Login

पहिली भेट भाग २५

Story of friendship cum love

    दिवाळी आनंदात, उत्साहात साजरी झाली. मी खूपच आनंदी होते. श्रीराजसोबत लग्न ठरल्याची बातमी कधी एकदा जाऊन पुजा व प्रियाला देते अस मला झाले होते. तस फोनवर पण सांगता आलं असतं पण मला प्रत्यक्षात जाऊनच त्यांना ही आनंदाची बातमी द्यायची होती. दिवाळीची सुट्टी संपली, कॉलेजला परत जाताना आईने भरपूर फराळ बांधून दिला.

     कॉलेज ज्या दिवशी सुरू होणार होते, त्याच दिवशी सकाळी लवकर होस्टेलला पोहोचले. पुजा व प्रिया माझ्या थोड्या आधीच रूमवर पोहोचल्या होत्या. मला बघितल्यावर दोघींनीही प्रश्नांचा भडीमार चालू केला. मी त्यांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले तसेच चेहऱ्यावर नाराजी दाखवली.

पुजा--- जान्हवी घरी काय घडलं सांगणार आहेस का? तुझ्या चेहऱ्यावरुन तर अस वाटतंय की खूप काही गंभीर घडलं आहे, कृपा करून काय झालं ते लवकर सांगशील का?

जान्हवी--- पुजा जे घडलंय ते स्वीकारावं लागणार आहे, मी माझ्या आई बाबांच्या इच्छे विरोधात जाऊच शकत नाही, इथून पुढे त्यांच्या आनंदातच मला माझा आनंद मानवा लागेल. आता आपण कॉलेजला जाऊया, कॉलेज वरून आल्यावर संध्याकाळी मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगेन. आता सर्व सांगून मला तुमचा मूड खराब करायचा नाहीये.

प्रिया--- चालेल तु संध्याकाळी सांग पण असा चेहरा लटकवून दिवसभर वावरू नकोस, तुझा असा चेहरा आम्हाला बघवत नाहीये.

   आम्ही तिघी कॉलेजला गेलो, दिवसभर मी चेहऱ्यावर अति आनंद दाखवला नाही, बिचाऱ्या प्रिया व पुजा दोघीही माझ्यासाठी खूपच दुःखी झाल्या होत्या. मी जेव्हा त्यांना खरं सांगेन त्यावेळी मला त्यांचा खूप ओरडा खावा लागणार याची कल्पना होती. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर आम्ही तिघी रूमवर आलो.

पुजा--- जान्हवी आता तरी सर्व सांग, दिवाळीत घरी काय घडलं? तु श्रीराज बद्दल घरी सांगितलं का? घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?

जान्हवी--- अगं जरा थांब, सर्व सांगते, किती प्रश्न विचारशील? मला न विचारता माझ्या घरच्यांनी कांदेपोहे कार्यक्रम ठरवलेला होता, मला पाहुणे येण्याच्या काही तास आधी कल्पना दिली गेली, घरी सर्व तयारी केलेली असल्याने मला श्रीराज बद्दल सांगता आले नाही. पाहुणे आले, त्यांनी मला बघितलं आणि त्यांना मी पसंत पडले आणि माझं लग्न ठरलं.(मी सर्व एका दमात सांगून टाकलं)

प्रिया--- असं कसं लग्न ठरलं? तु बाबांना काहीच सांगितलं नाही का?

पुजा--- बाबांना convince करायच ना. काय यार जान्हवी तु पण ना. श्रीराजला माहीत आहे का तुझं लग्न जमल्या बद्दल?

जान्हवी--- हो श्रीराजला माहीत आहे.

पुजा--- श्रीराजची प्रतिक्रिया काय होती?

जान्हवी--- तो खूप खुश आहे.

प्रिया--- श्रीराज खुश का असेल?

जान्हवी--- कारण माझं लग्न त्याच्यासोबत ठरलं आहे म्हणून( मी एकदम शांततेत सांगितलं)

पुजा--- काय!परत बोल

जान्हवी--- माझं लग्न ज्या मुलासोबत जमलं आहे त्याच नाव डॉ श्रीराज देशमुख आहे.

प्रिया--- जान्हवी तु वेडी आहेस का? आधी सांगायला काय झालं होतं?

जान्हवी--- अगं मी तुमची गंमत करत होते.

मी सर्व इतंभूत कहाणी दोघींना सांगितली. प्रिया व पुजा दोघीजणी खूप खुश होत्या. 

पुजा--- जान्हवी I am so happy for you, आता तुला आम्ही ऑफिशियली श्रीराजच्या नावाने चिडवू शकतो.

       सगळं काही स्वप्नात घडल्याप्रमाणे वाटत होतं. दिवस कसे भरभर उडून चालले होते. श्रीराज त्याच्या अभ्यासात बिजी होता तर इकडे मी कॉलेजचे शेवटचे दिवस एन्जॉय करत होते. शनिवार रविवार आम्ही बाहेर फिरायला जायचो, खूप सारे फोटोसेशन करायचो. कॉलेजच्या सर्व आठवणी जपून ठेवायच्या होत्या.कॉलेज संपल्यावर पुन्हा सगळ्यांना कधी भेटता येणार होते काय माहीत म्हणूनच राहिलेले शेवटचे दिवस एकत्र जगून घेत येतो.

        बघता बघता इंटर्नशिप संपायला थोडेच दिवस बाकी राहिले होते. शेवटच्या आठवड्यात सारी डे, डेनीम डे, ट्रॅडिशनल डे, ग्रुप डे असे सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते. आम्ही सगळेच जण कॉलेजला खूप मिस करणार होतो. 

"कब मिलेंगे न जाने हम,         यारो फिर से सभी,                लौटकर अब ना आयेंगे,           वो मस्तीभरे दिन कभी,           हो दिल ए अपना कहे के ये दोसतो                           am really gonna miss this place                        am gonna miss my college days                    याद है वो सारे lecture ,        हमने जो बंक किये थे,          प्रॉक्सी का पकडा जाना,          वो लफडे क्या कम किये थे,      हो मिलके लिखना वो जर्नल,  और सबमिशन लास्ट मिनटं पे, एक्साम्स की वो तैयारी,      और लिखना वो तीन घंटे,        और बाहर आके वो कहना,      साला क्या बेकार पेपर सेट किया था यार                      मिलता फर्स्ट क्लास कभी यहा  तो लगती थी केटी कभी          लौट कर अब ना आयेंगे          वो मस्ती भरे दिन कभी          हो दिल ये अपना कहे के दोसतो                           am really gonna miss this place                        am gonna miss my college days                  याद आयेंगे येे टीचर्स          हमको दिल से हमेशा              याद आएगा ये कॅम्पस          और इसकी अपनी दुनिया        हो याद आएगा हमेशा           ये आशियां                          am really gonna miss this place                        am gonna miss my college days."

         गेल्या पाच वर्षांत कॉलेजची, तिथल्या वातावरणाची, मित्र मैत्रिणींची खूप सवय झालेली होती. आता वेळ आली होती ती कॉलेजला, मित्र मैत्रिणींना सोडून जायची. जेव्हा कॉलेजमध्ये आलो होतो तेव्हा रिकाम्या हाताने आलो होतो आता मात्र जाताना खूप आठवणी घेऊन जाणार होतो. पुजा व प्रियाची मला खूप आठवण येणार होती. पुन्हा आमची भेट केव्हा होणार याची आम्हालाच खात्री नव्हती. आम्ही तिघींनी एकमेकींना आमच्या तिघींचे फोटो असलेल्या फोटो फ्रेम्स गिफ्ट केल्या होत्या. 

    आमची सोबतची शेवटची रात्र होती, सामानाची पॅकिंग करून झाली होती. आम्ही तिघीही मस्त गप्पा मारत बसलेल्या होतो. भविष्याची स्वप्ने रंगवत होतो. जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. प्रियाने आमच्या साठी एक सरप्राईज दिले, तिने आमच्या तिघींच्या सर्व फोटोज चा मिळून एक अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला होता, त्याला साजेसं गाणं लावलं होत, तो व्हिडिओ आणि ते गाणं ऐकून एवढ्या वेळ आम्ही दाबून ठेवलेला आमचा अश्रूंचा बांध फुटला तो काही थांबायला तयार नव्हता.

"तेरे जैसा यार कहां                   कहां ऐसा याराना                      याद करेगी दुनिया                      तेरा मेरा अफसाना                     मेरी जिंदगी सवारी                   मुझको गलें लगाके                   बैठा दिया फलक पे                   मुझे खाक से उठाके                   यारा तेरी यारी को                      मैने तो खुदा माना                      याद करेगी दुनिया                      तेरा मेरा अफसाना                      मेरे दिल की ये दुआ हैं                कभी दूर तु ना जाये                     तेरे बिना हो जीना                       वो दिन कभी न आये                   तेरे संग जीना यहां                      तेरे संग मर जाना                       याद करेगी दुनिया                       तेरा मेरा अफसाना"

©®Dr Supriya Dighe