या घरी पण उष्टी हळद पाठवायची आहे.
सोना: हे काय आजी, आणली बघ हळद आम्ही...
आजीने सोनाकडे पाहिलं. तिने लिंबू रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्या मागोमाग नंदा, राजीवची आई मालती मोहिते हळदीचं भांड घेऊन आल्या.
सोना: आजी, कशी दिसतेय मी...
आजी: नको ग बाय मला विचारु, माझीच नजर लागायची तुला...
सोना: (आजीला जवळ घेत) आपल्या माणसांची नजर लागत नसते... आज नाचणार ना मग माझी मधुबाला...
आजी: (काहीशी लाजत) काहीही काय सोना, मधुबाला काय... ? कोणी ऐकलं तर काय म्हणेल...?
सोना: (तिचे गाल ओढत) मग आहेसच तू माझी मधुबाला...
आजी: हल्ली जास्तच चावटपणा सुचू लागलाय तुला.... जावई बुवांना जरा तुला दमात घ्यायला सांगायला हवं...
समीर: (हसून आजीकडे येत) आजी, माझी एवढी बिशाद... सोनाला दम भरायची... मी तर बायकोला घाबरुन राहणारा एक गरीब नवरा आहे...
सोना: गप्प हां समीर, मारच खाशील...
समीर: बघा आजी, तुमच्या समोर इतकं बोलते मग मागून किती झापत असेल मला...
त्याचं बोलणं ऐकून सोनाचा चेहरा पडला.
समीर: आजी, पण खरं सांगू तर.. सोना आहे म्हणून मी आहे.. खूप काळजी घेते माझी.... हां थोडी विनाकारण रागावते... कधी कधी रागात मारते ही... पण तिच्या हातचा मार खाण्यात ही वेगळीच मजा आहे...
समिरचं बोलणं ऐकून आजीसकट सगळ्यांना हसू आवरेना. सोनाने तर लाजून खूश होऊन आजीला मिठीच मारली. तेवढ्यात राजीव, प्रतिक त्यांच्या cousins बरोबर तयार होऊन आले. मागोमाग सुमित, राजन ही अरेंजमेंट सगळी प्रॉपर असल्याचं सांगायला आले.
दोघे: (समीरला पाहून) जीजू आलात तुम्ही... आणि तुमचे दादा वहिनी, चिनू, आईबाबा ते नाही आलेत...
समीर: ते डायरेक्ट लग्नाला येणार आहेत... ते घरी वहिनीच्या माहेरच्याहून कोणी आले होते... तर ते आज आमच्याकडेच थांबणार आहेत... तर आई बाबा म्हणाले, आम्ही लग्नालाच येऊ म्हणून...
प्रतिक: अच्छा, पण आज थांबायचं बरं का...
राजीव: हो हो जीजू, एक नाहीतर 2 मेहुण्यांची हळद आहे तुमच्या...
सुमित: दादा, वरची सगळी अरेंजमेंट चेक केली सगळं व्यवस्थित आहे.
आजी: चला चला निघूया आता, लवकर सुरु करु आता हळदीचा कार्यक्रम...
तसे सगळेजण हळदीचा कार्यक्रम करायला टेरेसवर गेले. रिवाजाप्रमाणे प्रतिक आणि राजीव दोघांना हळद लावण्यात आली. तसे सोना सकट सगळी भावंडं त्या दोघांना हळदीने रंगवायला तुटून पडले.
आजी: सोना, सोना सांभाळून जरा...
सोना: हो हो आजी... म्हणत तिने दोघांचे चेहरे पूर्ण हळदीने रंगवून टाकले.. मग तिने समीरला ही हळद लावली.
त्या दोघांना पाहून सगळेजण हसू लागले.
राजन: सोना दीदी, तू तर आमच्या साठी हळद लावायला चेहरा बाकीच नाही ठेवला..
सोना: अरे बाकी कसं नाही ठेवलं म्हणतोय... हे काय तुम्ही आहात ना बाकी सगळे म्हणत तिने राजनला हळद लावली.
राजन: दीदी... पुरे ना...
समीर: (हसत हसत) राजन, ती सोना आहे, तिला थांब म्हंटल तर ती अजून रंगवणार... त्यापेक्षा गप्पपणे हळद लावून घे माझ्या सारखं....
सोना: आता बघ राजन, तुझं पण लग्न लवकर ठरणार...
राजन: लग्नाचा आणि हळदीचा काय संबंध...?
मालती: अरे राजन, नवरदेवाची हळद लावली की लवकर लग्न होतं असं म्हणतात. हे ऐकून सुमित धावत धावत सोनाकडे आला.
सुमित: दीदी, मला पण लाव ना हळद.
नंदा: सुमित, खूपच घाई झाली वाटतं लग्नाची तुला..
सुमित: (स्वतःच्या केसांवरुन हात फिरवत) ते आत्या...
आजी: नंदा, करु दे की मजा त्यांना... आता नाहीतरी तसं ही त्याचं लग्नाचं वय झालंच आहे की..
सोनाने लगेचच सुमितला पण हळद लावली.
सुमित: अरे, कोण आहे रे तिकडे लावा रे गाणं.
आणि गाणं सुरु झालं. सुमितने राजनला त्याच्या बरोबर ओढत नेत गाण्याप्रमाणे नाचण्याचा ताल धरला..
आकाशाला आम्ही बांधतोय तोरण
तारे लावतोय लायटिंगला
आकाशाला आम्ही बांधतोय तोरण
तारे लावतोय लायटिंगला
झगामगा सारा करतोय मंडप
सोनेरी पताका शायनिंग ला
त्याच्या मागोमाग सोना समीरला घेऊन नाचायला आली. तिने कमरेवर हात ठेवून समीरकडे पाहून हातवारे करत गाण्याचा ताल धरला.
लग्नाची बेडी जुळली हाय
लग्नाची बेडी जुळली हाय
आज हळद लावायची हाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
समीरने ही मग पुढच्या कडव्यावर ताल धरला...
लायटिंग केलं हाय
अरें डीजे लावला हाय
आर लायटिंग केलं हाय
मित्रा डीजे लावला हाय
लायटिंग केलं हाय डीजे लावला हाय
नाचून नाचून यडे झालो
लायटिंग केलं हाय डीजे लावला हाय
दुकाय लागले पाय
आणि त्याने खरंच पाय दुखत असल्याची acting केली. आजीने नंदाला सांगून सुमित आणि राजनकडे प्रेरणा आणि रेखासाठी उष्टी हळद पाठवली.
पुढच्या कडव्यावर राजीव ही त्यांच्या बरोबर सामील झाला आणि प्रतिककडे हात करुन नाचू लागला.
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात
भाऊ होता आमचा वेटिंग ला
स्वप्नातली याला परीच भेटली
दिवस गेले किती सेटिंग ला
त्याने प्रतिकला उठवून त्याच्या बरोबर नाचायला ओढलं. मग त्याने ही पुढच्या कडव्यावर राजीवकडे पाहत ताल धरला.
आर म्हणूनच
रातीचा दिवस करायचा हाय
रातीचा दिवस करायचा हाय
आज धिंगाणा घालायचा हाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
सोना आपल्या आणि राजीवच्या आईबाबांना ही नाचायला घेऊन आली.. त्यांनी ही मग गाण्याचा ताल धरला... दोघांच्या बाबांनी तर दोघांच्या आईंचा हात पकडत म्हटलं...
काका आला हाय
अन मामा आला हाय
आर काका भी आला हाय
मित्रा ममा भी आला हाय
काका आला हाय मामा आला हाय
आले सारे गाववाले
काका आला हाय मामा आला हाय
परवा करायची नाय
सोना-समीर सगळ्या नातेवाईकांना नाचवून झाल्यावर आजीकडे वळले. दोघांनी जबरदस्तीने आजीला ही नाचण्यासाठी ओढलं. आजीने प्रतिक, राजीवच्या डोक्यावरुन हात फिरवत गाण्याचा ताल धरला...
लग्नाची बेडी जुळली हाय
लग्नाची बेडी जुळली हाय
आज हळद लावायची हाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय..
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय…
आजीने मग कमरेवर हात ठेवत गाण्यानुसार नाचण्याचा ताल धरला. प्रतिक-राजीवही तिच्या बरोबर नाचू लागले. दोघांच्या हळदीचा कार्यक्रम एकदम रंगात पार पडला.
***
राजन सुमित दोघेही प्रतिकची कार घेऊन उष्टी हळद द्यायला निघाले होते.
राजन: यार, तू एकटंच जायचं होतं ना...
सुमित: अरे मी ऐकलंय, दादांच्या मेहुण्या खूप भारी दिसतात... बघू आपल्याला कोणी आवडते का ते...
राजन: हेच मला तुझं पटत नाही... परस्त्री ही मातेसमान असते...
सुमित: (हसत) काय म्हणालास तू... परस्त्री ही मातेसमान असते... अरे माझ्या साठी पण परस्त्री मातेसमानच आहे... पण आपल्या दोघांच्या आयुष्यात अजून आपली स्त्री कुठे आली आहे... आणि तिचाच तर शोध घ्यायला मी तुला माझ्या बरोबर आणलं आहे.
राजन: मला हे असं नाही करायचं... आईबाबा सांगतील मी त्याच मुलीशी लग्न करणार आहे...
सुमित: (पुन्हा हसत) आणि कधी पडलासच एखाद्या मुलीच्या प्रेमात तर...
राजन: नाही शक्य नाही ते...
सुमित: (काही विचार करत) हो खरंच शक्य नाही रे... एखाद्या अनोळखी मुलीशी बोलताना तू इतका लाजतोस... मग तिला लग्नासाठी विचारणं तर खूपच मोठी गोष्ट आहे....
बोलता बोलता सुमितने अचानक कार थांबवली.
राजन: अरे कार का थांबवली...?
सुमित: अरे आलो आपण हॉलकडे...
राजन: अरे आलो पण... बरं मी काय म्हणतोय दोन्ही वहिनीची हळद एकत्रच आहे ना की आपल्याला दुसरीकडे परत जावं लागणार आहे.
सुमित: इथेच आहे रे... एक काम कर... तू पुढे हो... मी कार पार्क करुन येतोच मागून...
राजन: हं ठीक आहे, पण पटकन ये रे...
सुमित: हो रे, कोणी खाणार नाही आहे तुला...
राजन त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून हॉलच्या दिशेने जायला निघाला.
***
हॉल मस्तपैकी हळदीची theme लक्षात घेऊन पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेला होता. आत मध्ये मरून रंगाच्या पडद्याना पांढऱ्या रंगाची झालर लावली होती. सगळ्यांनी ठरवून कपड्यांसाठी theme कलर ठरवले होते. पुरुष मंडळींनी पांढऱ्या रंगाचा सदरा पायजमा घातला होता तर महिलावर्गाने वेगवेगळे रंग ठरवून त्या त्या रंगाचे ग्रुप बनवून कपडे घातले होते. रेखा आणि प्रेरणा नुकत्याच तयार होऊन बसल्या होत्या. दोघींनी पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. पिवळ्या रंगाची आर्टिफिशिअल ज्वेलरी घातली होती. फोटोग्राफर त्यांचे वेगवेगळ्या अँगल ने फोटो काढत होते.
प्रेरणा आणि रेखाचे आईबाबा हळद कधी येतेय त्याची वाट पाहत होते.
***
टीना: लीना, तू पुढे जा रेखा दीदीचे कपडे घेऊन... मी आले लगेच.. ही scooty पार्क करुन...
लीना: ओके लवकर ये... आपला डान्स पण आहे लक्षात आहे ना...
टीना: हो रे माझी मलाई.... चल लवकर आले मी..
तशी लीना कपडे घेऊन हॉलमध्ये जायला निघाली.
****
हा सुमित पण कुठे राहिला.... राजन विचार करत करत एकदा मागे तर एकदा पुढे बघून चालत होता. चालता चालता नेमका त्याचा पाय पायऱ्या वरुन सटकला. आता आपण पडलोच या आविर्भावात त्याने आई ग म्हणत डोळे घट्ट बंद केले. तो पडायच्या आधीच त्याला अलगद कोणी तरी पकडले. आपल्याला कोणी पकडलं हे पाहायला त्याने बंद केलेले डोळे उघडले... आणि तिला पाहून तो पाहतच राहिला.
टीना: हॅलो, तुम्ही ठीक आहात ना...
राजन: हं... (तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला) छोटेसे केस... गालावर तीळ... कानात कानातले पण छोटे... तो तिला निरखून पाहू लागला...तिला पाहताना त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आपल्याला असं कोणीतरी पहिल्यांदाच पाहतंय ती ही मनात विचार करत त्याला पाहण्यात गुंतली होती. आई ग, हा आवाज ऐकून हॉलमध्ये जायला निघालेली लीना पुन्हा मागे वळली.
लीना: टीना, काय झालं ग... यांना तू असं का पकडलंय...
लीनाच्या आवाजाने दोघेही भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले.
टीना: लीना, अग ते यांचा तोल गेला आणि ते पडणारच होते तेवढ्यात पकडलं त्यांना....
राजनने एकदा लीनाकडे आणि एकदा टिनाकडे पाहिलं आणि त्या दोघी जुळ्या असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो तिला thank you बोलणार इतक्यात सुमित मागून हळद घेऊन आला.
सुमित: काय रे राजन, तू अजून इथेच... आणि इतका काय घाबरला आहेस...
राजन: काही नाही रे...
टीना: लीना, चल आपण जाऊया...म्हणत टीना जाऊ लागली. सुमितचं लक्ष लीना कडे गेलं. लांबसडक वेणी, गालावर तीळ, डोळ्यांत काजळ, हातात बांगड्या, कानात हवेमुळे हलणारे झुमके...
सुमित तिच्याकडे पाहतच राहिला. लीना... तो मनात तिच्या नावाची उजळणी करु लागला. टीना च्या मागोमाग लीना जायला निघाली. ही टीना कुठे जात असेल राजनच्या मनात टीनाच्या मागे जायचा विचार येऊ लागला. काय म्हणेल हा सुमित मी असा पटकन त्यांच्या मागोमाग गेलो तर.. तो विचार करत असतानाच सुमितने जोरात त्या दोघीना आवाज दिला, Excuse me.... टीना आणि लीना दोघींनी मागे वळून पाहिलं. आयला जुडवा... सुमित एकदा लीना कडे एकदा टीनाकडे बघत मनात म्हणाला.
टीना: तुम्ही आम्हालाच आवाज दिला ना... आता...
सुमित: अं हो...( राजनकडे हात दाखवत) ते आम्हाला दोघांना
हळद द्यायला पाठवलं आहे पण आम्हाला नक्की माहीत नाही हा हॉल तोच आहे का ते... हो ना रे राजन... सुमित सारवासारव करण्यासाठी म्हणाला.
राजन: हो हो, सुमित म्हणतोय ते खरं आहे... आम्हाला ते प्रेरणा आणि रेखा वहिनीसाठी हळद द्यायला पाठवलं आहे.
लीना: अच्छा ओके, दीदींना हळद आणली आहे तर... या ना आमच्या बरोबरच... तिने बोलता बोलता तिच्याकडे पाहणाऱ्या सुमित कडे पाहिलं.
तसं टीना- लीना च्या पाठोपाठ सुमित राजन हॉलमध्ये आले. सुमितने रेखाच्या आईला आणि प्रेरणाच्या आईकडे हळद सोपवली. ते दोघे रेखा आणि प्रेरणाशी बोलून तिथून लगेच निघणारच होते तेवढ्यात रेखाच्या बाबांनी आनंद यांनी त्यांच्या बरोबर अशाच गप्पा मारण्यासाठी थांबवलं.
****
प्रेरणा आणि रेखा दोघींची रिवाजाप्रमाणे हळदीची सुरवात झाली आणि सगळ्या बहीण भावांनी त्या दोघींना आळीपाळीने हळद लावायला सुरवात केली. टीना-लीना ही प्रेरणा, रेखाला हळद लावायला सामील झाल्या.
मग अमित, विवेक आणि बाकी बहीण भावांनी पण एकमेकांना हळद लावली. त्यांची आणि सगळ्या मोठ्या मंडळींची आपापसांत हळद लावणं चालू असतानाच speaker वर गाणं सुरु झालं.
हलद लविता ग … सावतया मलयाला
इरा दिल ग.... गावचा देवाला
आली.. हो कुंदा बाई... अकाची माउली
कुंदा आली हळद लावा… अकाबाईचा
ये मावशी, ये ताई
ये कमला, अक्काच्या लग्नाला गाना गा
तसं टीना लीना दोघी ही डान्स करण्यासाठी पुढे आल्या. दोघीनी गाण्यावर ताल धरला.
पहिल्या धारेच्या प्रेमना साला, काळीज केल बाद
ही काळीज केल्या बाद
ही पोली साजूक तुपातली,तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
ही पोली साजूक तुपातली,तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
टीनाने राजन कडे पाहत डान्स स्टेप केली
ऐ अडून अडून करू नक् इशारा भिडू
दे आता डोल्याला डोला,
इथे बी ठिणगी तिथे बे ठिणगी दोघांना पेटू दे आज
राजनने तर लाजून मान खालीच घातली.
ही पोली साजूक तुपातली,तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
ही पोली साजूक तुपातली,तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
यावेळी सुमित आणि लीनाची नजरानजर झाली.
चोरुन जरी ह्यो गॅट मॅट झाला खबर
झालय कोळी वाड्याला,
लागलाय आता तोल सुटाया, इश्काची फुटलिया गाठ
ही पोली साजूक तुपातली, तिला महाव्रयचा लागलाय नाद
ही पोली साजूक तुपातली, तिला महाव्रयचा लागलाय नाद
त्यांच्या बरोबर आता सगळ्या बहीण-भावांनी, मीना-समिधाने ही प्रेरणा-रेखाला घेऊन ताल धरला. मोठी मंडळी ही छोट्या मंडळी बरोबर नाचू लागली. रेखाच्या बाबांनी तर राजन-सुमितला ही त्यांच्या बरोबर नाचायला ओढलं. दोघेही भले आनंदरावांबरोबर नाचत होते तरी त्यांच्या नजरा टीना-लीना कडेच होत्या.
***
हळदीचा कार्यक्रम झाला तसं राजन-सुमितने आनंदरावांचा निरोप घेतला आणि निघणार तेवढ्यात लीनाला हातात पाण्याचा ग्लास घेऊन जाताना बघून सुमितने राजनकडे त्याला तहान लागल्याचं कारण पुढे केलं.
सुमित: ऐकना, मला तहान लागली आहे... आलो मी लगेच पाणी पिऊन... तू थांब इथेच.. म्हणत तो लीनाच्या मागे गेला.
राजन सुमितची वाट पाहत तिथेच थांबला होता. तोच टीना तिथे आली.
टीना: तुम्ही निघालात होतात ना...
राजन: हो ते... सुमितला तहान लागली तो पाणी प्यायला गेला आहे.
परत थोडा वेळ दोघांमध्ये शांतता.
राजन: सॉरी ते तुम्हाला thank you बोलायचं राहून गेलं...
टीना: thank you कशाबद्दल...
राजन: ते तुम्ही मला मघाशी पडताना वाचवलं म्हणून... thank you... तुम्ही पकडलं म्हणून नाहीतर पडणारच होतो.
त्याचं बोलणं ऐकून ती खुदकन हसली. राजन तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, पायऱ्यावर जरी पडताना वाचलो तरी प्रेमात तर तुझ्या मी नक्कीच पडलो आहे.
टीना: काही बोललात का तुम्ही...
राजन: छे कुठे काय... (मनात म्हणतो, हिला ऐकू गेलं की काय मी मनात विचार केला ते...)
टीना: तुम्ही, प्रतिक जीजूंच्या साईडने की राजीव जीजूंच्या...
राजन: राजीव दादाच्या... आणि तुम्ही...
टीना: मी रेखा दीदीच्या... आम्ही मावसबहिणी जरी असलो तरी आम्ही फ्रेंड सारखंच एकमेकांशी सगळं शेअर करतो.
राजन: अच्छा... हा सुमित कुठे राहिला काय माहीत... तुम्ही मला पाणी प्यायची सोय कुठे आहे ते सांगाल का..?
टीना: हो चला, दाखवते तुम्हाला...
म्हणत दोघेही पाणी जिथे मिळत होत तिकडे गेले.
*
सुमित: (लीनापाशी येऊन) मला, थोडी तहान लागली होती... पाणी मिळेल का...?
लीना ने पाण्याचं ग्लास त्याच्या हातात दिलं. सुमित पाणी प्यायला आणि पुन्हा तिच्याकडे त्याने पाणी मागितलं. तिने पुन्हा जाऊन त्याच्यासाठी पाणी आणलं... असं करत करत त्याने चार वेळा तिला पाणी आणायला भाग पाडलं. शेवटी 5 व्या वेळी ती जारच घेऊन आली.
त्या दोघांना असं करताना पाहून टीना आणि राजनला हसू आवरेना. लीना आणि सुमित दोघेही आपली चोरी पकडली गेल्यासारखे त्यांच्याकडे पाहू लागले.
राजन: सुमित, तुला खूपच तहान लागलेली दिसतेय... चल नंदा आत्येला सांगून तुला 5 लीटर पाणी च प्यायला देतो.
त्याचं बोलणं ऐकून सुमितला ठसका लागला.
लीना: हळू जरा, सावकाश पाणी प्यायचं...
सुमित: सॉरी हां, मी तुम्हाला खूपच पाण्यामुळे त्रास दिला.
लीना: its ok...
राजन: सुमित तुझं पाणी पिऊन झालं असेल तर चलायचं का मग...
सुमित: हं चल... त्याने लीनाला हातानेच बाय केलं.
राजनने टीनाकडे पाहिलं. टीनाने ही मग त्याला बाय केलं.
राजन सुमित दोघेही किल्ला सर झाल्याच्या आविर्भावात तिथून निघाले.
*
सुमित आणि राजन दोघेही कारमधून घरी जायला निघाले. रस्त्यात दोघेही बोलू लागले.
राजन: खूप वेगळीच आहे ना ती...
सुमित: हो ना.. नाचत पण मस्तच होती...
राजन: तिला छोटे केस छान दिसतात...
सुमित: काहीही काय छोटे कुठे आहेत तिचे केस... लांबसडक वेणी घातली होती... मला तर खूप मन करत होतं त्या वेणीला हात लावावा...
राजन: वेणी कुठे रे... अगदी मानेपर्यंतच केस आहेत तिचे...
दोघे ही थोडा वेळ गप्प बसले. आणि अचानक एकमेकांना पाहून म्हणाले.
सुमित: तू टीना बद्दल बोलतोय
राजन: आणि तू लीना बद्दल बोलतोय...
दोघेही एकमेकांना टाळी मारुन हसू लागले.
सुमित: सहज म्हणून आलो होतो पण लीनाने एकदम काळजाचाच ठाव घेतला माझ्या...
राजन: माझी तर विकेट तेव्हाच गेली होती जेव्हा टीनाने रस्त्यात तिच्या फ्रेंड ची छेड काढणाऱ्या मुलाच्या कानाखाली वाजवली होती. वाटलं नव्हतं आम्ही पुन्हा कधी भेटू असं...
सुमित: रेशीमगाठी असतात... तो वर बसला आहे ना तो बांधत असतो त्या... चला आता उतरा... अपनी मंजिल आ गयी...
राजन: (कार मधून उतरत) अरे आलो पण...
सुमित: मग काय...
तसे दोघेही कार लॉक करुन घरी जायला निघाले.
*
प्रतिकच्या घरी महिलावर्गाची तर राजीवच्या घरी पुरुष वर्गाची जेवणाची पंगत झाली. राजन, सुमित आल्यापासून खुशीत सगळ्यांना आग्रहाने जेवण वाढत होते. दाल में पक्का कुछ काला है... प्रतिकच्या बाजूला जेवायला बसलेला राजीव त्याच्या कानात पुटपुटला. हं मला पण तेच वाटतंय... जेवण उरकू दे सगळ्यांच मग घेऊ त्यांना कोपच्यात... प्रतिक राजीवच्या कानात कुजबुजला.
राजन: (राजीवला) दादा, तुला जलेबी आणू का...? प्रतिक दादा, तुला काही हवं आहे का...
राजीव: राजन, तू आणि सुमित आता जेवून घ्या... आमचं आता सगळ्यांच अलमोस्ट झालंच आहे...
राजन: हो दादा...
सगळ्यांच जेवून झाल्यावर शेवटच्या पंगतीत राजन, सुमित जेवायला बसले. जेवून झाल्यावर दोघेही टेरेसवर सोय केलेल्या ठिकाणी झोपायला गेले. दोघेही गादीवर लोळत टीना-लीना बद्दल त्यांच्या नावाचा उल्लेख न करता बोलत होते. गप्पांच्या नादात त्यांना हे ही लक्षात आलं नाही की बाजूलाच प्रतिक आणि राजीव त्यांचं बोलणं ऐकत आहेत.
प्रतिक: (दोघांना) कोणाबद्दल बोलत आहात रे तुम्ही दोघे मघासपासून...?
सुमित: ते दादा, कुठे काय... काहीच नाही... आपलं ते असंच...
राजीव: राजन- सुमित, आम्ही दोघेही तुमचे दादा आहोत, सो दादांचं लक्ष असतं बरं का आपल्या लहान भावांकडे... सांग लवकर कोणा बद्दल बोलत आहात... की विचारु तुमच्या रेखा वहिनीला कॉल करून... साजूक तुपाच्या गाण्यावर कोण नाचत होतं ते...
सुमितच्या लक्षात आलं...म्हणजे दादाने आपलं बोलणं ऐकलं तर... त्याने पटकन बाजू सावरण्यासाठी राजनचं नाव पुढे केलं.
सुमित: राजीव दादा ते, राजनला तिथे एक मुलगी आवडली तीच या गाण्यावर डान्स करत होती.. आम्ही तिच्या बद्दलच बोलत होतो... हो ना राजन..
राजीवने राजनकडे पाहिलं... त्याचा स्वभाव राजीवला माहीत असल्याने तो घाबरला आहे हे त्याच्या लक्षात आलं. राजनला तर लगेच पाण्यात जाऊन उडी मारु की काय असं झालं होतं. त्याने मनात सुमितला चार शिव्या हाणल्या. राजीव राजनच्या पाठीवर हात थोपटत म्हणाला, आपल्या दादाला पण नाही सांगणार का... तुला कोण आवडली ते... हवं तर मी बोलेन तिच्याशी तुझ्यासाठी... राजन मान खाली घालूनच होता. राजनला इमोशनल केलं की तो लगेच बोलतो हे राजीवला पक्कं ठाऊक असल्याने त्याने बरोबर पॉईंट वर हात ठेवायचं ठरवलं.
राजीव: जाऊ दे, नको सांगूस... तू मला मुळात तुझा भाऊ मानतोसच कुठे...
राजन: (इमोशनल होऊन) दादा, असा रे काय बोलतोस... सांगतो मी तुला... सगळं खरं खरं... म्हणत त्याने टीना बद्दल त्याला सांगितलं.
राजीव: (विचार करत) टीना... येस ही तीच टीना आहे जिच्या बद्दल रेखा कडून मी एकदा दोनदा ऐकलं होतं.
प्रतिक: कोण टीना रे...
राजीव: अरे रेखाच्या मावशीला 2 जुळ्या मुली आहेत... एक टीना आणि एक लीना... दोघींना मी अजून कधी पाहिलं नाही आहे... टीना-लीना मध्ये नक्की काय फरक आहे त्याबद्दल मला अजून काही आयडिया नाही आहे.
राजन: दादा, फार कठीण नाही आहे... टीनाचे केस लहान आहेत...आणि तो पुढे बोलणार इतक्यात सुमित जोरात म्हणाला, आणि लीनाचे खूप मोठे आहेत.
राजीव, प्रतिक दोघांनी त्याच्याकडे पाहिलं.
प्रतिक: काही लक्षात आलं का राजीव तुझ्या...
प्रतिक आणि राजीव दोघांनी सुमितचा कान पकडला.
सुमित: दादा, सोडा मला...
प्रतिक: सोडा काय... स्वतःला कोण आवडतं हे लपवून ठेवत राजनचं नाव पुढे करत होतास होय...
सुमित: आई ग... दुखतोय ना कान दादा, सोडा ना दोघांनी माझे कान...
राजीव: एका अटीवर सोडू...
सुमित: कोणती अट...
प्रतिक: तुला ही राजनसारखं आम्हाला काय घडलं ते सांगावं लागेल...
सुमित: हो हो कबूल... आता तरी सोडा माझे कान...
तसे दोघांनी त्याचे कान सोडले. माझं नाव पुढे केलं होतं काय आणि आता स्वतः ही पकडला गेला असा मनात विचार करत राजन त्याच्याकडे पाहून हसू लागला.
प्रतिक: सुमित, सांगतोय ना...
सुमित: हो दादा... म्हणत त्याने हॉलमध्ये गेल्यापासून निघण्यापर्यंत सगळी गोष्ट सांगितली.
राजीव, प्रतिक: तुम्ही दोघे त्या दोघीबद्दल serious आहात ना...?
सुमित, राजन: हो दादा... लग्न करणार तर त्यांच्याशीच...
प्रतिक: वाह वाह...
राजीव: मग झालं तर, कल हमारी शादी भी है, और अच्छा मौका भी है... तो कल ही उनके पापा से अपने parents को लेकर जा के शादी के लिए बात करो... फिर क्या चट मग्नी और पट ब्याह...
सुमित: दादा, पण एक प्रॉब्लेम आहे...
प्रतिक: आता, आणखी काय...
राजन: म्हणजे, आम्ही त्या दोघींना पसंत करतो पण त्या दोघीही आम्हाला पसंत करतात की नाही याबद्दल आम्ही sure नाही आहोत... बोलताना राजनला टीनाने खरंच त्याच्या कानाखाली मारल्याचा भास झाला. त्याने लगेच त्याचा हात गालावर चोळला.
राजीव: ओह असं आहे तर... मग तुम्ही नका जाऊ... डायरेक्ट आईबाबांनाच तिच्या आईबाबांशी बोलायला सांगा... म्हणजे तुमचा मार खाण्याचा प्रश्नच येत नाही.
राजन: दादा, तुला कसं कळलं की ती मारते ते...
राजीव: अरे बोलताना आता तुझा गाल ज्या पद्धतीने चोळत होतास त्यावरुन कोणीही सांगेल रे... आणि तसं ही त्या रेखाच्या बहिणी आहेत... म्हणजे थोडातरी त्यांच्या मध्ये तो गुण असणारच ना...
तसे सगळेजण हसू लागले.
प्रतिक: मग ठरलं तर... उद्या आमच्या लग्नात तुम्ही तुमच्या लग्नाची बोलणी करा... काय चालेल ना... राजीव...
राजीव: चालेल काय पळेल...
मिलिंद: (झोपेतून जाग येत) काय रे मुलांनो, अजून झोपला नाहीत का... उद्या स्वतःच्याच लग्नाला नाहीतर उशिरा पोहचाल... चला झोपा लवकर....
तसे सगळेजण उद्या काय होणार याचा विचार करत पटापट झोपले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा