माकडाचा शोध (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
माकडाचा शोध

इथे आचार्य त्याच्या घरी तयार होत होता. तो डोळ्यात आणि भुवयांना काजळ लावत होता. धनी, मणी त्याच्याकडे बघत होते.

“गुरुजी एवढे तयार होऊन कुठे चालला आहात?” मणीने विचारलं.

“कुठे जाणार? ती विदेशी अतिथी स्वतःला एकटे समजत असेल ना. महाराजांच्या आदेशामुळे कक्षात बंद आहेत सगळे. तिला एकटेपणा वाटू नये म्हणून सोबत करायला चाललो आहोत आम्ही. आमचा खांदा आहे तिच्यासाठी.” तो म्हणाला.

“चार खांद्यावर जायच्या वयात त्या सुंदरीला खांदा द्यायला चालला आहे.” धनी मणीच्या कानात कुजबुजला.

तो महालात जायला निघाला आणि मागून धनी, मणी निघाले.
**********************************
इथे रामा बाहेर पडला आणि बाजारातून जात असताना त्याला धनी, मणी दिसले.

“तुम्ही दोघे इथे? आचार्य कुठे आहेत?” रामाने त्यांना पाहून विचारले.

“मणी यांना चुकूनही सांगू नकोस गुरुजी कुठे गेलेत ते.” धनी म्हणाला.

“नाही नाही. मी काय एवढा मूर्ख आहे का हे सांगायला की, गुरुजी त्या विदेशी महिलेला भेटायला महालात गेलेत.” मणी म्हणाला.

रामाला तर समजलं तो कुठे आहे. तो गालातल्या गालात हसला आणि बोलू लागला; “ठीक आहे तुम्ही नका सांगू तुमचे गुरुजी महालात त्या विदेशी पाहुणी सोबत आहेत. फक्त माझे एक छोटे काम कराल?”

“आम्ही का करायचे?” मणी म्हणाला.

“का म्हणजे? करावेच लागेल. नाहीतर महाराजांसमोर तुम्हालाच चंद्रमणी चोर म्हणून उभा करेन.” रामा म्हणाला.

“का?” धनीने विचारलं.

“हे महाराज विचारतील तेव्हा त्यांना सांगा.” रामा म्हणाला.

“पण आम्ही चंद्रमणी चोरलाच नाही.” मणी म्हणाला.

“मग गुंडप्पाला का पळवून नेलं होतं?” रामाने विचारलं.

त्या बरोबर दोघे चपापले.

“पुरावा काय आहे तुमच्याकडे?” मणीने विचारलं.

“हे आहेत स्वतः धनी महाशय. तुमच्या सोबत हे होते.” रामा म्हणाला.

“आणि माझ्या विरुद्ध काय पुरावा आहे?” धनीने विचारलं.

“हे मणी महाशय. तुम्ही यांच्या सोबत होतातच. मी महाराजांना सांगेन या दोघांनी मिळून गुंडप्पाचे अपहरण केले होते. एवढे मोठे पुरावे असताना मग तुमचं तुम्ही बघा चंद्रमणी चोरल्याचा आरोपातून कसे सुटायचे ते.” रामा म्हणाला.

त्या बरोबर दोघांनी त्याचे पाय धरले आणि काय काम आहे आम्ही करू असे म्हणत रामाचे काम करण्यासाठी तयार झाले.

“तर ऐका! तुम्ही दोघांनी सौदामिनी देवी आणि आचार्यांच्या पत्नी वरुणमाला देवी यांना घेऊन महालात जायचं. सरळ त्या विदेशी पाहुणीच्या कक्षात.” रामा म्हणाला.

“हो. हो. लगेच.” ते दोघे म्हणाले आणि तिथून गेले.

रामाला आता मजा वाटली आणि तो तिथून निघाला. त्याने आता गुंडप्पाला देखील सोबत घेतले होते आणि ते दोघे दरबारात गणपतीच्या दर्शनासाठी आले.

“हे विघ्नहर्ता गणराया! तुला तर सर्व ज्ञात आहेच. हे जे विघ्न आलं आहे त्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग सापडत नाहीये. आता तूच या भक्तावर दया कर आणि मार्ग दाखव.” रामा मनोभावे नमस्कार करून म्हणाला आणि त्याने एक फुल गणपतीला वाहिले.

इतक्यात त्याच्या बोटात असलेली अंगठी तिथे पडली आणि कुठूनतरी एक उंदीर आला आणि त्याने ती अंगठी तोंडात घेतली.

“मूषक महाराज! तो लाडू नाहीये. अंगठी आहे. परत द्या.” रामा त्या उंदराच्या मागे लागला.

पण तो उंदीर चपळाईने पळू लागला.

“अरे गुंडप्पे चल लवकर. ती अंगठी जर सापडली नाही तर अम्मा फाडून खाईल.” रामा म्हणाला.

ते दोघे त्या उंदराच्या मागे जाऊ लागले.
****************************
इथे आचार्य क्लाराच्या कक्षात आला होता. ती पायाला मेंदी लावून घेत होती. आचार्यने आत आल्या आल्या ती जशी गाऊन चिमटीत धरून गुडघ्यात वाकून अभिवादन करते तसेच धोतर पकडून केले.

“तुम्ही इथे का आली?” तिने विचारलं.

“तसं तर तुम्ही इथे का आला असं हवं पण ठीक आहे आली तर आली. आम्ही तुम्हाला काही असुविधा तर नाही ना हे विचारायला आलो.” आचार्य म्हणाला.

“इटे होम अरेस्ट केलं आहे आणि तुम्ही विचारते असुविधा नाही?” ती थोडी नाराजीने म्हणाली.

“आम्ही तरी काय करू? हा आदेश जर दुसऱ्या कोणी दिला असता तर आमच्या रागाच्या आगीत जळून खाक झाला असता पण महाराजांनी आदेश दिला आहे त्याला आम्ही काय करू शकतो. नाहीतर तुमच्या सारख्या इतक्या सुंदर स्त्रीला असं राहू दिले असते का?” आचार्य म्हणाला.

इतक्यात धनी आणि मणी मागून सौदामिनीला घेऊन आले. त्यांनी क्लाराला काहीच न बोलण्याची खूण केली. तिलाही जे समजायचं ते समजलं. ती लगेच पुढे झाली.

“आम्ही खरंच सुंदर आहोत?” तिने विचारलं.

तो लगेच हुरळून गेला आणि तिच्या थोडे जवळ जाऊन उभा राहिला.

“हो. तुम्ही इतक्या सुंदर आहात की अजून अशी सुंदरी जन्मली पण नसेल.” तो म्हणाला.

“हो का?” मागून सौदामिनी म्हणाली.

त्याला ते न कळल्याने तो पुढे बोलू लागला; “हो. तुमच्या सारखी सुंदरी खरंतर इथे पृथ्वीवर नाही तर तिथे परीलोकात हवी.”

त्याने असे बोलताच पुन्हा सौदामिनी बोलली आणि त्याच्या लक्षात आले मागे कोणीतरी आहे. सौदामिनीला पाहून त्याची चांगलीच भंबेरी उडाली. ती चांगलीच चिडली होती आणि बाहेर जाऊ लागली. आचार्य देखील लगेच तिच्या मागे कक्षाच्या बाहेर पडला. मागोमाग धनी आणि मणी होतेच. ते लोक तिथे आले आणि आचार्य आणि सौदामिनीमध्ये वाद सुरू झाले. आचार्य तिला समजावू पाहत होता. त्यातच त्याला समजले तिला धनी आणि मणी घेऊन आले आहेत. तेवढ्यात गुरू माता म्हणजेच त्याची पत्नी देखील तिथे पोहोचली आणि हे सर्व पाहायला आलेली क्लारा देखील तिथे होती. आचार्यने कसेबसे त्याच्या पत्नीला पुन्हा घरी पाठवले आणि हा या दोघींमध्ये अडकला. त्यांच्यात सर्व गैरसमज होत असतानाच तो उंदीर तिथे आला आणि त्याला घाबरून त्या दोघी तिथल्या एका मंचकावर चढल्या. आचार्य देखील घाबरून वर उभा राहिला आणि रामा, गुंडप्पा हे लपून बघत होते. तो उंदीर तिथून थोडा लांब गेल्यावर ते खाली उतरले. रामा त्या उंदराच्या मागे गेला.

“प्रिये! आम्ही येतो ना तुमच्याकडे फक्त अजून दोन दिवस थांबा.” तो सौदामिनीला म्हणाला.

“गुरुजी नक्की दोन दिवस? या विदेशी अतिथी जास्त दिवस आहेत इथे म्हणजे तुम्ही इथे महालात जास्त वेळ असणार.” धनी म्हणाला.

त्याने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि बोलू लागला; “राजगुरू आहोत ना! आणि माहित आहे ना तो चंद्रमणी चोरीला गेला आहे त्यामुळे आमचीही जबाबदारी आहे ना. आम्ही नक्की येऊ.” आचार्य म्हणाला.

“नक्की ना?” तिने विचारलं.

“हो नक्की. धनी, मणी जा यांना त्यांच्या घरापर्यंत सोडून या.” तो म्हणाला.
****************************
इथे रामा त्या उंदराच्या मागोमाग एका छोट्या देवळाबाहेर आला. उंदराने तिथेच दारात अंगठी टाकली आणि पळून गेला.

‘हे काय! अंगठी जर द्यायची होती तर एवढं का पळवलेत मूषक महाराज.’ तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याने ती अंगठी उचलून बोटात घातली.

तो तिथेच उभा होता आणि त्याला काहीच सुचत नव्हते.

“अरे रामा काय झालं?” बंधूने विचारलं.

“माझ्या मेंदूने काम करणंच बंद केलं आहे बंधू. चंद्रमणी शोधायला आता काय करू हेच सुचत नाहीये.” रामा म्हणाला.

तो उदास चेहऱ्याने तिथेच उभा होता इतक्यात त्याला तंबोरा वाजल्याचा आवाज आला. तो आवाजाच्या दिशेने गेला. तिथे एका खांबाला टेकून एक मुलगी लहान तंबोरा वाजवत शून्यात नजर लावून बसली होती. रामाने तिच्याकडे पाहिले.

“रामा ही तीच मुलगी आहे ना जी तुला त्या दुसऱ्या मंदिरात भेटली होती.” बंधू म्हणाली.

“हो बंधू.” रामा म्हणाला.

“ती एवढी उदास का दिसतेय?” बंधू म्हणाली.

“चल बघू.” रामा म्हणाला.

तो त्या मुली जवळ आला आणि तिच्या समोर बसला.

“कशी आहेस? ओळखलं मला? आपण त्या मोठ्या मंदिरात भेटलो होतो.” रामा म्हणाला.

त्याच्या बोलण्याने तिची तंद्री तुटली आणि तिने होकारार्थी मान हलवून ओळखलं असे सांगितले.

“तू एवढी उदास का आहेस?” रामाने विचारलं.

“तो मुलगा माझ्याशी खेळत नाहीये.” ती तिथे पलीकडे बसलेल्या मुलाकडे बोट दाखवून म्हणाली.

“मग एकटी खेळ.” रामा म्हणाला.

“एकटं खेळायला मजा येत नाहीये.” ती म्हणाली.

“मग त्या मुलाला विचार खेळशील का असं.” रामा म्हणाला.

“विचारलं पण त्याला भोवराच खेळायचा आहे. तो माझ्याशी खेळायला तयार नाही.” ती म्हणाली.

यावर रामाने काहीतरी विचार केला आणि बोलू लागला; “त्या मुलाला काय आवडतं हे माहीत आहे?”

तिने थोडा विचार केला इतक्यात तिथून एक लाडू विकणारा माणूस जात होता त्यावरून तिला आठवले त्याला लाडू आवडतात.

“त्याला लाडू खूप आवडतात. दिवसभर फक्त लाडू खात असतो.” ती म्हणाली.

रामाने लगेच त्या माणसाकडून एक टोपली लाडू घेतले आणि तिला दिले. ती खुश झाली आणि उठून चालली होती तेव्हा रामाने तिला अडवले.

“कुठे चालली आहेस?” रामाने विचारलं.

“त्याला लाडू द्यायला. म्हणजे तो माझ्याशी खेळेल.” ती म्हणाली.

हे सर्व तो मुलगा बघत होताच. ते लाडू पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते.

“तुला कुठेही जायची आवश्यकता नाही. हे लाडू पाहून तोच आता तुझ्याकडे येईल. कारण तुझ्याकडे त्याची आवडती गोष्ट आहे जी त्याला आकर्षित करेल.” रामा म्हणाला.

घडलेही तसेच तो मुलगा स्वतः तिच्याजवळ आला.

“मला लाडू देशील?” त्याने विचारलं.

“हो देईन पण एक अट आहे. माझ्याशी खेळ. दर एका डावा नंतर एक लाडू. मंजूर?” तिने विचारलं.

“हो मंजूर.” तो म्हणाला.

लगेच तिने त्याला पहिला डाव खेळण्यासाठी एक लाडू दिला. ते दोघे खेळू लागले. तेव्हाच रामाला तो स्वतः जे बोलला होता ते आठवले. “तुझ्याकडे त्याची आवडती गोष्ट आहे जी त्याला आकर्षित करेल.”

त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान झळकत होते. त्याने त्या मुलीकडे पाहिले. तिने हात उंचावून “कल्याण होवो.” असा आशीर्वाद दिला.

इतक्यात मागून गुंडप्पा आला.

“काय लामा कुटे कुटे शोदलं तुला. तू ईते काय कलतोय?” त्याने विचारलं.

“त्या माकडाला शोधायचा उपाय सापडला गुंडप्पे. चल.” रामा म्हणाला.
****************************
इथे आचार्यने त्याच्या घरी धनी आणि मणीला समोर उभे करून त्यांच्या डोक्यावर एक एक लहान मडके ठेवले होते आणि तो धनुष्याला बाण लावत होता.

“गुरुजी तुम्हाला शस्त्र चालवता तर येत नाही. नका असं करू. माफ करा.” धनी म्हणाला.

त्याने उलटा धनुष्य धरून तो त्याला वेगळ्याच पद्धतीने बाण लावत होता.

“गुरुजी उलटा धरला आहे.” मणी म्हणाला.

त्याने कसेबसे ते धनुष्य सरळ धरून त्याला बाण लावला आणि ते त्या दोघांवर रोखले. ते दोघे नको नको म्हणून ओरडत होते.

“सांगा सौदामिनीला तिथे कोण घेऊन आलं?” त्याने रागात विचारलं.

“आम्ही. आम्ही.” दोघं एकदम म्हणाले.

“मणी सांग ना.” धनी म्हणाला.

“गुरुजी गुरू मातेला पण आम्हीच घेऊन आलो.” तो म्हणाला.

त्याने धनुष्याला लावलेला बाण सोडला आणि धनी थोडक्यात वाचला.

“मुर्खा सगळं सांग ना. कोणाच्या सांगण्यावरुन केलं हे.” धनी घाबरून म्हणाला.

“पंडित रामा.” मणी म्हणाला आणि त्याने जे घडले ते सर्व त्याला सांगितले.

दोघे त्याची माफी मागू लागले. त्याने रागात धनुष्य खाली टाकला.

“माहीतच होतं हे काम त्या पंडित रामाकृष्णाचं असणार. पंडित रामाकृष्णाsss” तो म्हणाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all