अस्तित्व - एक संघर्ष भाग-८

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-८


समिधा केबिनमधून बाहेर जाताक्षणी राजीव प्रतिकला म्हणाला, finally you done it.. चल तुझं
काम झालं असेल तर निघायचं का आपण हॉस्पिटलमध्ये जायला...? तसा प्रतिक म्हणाला, हो चल निघूया...असं म्हणून प्रतिकने लॅपटॉप बंद केला आणि त्याच्या ऑफिस बॅगमध्ये ठेवला. तसा राजीव म्हणाला, अरे हे पण घेऊन जाणार आहेस का..? तसा प्रतिक म्हणाला, हो रे अचानक काम आलं तर करावं लागेल....सध्या समिधावर एकटीवर सगळं पडलं आहे...तसा राजीव म्हणाला, अरे मग तुम्ही इंटर्नशिप जॉब का नाही ऑफर करत फ्रेशर ग्रॅजुएट स्टुडंटना... इससे दोनों का फायदा होगा...म्हणजे कमी पैशात तुम्ही काम वाटून देऊ शकता...आणि त्या स्टुडन्टना पण चांगलं...त्यांना experience मिळेल... तसा प्रतिक म्हणाला, हो माझ्या डोक्यात पण हे आलं होतं पण माहित नाही कंपनी बोर्ड डायरेक्टर काय म्हणतील...? तसा राजीव म्हणाला, मनात आलं आहे ना...मग एकदा बॉस ला सांगून तर बघ....त्याला पटलं तर तो तसा तुझ्या साईडने होईल...आणि नाही पटलं तर टॉपिक इथेच क्लोज होईल...त्यावर प्रतिक म्हणाला, ठीक आहे तसंच करेन...उद्या तशी ही मीटिंग अरेंज केली आहे तिथेच हा पॉईंट मांडेन...चल आता निघूया आपण...तसं डेस्कवर ठेवलेली फाईल प्रतिकला दाखवत राजीव म्हणाला, ही फाईल नको असेल तर ड्रॉवर मध्ये ठेवून दे...नाहीतर नंतर मिळणार नाही...तोच प्रतिकने राजीवकडून फाईल घेऊन चेक केली, अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस तू मला, ही फाईल आपल्याला संजीव सरांना द्यायची आहे...on the way च आहे त्यांचं घर...तर रस्त्यात थांबून लगेच पुढे जाऊ...त्यावर राजीवने मानेने होकार दिला...आणि दोघेही ऑफिस मधून समिधाला बाय करून निघाले...

प्रतिक आणि राजीव प्रतिकच्या कारकडे पोहचले तसं प्रतिकने राजीवला विचारलं, अरे तू आता बाईकने आलास ना...? तसा राजीव म्हणाला, नाही रे, मी uber ने आलो म्हंटलं तिथूनच जर घरी जायचं झालं तर परत तुझ्या ऑफिसच्या पार्किंग मधून बाईक न्यावी लागली असती ना....सो नाही आणली...प्रतिक म्हणाला, ओह ते पण आहे म्हणा...चल बस...असं म्हणून प्रतिकने कारचा दरवाजा राजीवला उघडला...आणि स्वतः ही कारमध्ये बसला...आणि कार सुरु केली. रस्त्यात अधून मधून राजीव काही ना काही प्रतिकला सांगत होता...तोच संजीव सर राहत असलेली कॉलनी आली...तशी प्रतिकने कार साईडला पार्क केली आणि राजीवला सांगितलं, मी लगेच फाईल देऊन येतो तू इथेच थांब...त्यावर राजीवने मानेनेच होकार दिला...थोड्यावेळाने राजीवला त्याच्या एका क्लायंटचा कॉल आला...त्याला तो कॉल ऐकू न आल्याने तो कारमधून बाहेर पडून बोलत होता....तो बोलण्यात मग्न असतानाच एक मुलगी वैतागून त्याच्या जवळ आली...आणि ओरडली समजत नाही कुठे ही काय कार पार्क करून बोलत आहात...तुमच्यामुळे मला माझी scooty ही काढता येत नाही आहे...तसं क्लायंटला नंतर कॉल करतो सांगून राजीवने कॉल ठेवला...आणि मागे वळून कोण ओरडत आहे ते पाहिलं....तिला बघताक्षणी तो सारं काही विसरून गेला...ती मुलगी त्याला वैतागून काहीतरी बडबडत होती...पण राजीवला फक्त ती दिसत होती....तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचतच नव्हता. शेवटी वैतागून तिने कारचा हॉर्न वाजवला तोवर प्रतिक तिथे आला..आणि त्या मुलीला नक्की काय झालं ते विचारलं..त्यावर त्या मुलीने तिला scooty पार्किंग मधून काढताना कारचा होत असलेला प्रॉब्लेम सांगितला...त्यावर प्रतिक म्हणाला, i am extremely sorry... मी लगेच माझी कार साईडला घेतो...तशी ती काहीशी नॉर्मल होत राजीवकडे हात दाखवत म्हणाली, हा तुमचा ड्राइवर लक्षच नाही त्याच अजिबात....मी काय म्हणते त्याकडे...तसा प्रतिक म्हणाला, तो माझा ड्राइव्हर नाही माझा मित्र आहे....आणि कारची चावी माझ्याकडे होती त्यामुळे तो कार दुसरीकडे पार्क करू शकला नसताच...तसं प्रतिकने कार दुसरीकडे वळवून त्या मुलीला जायला जागा दिली...तसं तिने तिची scooty त्या जागेतून काढली आणि scooty वर बसून ती निघून गेली तरी राजीव तिच्याच जाणाऱ्या आकृतीकडे हसत पाहत होता...त्याला असं पाहून प्रतिकने त्याला हाक मारली तसा तो भानावर आला....आणि कारमध्ये जाऊन बसला....तसा प्रतिक राजीवकडे हसत पाहून म्हणाला, आज बहुतेक कोणाचं काहीतरी चोरीला गेलं आहे वाटतं...तसा राजीव काही झालंच नाही अशा आविर्भावात म्हणाला, छे छे तू समजतो तसं काही नाही....तसा प्रतिक पुन्हा हसून म्हणाला, मी समजतो तसं काहीच नाही पण मी काय समजतो आहे ते तरी सांग मला....त्यावर राजीव हसला आणि म्हणाला, चल जाने दे यार....तू अपनी कार स्टार्ट कर...तसा प्रतिक म्हणाला, जो हुकूम मेरे आका...आणि त्याने कार सुरु केली...थोड्याच वेळात ते हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोहचले...प्रतिकने कार पार्क केली आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघाले.


दोघेही प्रेरणा ज्या मजल्यावर ऍडमिट होती त्या मजल्यावर पोहचले...तिथे बाहेर सोफ्यावर प्रेरणाचे आईबाबा बसलेले होते...दोघेही त्यांच्याजवळ गेले.. प्रतिकने राजीवची त्यांच्याबरोबर ओळख करून दिली...तेवढ्यात डॉ आले तसं प्रेरणाच्या वडिलांनी प्रेरणाची तब्येत कशी आहे, ती शुद्धीवर कधी येईल असं डॉ ना विचारलं... तसे डॉ म्हणाले, मि प्रधान शांत व्हा...आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहोत...आणि आज ना उद्या ती शुद्धीवर येईल ही...तुम्ही थोडं स्वतःला सावरा...आणि प्लीज तुम्ही घरी जा आता...मला सिस्टर म्हणाल्या तुम्ही कालपासून इथेच आहात म्हणून...तुम्हाला समजत आहे का......अशाने तुम्ही तुमची तब्येत खराब करून घेत आहात...प्लीज मि प्रतिक यांना समजावून सांगा...अशाने ते स्वतःची तब्येत बिघडवून घेतील..प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून डॉ नी प्रेरणाच्या वडिलांना समजवायला सांगितलं आणि ते दुसऱ्या पेशंटच्या खोलीमध्ये गेले.

प्रतिकने आणि राजीव दोघांनी मि प्रधान यांना समजावलं...तसे ते घरी जायला तयार झाले...तसा प्रतिक म्हणाला, आम्ही पण निघतोच आहोत फक्त डॉक्टरांना भेटून येतो मग आम्ही तुम्हाला सोडतो आणि पुढे जातो. तसे मि प्रधान मानेनेच हो म्हणाले. प्रतिक आणि राजीव दोघेही डॉ च्या केबिनमध्ये गेले. प्रतिकने डॉ बरोबर राजीवची ओळख करून दिली आणि राजीवचं प्रेरणाची केस हॅन्डल करणार असल्याचे सांगितले.. तसं डॉ नी राजीवला प्रेरणाच्या रिपोर्ट्स आणि सगळ्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. राजीवने ती सगळी केस समजून घेतली...आणि काही माहिती हवी असल्यास त्यांना कॉल करण्यासाठी डॉक्टरांचा मोबाईल नंबर आणि कार्ड ही घेऊन ठेवलं. दोघांचं बोलणं झालं तसा प्रतिक डॉ ना म्हणाला, डॉ प्रेरणामध्ये काही इम्प्रोव्हमेन्ट आहे का...? तसे डॉ म्हणाले, सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही...ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच बोलू शकत नाही...तिला बाहेर फेकल्याने डोक्याला मार लागला होता...ती इंज्युरी फार मोठी नव्हती. पण शुद्धीवर आल्याशिवाय त्याचा तिच्यावर काय परिणाम झाला आहे हे नक्की सांगता येईल...तिच्या रिपोर्ट्स मध्ये मला मेंदूमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही दिसले..पण या सगळ्याचा तिच्यावर नक्की काय परिणाम झाला आहे हे ती शुद्धीवर आल्यावर च कळेल...तसा प्रतिक म्हणाला, ओके डॉक्टर, प्रेरणाचं हॉस्पिटलच जे बिल होईल ते आमच्या कंपनी मधून होणार आहे..सो काही फॉर्मॅलिटी असेल तर मी ती करेन...तसे डॉ म्हणाले, ओके चालेल सांगेन मी तुम्हाला त्या संदर्भात...तसं राजीव आणि प्रतिक दोघांनी डॉ ना हात मिळवला आणि ते डॉ च्या केबिन मधून निघाले आणि पुन्हा प्रेरणाच्या आईबाबांच्या जवळ आले. तसे प्रेरणाचे बाबा म्हणाले, काय म्हणाले डॉ....? त्यावर प्रतिक त्यांना म्हणाला, काही नाही लवकरच शुद्धीवर येईल म्हणाले...चला निघूया काका आपण...काकू येतो मी नंतर...असं म्हणून प्रतिक, राजीव आणि प्रेरणाच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडला..कार जवळ आल्यावर त्याने राजीवला आपल्यासोबत का आणलं होतं हे प्रेरणाच्या बाबांना सांगितलं. तसे बाबा हात जोडून म्हणाले, तुम्ही खूप करत आहात हो आमच्यासाठी... तुमचे उपकार मी या जन्मी नाही फेडू शकत....त्यांना असं हात जोडलेलं पाहून प्रतिकला खूप वाईट वाटलं...त्याने त्यांना समजावलं आणि कारमध्ये बसायला सांगितलं..आणि राजीवही त्यांच्या सोबत मागे बसला...जेणेकरून त्यांना एकटं वाटता कामा नये..प्रेरणाच्या बाबांना बोलतं करून त्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राजीवने त्यांना घरी कोण कोण असतं विचारलं...तसे बाबा म्हणाले, मी, प्रेरणा, प्रेरणाची आणि तिचा छोटा भाऊ...माझं accident झालं होतं ५ वर्षांपूर्वी त्यामुळे मला नोकरी पुढे करता आली नाही. तसं मी एका ठिकाणी नंतर जाऊ लागलो नोकरीला पण त्यात फार काही भागत नव्हत. त्यात आमच्या प्रेरणाचं  मग graduation झालं...तसं तिला पुढे शिकायचं होतं...कॉलेज मध्ये असताना ती बऱ्याचदा सांगायची मला, बाबा मला Masters in Psychology करायचं आहे म्हणून..पण मला हातभार व्हावा म्हणून तिने नोकरी करणं पसंत केलं... सगळं सांगताना प्रेरणाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. तसं राजीवने त्यांना प्यायला थोडं पाणी दिलं... आणि शांत केलं...पुन्हा विषय बदलत तो म्हणाला, तुमचा छोटा मुलगा विवेक काय करतो...? तसे बाबा म्हणाले, त्याचं graduation झालं आहे आणि प्रेरणाच्या सांगण्यावरून त्याने post graduation ला ऍडमिशन घेतलं आहे...तो ऐकत नव्हता तिचं म्हणत होता की तुमच्या दोघांवर किती भार टाकू मी माझा...पण शेवटी तिने समजावलं त्याला...तसा तो ऍडमिशन घ्यायला तयार झाला...तसं त्याचं कॉलेज सकाळच असतं मग तो कॉलेज नंतर पार्ट टाइम नोकरी करतो...पण सध्या तो प्रेरणाची अशी अवस्था बघून घाबरला आहे म्हणून मी आज त्याला घरीच रहा म्हणून सांगितलं आहे....तेवढ्यात प्रेरणा राहत असलेलं अपार्टमेंट आलं तसं प्रतिकने कार थांबवली....तसं तिघेही कार मधून उतरले....प्रेरणाचे बाबा त्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही घरी आला असतात तर मला चांगलं वाटलं असतं....त्यावर प्रतिक म्हणाला, काका आम्ही येऊ पुन्हा कधीतरी, आता मि काळे आणि जाधव यांच्याशी केस संदर्भात भेटायचं आहे...तसे बाबा म्हणाले, मी सुद्धा येऊ का तुमच्या बरोबर...तसा प्रतिक म्हणाला, नाही काका, तुम्ही फक्त आराम करा आजच्या दिवस...आणि काका मी विवेकशी पण बोलेन कधीतरी... मी आणि राजीव आहे ना आम्ही सगळं हॅन्डल करू... काही गरज लागली तर तुम्हाला मी कॉल करेन....असं म्हणून प्रतिकने त्यांचा मोबाईल नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला...आणि राजीव आणि प्रतिकने प्रेरणाच्या बाबांचा निरोप घेतला. दोघेही कारमध्ये बसले आणि कार पोलीस स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी वळवली...प्रेरणाचे बाबा आपल्याला प्रतिक आणि राजीवच्या रूपात देवमाणूस भेटला म्हणून देवाचे आभार मानत घराच्या दिशेने वळले.

क्रमशः  

🎭 Series Post

View all