Login

वेध अंतरीच्या रामाचा..

रामाचा आंतरिक शोध
कविता : वेध अंतरीच्या रामाचा

कलियुगात करते मी
वेध अंतरीच्या रामाचा,
व्हावा साक्षात्कार मजसवे
सकल जणांच्या विकासाचा..

मंगल भवन, अमंगल हारी
रामगीत रवींद्र जैन यांचे
औचित्य आहे रामनवमीचे
ईश्वराच्या जन्माच्या जाणिवेचे..

केवळ आराधना, पूजाअर्चा
जीवन सफल करेल?
गाथा राघव अनोखी
गुणगौरव त्यांचा सुरेल..

प्राण जाए पर वाचन न जाए
असे थोर होते मर्यादा पुरुषोत्तम,
आदर, समर्पण,बांधिलकी
वनवास भोगला साधुसम..

बंधू लक्ष्मण,भार्या सीता
साथ लाभली राघवा,
शबरी, जटायू अन् सुग्रीव
भक्तीत जणू अनोखा गोडवा..

सीताहरण अघोरी रावणाचे
दुर्दम्य कृत्य या शिवभक्ताचे,
पेटवली संपूर्ण लंका सोनेरी
देखणे साहस रामभक्त हनुमंताचे..

रामरक्षा स्तोत्र शक्तिवर्धक
सांगे रक्षण कर रे राघवा,
दुर्दम्य साहस आणि विश्वास
ओतप्रोत द्यावी या मानवा..

अंगी गुण हे बाळगता
भेटेल तुझ्यातला रामही
अजरामर होईल आयुष्य
शंका नसे तिळमात्रही..