माझं कॉलेज संपून मी घरी परतले होते. माझे बाबा मला घ्यायला आले होते. 5 वर्षांपूर्वी ज्यावेळी मी कॉलेजला गेले होते त्यावेळी रिकाम्या हाताने गेले होते पण आता कॉलेजमधून परतताना माझ्याकडे एक डिग्री होती, नावापुढे डॉ लागलेले होते, नवीन मित्र मैत्रिणी लाभल्या होत्या, खूप साऱ्या आठवणी तयार झाल्या होत्या.
घरी आल्यावर थोड्या दिवस आराम केला. माझा सध्या तरी MD करण्याचा विचार नव्हता. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब करण्याची इच्छा होती. मी माझ्या मनातील विचार श्रीराजकडे बोलून दाखवला. श्रीराजनेही मला पाठींबा दर्शविला. श्रीराजने मला पुण्यात जॉब शोधायला लावला कारण पुढे जाऊन श्रीराजला पुण्यातच शिफ्ट व्हायचे होते. श्रीराजची एक्साम बाकी असल्याने आमचा साखरपुडा लगेच करता येणार नव्हता. मला पुण्यात जॉब मिळाला, पुण्यात नोकरी करण्याची बाबांनी परवानगी दिली.
गेल्या तीन महिन्यांपासून मी पुण्यात नोकरी करत आहे व तुझ्यासोबत राहत आहे. मागच्या आठवड्यात श्रीराजची एक्साम संपली. आमच्या घरच्यांनी आमचा साखरपुडा फिक्स केला आहे. पुढच्या महिन्यात आमचा साखरपुडा होणार आहे. श्रीराज मला भेटण्यासाठी आणि साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी पुण्यात येणार आहे. आज आम्ही पहिल्यांदाच भेटणार आहोत. रुची मॅडम आपल्या सर्व शंका दूर झाल्या का?
रुची--- जान्हवी तुझी खूप भारी लव्ह स्टोरी आहे. Its too much interesting. तुझ्या आणि श्रीराज मध्ये किती अप्स अँड डाउन आलेत पण तुमच एकमेकांवरील प्रेम काही कमी झालं नाही.
जान्हवी--- उलट ते दिवसेंदिवस वाढतच गेलं.
रुची --- जान्हवी मलाही श्रीराजला भेटायच आहे ग.
जान्हवी--- अरे भेटवेल ना, पण यावेळी मला एकटीलाच त्याला भेटायचे आहे, आधी आमची तर भेट होउदे मग तुलाही भेटवेल.
रुची--- चालतय की आज तुम्ही दोघे भेटा, मला कबाब मध्ये हड्डी नाही बनायचं.
जान्हवी--- आज तरी आमची भेट व्हायला पाहिजे ग, त्याला समोर बघण्यासाठी डोळे तरसले आहेत ग, देवाने खूप परीक्षा बघितली आहे, आता परत नको, आम्ही दोघांनी या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघितली आहे.
रुची--- जान्हवी डोन्ट वरी, आज तुमची भेट नक्कीच होईल. तु श्रीराज साठी काही गिफ्ट घेतले आहे का?
जान्हवी--- हो, एक शर्ट घेतला आहे आणि एका क्राफ्ट बुक मध्ये श्रीराजचे फोटो व त्याला साजेसं अस गाणं लिहिलं आहे, थांब तुला दाखवते.
क्राफ्ट बुक मध्ये श्रीराजचे फोटोज, तसेच आमच्या मॅसेजेस चे स्क्रीनशॉट्स, ज्या ज्या आमच्यात काही विशेष बोलणं झालं ती वेळ, ते मॅसेजेस आणि त्यांना अनुसरून गाणे लिहिले होते. खूप दिवस लागले होते मला ते बनवण्यासाठी पण बनवताना खूप भारी वाटत होतं. क्राफ्ट बुक बघताना आमचा आजपर्यंतचा प्रवास समजून येतो.
आमच्यात ज्या वेळी पहिल्यांदा बोलणं झालं, ज्या वेळेस श्रीराजने मला मैत्री करशील का? अस विचारलं होतं, त्या मॅसेजचा स्क्रीनशॉट प्रिंट करून चिटकवला व त्यासमोर हे गाणं लिहिलं,
"कह दो की तुम मेरे दिल में रहोगे कह दो की तुम मुझसे दोस्ती करोगे देखूंगी सोचूंगी कल परसो कुछ कहूंगी हम साथी कितने पुराने फिर क्यो हैं इतने अंजाने क्या रंग लाये ना जाने बचपन के ये दोस्ताने कब कहा क्या खबर जा रुके ये नजर अरे क्या पता कौन है किसका यहा हमसफर कह दो की तुम मेरे दिल में रहोगे कह दो की तुम मुझसे दोस्ती करोगे"
श्रीराजने मला जेव्हा मेल करून प्रपोज केले होते, त्या वेळची दिनांक व मेल ची प्रिंट काढून चिटकवली आणि त्या समोर हे गाणं लिहिलं,
जिंदगी की निंदो की सुबह इश्क हैं बडी खुबसूरत सी सजा इश्क हैं हमको प्यार हुआ पुरी हुई दुआ चल चले कही उडके हम चले कही आसमां इश्क हैं ख्वाहिशों सा खुला हैं मुझको छू गया इक अहसास अनछुहा जैसे कोई नशा आसमां में खुला हमको प्यार हुआ पुरी हुई दुआ ख्वाबों में कभी मैंने सोचा था नही चाहतों का खुदा मुझको इतना यु देगा बेफिकर चला अपनी ये डगर चला क्या पता था की दिल तेरी खातीर रुकेगा हमको प्यार हुआ पुरी हुई दुआ
पुढच्या पानावर मी श्रीराजच्या मेल ला जे उत्तर पाठवले होते तो मेल चिटकवला आणि त्यासमोर हे गाणं लिहिलं,
मुझे कहना कहना तुझसे हैं कहना मुझे रहना रहना तेरे दिल में रहना जान जान अब दर्द जुदाई सहना सहना मुझको नही सहना ओ कहना हैं कहना हैं,आज तुझसे कहना है रहना हैं रहना हैं, तेरे दिल में रहना है बेकरार दिल है प्यासी रैना है एक पल कही ना मुझको चैना है किसने किया है जादू ,होने लगी हूं बेकाबू मैं बनके दिवानी फिरती हूं क्यों, मैं तो ना जानू कहना हैं कहना हैं ,आज तुझसे कहना हैं रहना है रहना है, तेरे दिल मे रहना है
पुढील पानावर दिवाळीच्या वेळेस जेव्हा आमचं लग्न फिक्स झालं, त्यावेळेस माझा काढलेला हसरा फोटो लावला आणि त्यासमोर हे गाणं लिहिलं,
मुस्कुराने की वजह तुम हो गुणगुणाने की वजह तुम हो जिया जाये ना, जाये ना, जाये ना ओरे पिया रे... ओ रे लम्हे कही तु मत जा हो सके तो उमर् भर थम जा जिया जाये ना, जाये ना, जाये ना ओरे पिया रे... धूप आये तो... छाव तुम लाना ख्वाहिशों की बारीशो में भीग संग जाना जिया जाये ना,जाये ना,जाये ना ओरे पिया रे...
क्राफ्ट बुक बघून मी भूतकाळात हरवून गेली होती, तेवढ्यात माझा फोन वाजला, फोनच्या रिंगमुळे मी वर्तमान काळात परत आले. श्रीराजचा फोन येत होता, मी फोन उचलला,
श्रीराज--- हॅलो जान्हवी, काय करतेस?
जान्हवी--- रुचीला आपली स्टोरी सांगत होते, तु कुठे पर्यंत पोहचलास.मी तयारच आहे, निघू का?
श्रीराज--- जान्हवी एक प्रॉब्लेम झालाय.
जान्हवी--- काय?
श्रीराज--- इथे रस्त्यात एका कंटेनर चा अपघात झाला आहे, ट्रॅफिक जाम आहे.
जान्हवी--- मग आता?
श्रीराज--- कंटेनर रस्त्यातून बाजूला झाल्या शिवाय रोड मोकळा होणार नाही. मला यायला वेळ लागू शकतो.
जान्हवी--- आपली आज पण भेट होणार नाही का?
श्रीराज--- काही झालं तरी आज आपली भेट होईलच, एवढंच आहे की मला यायला उशीर होईल. इथे रेंज चा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक क्लिअर झाली की फोन करतो, माझी काळजी करू नकोस. मी फोन ठेवतो.
एवढे बोलून श्रीराजने फोन कट केला. आमची भेट होण्यात एवढे विघ्न का येत आहेत, हे कळतच नव्हते.
रुची--- जान्हवी तु बनवलेली क्राफ्ट बुक मस्तच आहे, श्रीराजला खूप आवडेल, बर मला सांग श्रीराज कुठे पर्यंत पोहचलाय?
जान्हवी--- रुची श्रीराज ट्रॅफिक जाम मध्ये अडकलाय, यायला उशीर होईल असं म्हणाला.
रुची--- ओके मग त्यात एवढी काळजी करण्यासारखे काय आहे?
जान्हवी--- रुची आज तरी आमची भेट होईल का?
रुची--- होईल ग, डोन्ट वरी.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा