Login

पहिली भेट भाग १८

Story of friendship which turns to love.

पहिली भेट भाग १८

        मी दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांचा फोन आल्याने उठले, बाबांनी सांगितले की बेटा झोपेतून उठ, तयारी करून ठेव, मी थोड्याच वेळात तुझ्या होस्टेलला पोहोचेल. बाबांच्या बोलण्याने मी झोपेतून पटकन जागी झाले. तोंडाला पाणी मारून पटकन फ्रेश झाले तोच मोबाईलची मॅसेज टोन वाजली. श्रीराजचा मॅसेज आला होता, हाय जान्हवी, गुड मॉर्निंग, प्लिज तुझा मेल बॉक्स चेक कर. मी काय मेल आला असेल हा विचार करतच मेल बॉक्स ओपन केला, श्रीराजचा मेल आलेला होता,

         प्रिय जान्हवी,

पत्रास कारण की माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तु दिलेल्या मेल लिहिण्याच्या कल्पनेतूनच मी माझ्या मनातील भावना माझ्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रकट करीत आहे. मला आजही तो दिवस लख्ख पणे आठवतोय ज्या दिवशी आपण पहिल्यांदा बोललो होतो. तु केलेले सर्व मॅसेज माझ्या डोळ्यासमोरून फिरतायेत. हळूहळू आपल्यातील मैत्री अधिकच घट्ट होऊ लागली, मला त्या वेळीच कल्पना आली होती की मी तुझ्या प्रेमात पडलोय, पण योग्य वेळ येण्याची वाट बघत होतो. जान्हवी मला माझ्यावर प्रेम करणारी गर्लफ्रेंड नकोय तर माझ्यावर प्रेम करणारी, मला साथ देणारी, माझ्यासोबत सुखदुःखात उभी राहणारी लाईफ पार्टनर हवी आहे. बऱ्याच वेळी मी तुझ्यावर चिडलो असेल, रागावलो असेल पण प्रत्येक वेळी तु मला समजून घेतलंस. असंच मला आयुष्यभर समजून घेशील का? 

      " कोणाचीतरी सतत आठवण येणं म्हणजे प्रेम असतं, दिवसरात्र त्याचा विचार करणं हे प्रेम असतं, येणार नाही हे माहीत असूनही त्याच्या फोनची वाट पाहणं हे प्रेम असतं." 

    "नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे, नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे."

"I love you janhvi, I LOVE YOU means that I will love you and stand by you even through the worst of times."

तुझ्या उत्तराची वाट बघतोय.

                           तुझाच,

                                श्रीराज

      श्रीराजचा मेल वाचल्यावर माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, श्रीराज माझ्यावर प्रेम करतोय हे कळल्यावर मी आकाशात उंचच उंच उडत आहे की काय असं वाटत होतं, माझ्या डोळ्यात आनंदाश्रू झळकत होते, अचानक पुजाचे माझ्याकडे लक्ष गेले, बसल्या जागीच तिने मला विचारले, आता काय झाले? मी तिला श्रीराजचा मेल दाखवला. पुजाही खूप आनंदी झाली होती.

पुजा---- जान्हवी शेवटी तुझ्या मनासारखे सर्वच घडलेय, श्रीराजने तुला प्रपोज केलंय. श्रीराजला तुझा रिप्लाय कळवून टाक, तो वाट बघत असेल.

जान्हवी---- हो, त्याने किती मस्त प्रपोज केलंय, मला उत्तरही तश्याच भाषेत द्यावं लागेल, विचार करण्यासाठी थोडा वेळ लागेल.

पुजा---- तस त्याला मॅसेज करून सांग की रिप्लाय करायला वेळ लागेल म्हणून.

जान्हवी---- हो, घरी गेल्यावर निवांत विचार करून मेल करेल.

       मी श्रीराजला लगेच मॅसेज केला, हाय श्रीराज, गुड मॉर्निंग, तुझा मेल वाचला, थोड्याच वेळात बाबा येणार आहेत, मी रात्री रिप्लाय करते. श्रीराजचा रिप्लाय आला, ओके no problem, take your time.

       माझी स्थिती मात्र खालील गाण्याप्रमाणे झाली होती,

"आज मैं उपर, आसमा नीचे। आज मैं आगे, जमाना हैं पीछे आज मैं उपर,आसमा नीचे। आज मैं आगे, जमाना हैं पीछे         

टेल मी ओ खुदा, अब मैं क्या करू

चलू सिधी की उलटी चलू

आज मैं उपर, आसमा नीचे

आज मैं आगे, जमाना हैं पीछे

युही बिन बातके छलके जाये हंसी डोले जब हवा लागे गुदगुदी संभालू गिर पडू, तोबा मैं क्या करू चलू सिधी की उलटी चलू। आज मैं उपर आसमा नीचे। आज मैं आगे, जमाना हैं पीछे

              मी माझ्या विचारातच हरवली होती, मला असे बघून पुजाने बोलायला सुरुवात केली,

पुजा---- जान्हवी मॅडम स्वप्नातुन जाग्या व्हा, बाबा येतील थोडया वेळातच, तुला अस बघून त्यांच्या मनात शंका उभी राहील. 

जान्हवी---- हो ना, तुझे म्हणणेही खरे आहे, चल मी राहिलेलं पटकन आवरून घेते.

      मी पुजासोबत गप्पा मारत मारत आवरत होते. थोडयाच वेळात बाबा होस्टेलला पोहोचले, मी माझे सामान गाडीत ठेवले, बाबांनी व मी कँटीन मध्ये नाश्ता केला, पूजा व प्रियाचा निरोप घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. गाडीत बाबांनी FM चालू केला, त्यावर रोमँटिक गाणी लागली की नकळतपणे माझ्या मनात श्रीराजचा विचार यायचा, खूप भारी फीलिंग होती. पूर्ण प्रवासात श्रीराजला काय रिप्लाय द्यायचा हाच विचार मी करत होते. श्रीराजचा विचार करत असताना घरी कधी पोहोचलो हे माझ्या लक्षातच आले नाही.

          घरी आल्यानंतर आईला मला बघून खूप आनंद झाला होता, मलाही खूप रिलॅक्स वाटत होते, आता रिझल्ट लागेपर्यंत कसलेच टेन्शन नव्हते. मी घरी गेल्यानंतर फ्रेश होऊन जेवण केले व आराम करण्यासाठी माझ्या रुममध्ये गेले. बेडवर बसल्यावर श्रीराजला काय रिप्लाय द्यायचा हाच विचार करत होते, शेवटी पूर्णपणे विचार करून झाल्यावर मी श्रीराजला मेल केला,

  प्रिय श्रीराज,

        मलाही तु खूप खूप आवडतो. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुझ्यासारखा प्रेम करणारा मुलगा माझ्या आयुष्यात आला. आपल्यावर कोणी प्रेम करत ही भावनाच खूप छान आहे. 

" प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचय."

माझ्या आवडत्या गाण्याच्या ओळी खाली लिहितेय त्या आत्ताच्या माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी परफेक्ट आहेत,

'आपकी नजरोंने समजा, प्यार के काबील मुझे दिल की ये धडकन ठहर जा, मिल गयी मंजील मुझे, आपकी नजरोंने समजा

जी हमें मंजूर है एक ये फैसला, कह रही है हर नजर,बंदा परवर शुक्रिया

दो जहाँ की आज खुशीया हो गई हासिल मुझे, आपकी नजरोंने समजा

आपकी मंजील हूं मैं, मेरी मंजील आप हो। कोई तुफानो से कहदे मिल गया साहिल मुझे आपकी नजरोंने समजा."

I LOVE YOU SHRIRAJ.

            मी मेल केल्या नंतर श्रीराजला मॅसेज केला, मेल चेक कर. मनातल्या भावना व्यक्त केल्यानंतर खूप हलके हलके वाटत होते. थोड्याच वेळात श्रीराजने मेल वाचल्यानंतर मॅसेज केला, I LOVE YOU SWEETHEART, तु केलेला मेल एकदा वाचून समाधानच होत नाहीये, पुन्हा पुन्हा वाचावा वाटतोय, आत्ता यावेळी तुझ्याशी फोनवर बोलण्याची खूप इच्छा होतेय पण मला माहित आहे तु घरी असल्याने आपल्याला फोनवर बोलता येणार नाही. इथून पुढे मॅसेजला रिप्लाय देत जा, मला तुझ्या मॅसेजची वाट बघायला लावू नकोस. गुड नाईट डिअर.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all