पहिली भेट भाग १७
माझी फायनल इअरची एक्साम संपली होती, एक्साम मस्त झाली, सुरवातीला टेन्शन आले होते पण अभ्यास चांगला झाला असल्याने एक्साम छान गेली. फायनली MBBS च्या सर्व एक्साम्स संपल्या. रिझल्ट लागेपर्यंत आता भरपूर सुट्ट्या भेटल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बाबा घ्यायला येणार होते, घरी गेल्यावर श्रीराजशी फोनवर बोलता येणार नसल्याने आदल्या दिवशी रात्री फोन करून घ्यायचे ठरवले, मी जेवण झाल्यावर श्रीराजला फोन लावला.
जान्हवी--- हॅलो श्रीराज, कसा आहेस?
श्रीराज--- मी मजेत, तुझी एक्साम कशी गेली?
जान्हवी--- एकदम मस्त, डोक्यावरचे टेन्शन कमी झाल्यासारखे वाटतेय.
श्रीराज--- घरी कधी जाणार आहेस?
जान्हवी--- उद्या बाबा येणार आहेत घरी घेऊन जायला.
श्रीराज--- ओके, मग झाली का पॅकिंग?
जान्हवी--- हो तशी झालीय, थोडीफार बाकी आहे ती करेल उद्या सकाळी. घरी गेल्यावर तुझ्याशी फोनवर बोलता येणार नाही म्हणून आत्ता तुझ्याशी बोलणे महत्त्वाचे होते.
श्रीराज--- हो का, तसही खूप दिवस झाले आपण एकमेकांशी निवांत बोललोच नाहीये.
जान्हवी--- हो ना, बाकी तुझं काय चाललंय?
श्रीराज--- माझं काय चालणार, कॉलेज अभ्यास, तस तुला एक सांगायचं राहूनच गेलंय.
जान्हवी--- काय सांगायच राहून गेलं.
श्रीराज--- खूप कधीच सांगायचं होतं पण तुझी एक्साम असल्याने मला सांगता नाही आलं, तु माझी एवढी जवळची मैत्रीण तुला माझ्या आयुष्यात घडलेली महत्त्वाची घटना सांगायलाच हवी.
जान्हवी--- अरे मग सांग ना, एवढी प्रस्तावना का देत बसला आहेस?
श्रीराज--- मी जे काही तुला सांगणार आहे, त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. जान्हवी माझ्या आयुष्यात एक मुलगी आलीय.
जान्हवी--- कोण मुलगी? तुला काय सांगायचंय जरा नीट सांगना. (माझ्या मनात वेगळीच शंका उभी राहिली होती)
श्रीराज--- अगं म्हणजे ती माझी खूप छान मैत्रीण आहे, तिची व माझी खूप कमी काळातच खूप घट्ट मैत्री झाली आहे.
जान्हवी--- तुझी ज्युनिअर आहे का?
श्रीराज--- हो, आमची ओळख वाढण्याचे असे कारण होते की तिला अभ्यासात आलेल्या अडचणी ती मला विचारायची, मग हळूहळू आमच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि आता तर.
जान्हवी--- आता तर काय श्रीराज?
श्रीराज--- अगं किती आतुर झाली आहेस सगळं ऐकायला, सांगतो ना. तिला माझ्याबद्दल काय वाटतंय ते मला माहित नाही पण मला तरी अस वाटतंय की मी तिच्या प्रेमात पडलोय.
जान्हवी--- प्रेमात आणि तु, अस कसं शक्य आहे?
श्रीराज--- का, मी प्रेमात पडू शकत नाही का?
जान्हवी--- अरे पण तुच म्हणाला होता ना की तुला तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे, तुला कुठल्याही रिलेशनशिप मध्ये अडकायचे नाही.
श्रीराज--- हो म्हणालो होतो, पण त्याला खूप वर्ष होऊन गेले ना. आता मी MD च्या सेकंड इअर ला जाईन, मला स्टायपेंड पण चांगला मिळतोय, आता आयुष्याच्या ह्या वळणावर मी माझ्या लाईफ पार्टनर चा विचार करूच शकतो ना. मला पण वाटतं ना की माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी कोणी तरी व्यक्ती असावी.
जान्हवी--- ( मला तर श्रीराजशी काय बोलावे काहीच कळत नव्हते, अस का होतंय हे पण कळत नव्हतं, माझ्या नकाळतपणे माझ्या डोळ्यात पाणी आलं)
श्रीराज--- जान्हवी काय झालं? तु अशी गप्प का आहेस?
जान्हवी--- काही नाही, तुझ्या बोलण्याचा विचार करत आहे. तुझ्या त्या खास मैत्रिणीला तुझ्या मनातल्या भावनांबद्दल कल्पना आहे का?
श्रीराज--- नाही ना, तिला या सगळ्याची काहीच कल्पना नाहीये.
जान्हवी--- अरे मग तिला सांगून टाक सगळं?
श्रीराज--- हो, मला सांगायची खूप इच्छा आहे पण मला भीती वाटतं आहे.
जान्हवी--- कसली भीती?
श्रीराज--- तीच माझ्यावर प्रेम नसेल तर, तिला जर मी बोललेलो आवडलं नाही तर आमची मैत्रीही तुटेल.
जान्हवी--- अस काही होणार नाही, तुमची मैत्री जर खरी असेल तर काही झालं तरी ती तुटणार नाही.
श्रीराज--- माझ्यात तिला डायरेक्ट प्रपोज करण्याची हिम्मत नाहीये.
जान्हवी--- तुझ्या मनातील भावना एका कागदावर उतरव आणि तिला दे.
श्रीराज--- तुझी आयडिया जरी चांगली असेल तरी ते शक्य नाहीये?
जान्हवी--- त्यात अशक्य अस काय आहे?
श्रीराज--- अगं ती सध्या घरी आहे, मी पत्र लिहून तिच्या घरच्या पत्त्यावर पाठवू शकतो पण ते पत्र जर घरातील इतर कोणाच्या हातात पडलं तर प्रोब्लेम्स अजून वाढतील.
जान्हवी--- तुझंही बरोबर आहे, ती घरून परत कधी येणार आहे?
श्रीराज--- माहीत नाही, एक दोन महिने लागू शकतात. तोपर्यंत मला माझ्या भावना मनात डांबून ठेवायच्या नाहीयेत, खूप दिवसांपासून मी तिला सांगण्याचा विचार करतोय.
जान्हवी--- एक काम कर, तु लिहिलेले पत्र तिला मेल कर आणि मॅसेज करून सांग, मेल वाच, technology चा वापर करायला शिका.
श्रीराज--- गुड आयडिया जान्हवी, मला तर हे सुचलच नाही. आपण नंतर बोलू, मी आत्ताच तिला मेल पाठवतो, बाय.
मी बाय म्हणण्या आधीच श्रीराजने फोन बंद केला. श्रीराजशी बोलून झाल्यावर मला खूप रडायला येत होते, खूप जास्त वाईट वाटत होते. मी रडवेला चेहरा घेऊन रुममध्ये गेली. पुजा तिच्या सामानाची आवराआवर करत होती. पुजा माझ्याकडे न बघताच बोलत होती,
पुजा--- जान्हवी झालं का श्रीराजशी बोलून? आता राहिलेली बॅग भर म्हणजे सकाळी धावपळ होणार नाही.
माझा काहीच रिप्लाय आला नाही म्हणून तिने माझ्याकडे बघितलं, माझा रडवेला चेहरा बघून ती माझ्या शेजारी येऊन बसली व माझ्या खांद्यावर हात ठेवून काय झाले म्हणून विचारले, मी तिला मिठी मारली व मला रडायला यायला लागले,
पुजा--- जान्हवी काय झाले? अशी रडत का आहेस? श्रीराजशी भांडण झालंय का?
जान्हवी--- नाही.
पुजा--- मग काय झालंय?
जान्हवी--- श्रीराजच्या एक मुलगी आलीय, तो तिच्या प्रेमात पडलाय.
पुजा--- ओके, मग यात रडण्यासारखे काय आहे?
जान्हवी--- माझ्या व्यतिरिक्त श्रीराजच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आहे ही कल्पनाच मला सहन होत नाहीये.
पुजा--- हा प्रॉब्लेम आहे तर. तु श्रीराजच्या प्रेमात पडली आहेस का?
जान्हवी--- माहीत नाही, पण श्रीराजने दुसऱ्या मुली बद्दल सांगितल्यापासून खूप वाईट वाटत आहे.
पुजा--- सर्वात पहिले एक काम कर, तुला श्रीराज बद्दल काय वाटत आहे याचा नीट विचार कर, जर तु त्याच्या प्रेमात असशील तर त्याला सरळसरळ सांगून टाक आणि जर तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असेल तर त्याचा विचार तुझ्या मनातून काढून टाक.
जान्हवी--- पुजा श्रीराजने अजून त्या मुलीला प्रपोज नाही केलंय, अजून तिचे उत्तर येणे बाकी आहे.
पुजा--- त्यांच्या दोघांमध्ये बोलणं व्हायची वाट बघ. जे होईल ते accept करायचे.
जान्हवी--- हो, You are right.
पुजा--- येडू, कसला पण विचार करत बसते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नशिबात जे लिहिलेलं असतं, तेच घडतं, जे आपल्या भाग्यात नसत ते मिळवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते मिळत नाही.
जान्हवी--- मी श्रीराजच्या बाबतीत खूपच हळवी होते.
पुजा--- त्याच्याबद्दल तुझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे बाकी काही नाही. चल आता बॅग आवरायला घे.
मी राहिलेल्या सामानाची आवराआवर करायला घेते, रात्री उशिरापर्यंत बॅग भरून झोपण्याचा प्रयत्न करते पण मनात कुठे तरी एकच विचार चालू असतो, श्रीराज कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला आहे? असं तिच्यात काय खास आहे?
©®Dr Supriya Dighe