आपण मागील भागात बघितलं, श्रीराज जान्हवीला भेटण्यासाठी यायला निघालेला असतो, पण श्रीराज ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेला असतो. जान्हवीला टेन्शन येते की आज तरी श्रीराज व तिची भेट होईल का?
जान्हवी श्रीराजच्या फोनची वाट बघत असते, तिला असे झाले होते की कधी एकदा श्रीराजचा फोन येतो ट्रॅफिक क्लिअर झाली हे सांगायला. जान्हवीला मिनिटे तासांप्रमाणे भासू लागले. अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर श्रीराजचा फोन येतो, ट्रॅफिक क्लिअर झाली आहे, बस निघाली आहे, अजून एका तासानंतर बस स्टॉप वर पोहचेल, तु मला स्टॉप वर येऊन भेट.
श्रीराजचा फोन ठेवल्या ठेवल्या जान्हवीने रुचीला कडकडून मिठी मारली, जान्हवी खूप आनंदात होती. अखेर तो क्षण आला होता. जान्हवी आणि श्रीराजची पहिली भेट होणार होती.
जान्हवीने तोंडावर पाणी मारलं, ती फ्रेश झाली, जान्हवी केस विंचरताना गाणे गुणगुणत होती,
सजना है मुझे सजना के लिए
सजना है मुझे सजना के लिए
जरा उलझी लटे संवार द
हर अंग का रंग निखार लून के सजना है मुझे सजना के लिए
रुची जान्हवी कडे बघून हसत होती.
जान्हवी--- रुची तुला हसायला काय झालंय?
रुची--- काही नाही ग, श्रीराजला भेटण्यासाठी तु किती आतुर झाली आहेस?
जान्हवी--- अगं इतक्या वर्षांनंतर आणि पहिल्यांदाच भेटतोय, मग आतुरता तर असणारच ना.
रुची--- हो ना, माझ्याशी बोलण्यात टाईम पास करू नकोस, तुझी पटकन तयारी कर आणि जा, श्रीराज पोहोचण्या आधी तुला बस स्टॉप वर पोहचायला हवं.
जान्हवी पटपट तीच आवरते, श्रीराज साठी घेतलेला शर्ट व तिने बनवलेली क्राफ्ट बुक सोबत घेते, श्रीराजने गिफ्ट केलेले घड्याळ हातात घालायला विसरत नाही. जान्हवी रुचीचा निरोप घेऊन बाहेर पडते, रिक्षात बसण्याआधी जवळच्या स्टोअर मध्ये जाऊन श्रीराज साठी डेरी मिल्क सिल्क हार्ट पॉप वाली कॅडबरी घेते. रिक्षात बसून जान्हवी बस स्टॉप कडे निघते. काही वेळातच जान्हवी बस स्टॉप वर पोहोचते. श्रीराजची बस पोहचायला अजून पंधरा मिनिटे अवकाश होता.
जान्हवी श्रीराजची बस जिथे येऊन थांबेल, तिथे समोरच उभी होती. जान्हवीच्या आजूबाजूला भरपूर गर्दी होती, गर्दीचा गोंगाट चालू होता, पण जान्हवी आतून मात्र शांत होती. श्रीराजच्या बसकडे जान्हवीचे डोळे लागले होते.
थोड्याच वेळात श्रीराजची बस जान्हवी समोर येऊन थांबते, जान्हवी बस मधून उतरणाऱ्या प्रत्येकाला न्याहाळत होती. अखेर तिला बस मधून उतरणारा श्रीराज दिसला, श्रीराजचे काही जान्हवी कडे लक्ष नव्हते. श्रीराज जान्हवीला इकडे तिकडे शोधू लागला, तोच जान्हवीने श्रीराजला आवाज दिला, श्रीराजने जान्हवी कडे बघून स्माईल दिली.
“नजरेत नजर मिळाली होती पापण्यांना बंद होण्याची भूल झाली होती
शब्द मनात घोंगावत होते
बोलल्याचा भास करावीत होते तेवढ्यात वाऱ्याचा स्पर्श झाला
तिच्या बोलण्याचा आवाज त्याच्या कानी आला
नकळत त्याच्या ओठांवर हसू अवतरले
त्या हसण्याने तिचे मन मात्र जिंकले.”
दोघांचीही पावले त्यांच्या नकळतच एकमेकांच्या दिशेने सरकत होती, त्यांना आजूबाजूच्या गर्दीचे, त्या गोंगाटाचे कसलेच भान उरले नव्हते, अखेर एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले,
तो क्षण गोड होता
नजर मिळत नव्हती नजरेला काय कळलं काय माहीत
माझ्या या वेड्या मनाला
निरव शांतता होती
हृदय धडधडत होत फक्त
मनातील भावना सुद्धा
पटकन होत नव्हत्या व्यक्त
किती तरी वेळ दोघे एकमेकांकडे फक्त बघतच होते, तोच जान्हवीला कुणाचा तरी धक्का लागला, जान्हवी तोल जाऊन पडणार तोच श्रीराजने त्याचा हात पुढे करून तिला सावरले, नक्कीच ह्या क्षणी दोघांनाही एकमेकांना कडकडून मिठी मारायची होती पण आजूबाजूच्या गर्दीचे भान राखून दोघांनाही स्वतःच्या भावनांना आवर घातला.
श्रीराज--- जान्हवी आपण इथेच उभे राहणार आहोत का?
जान्हवी--- अरे नाही, मला सुचलच नाही, कुठे जायचं?
श्रीराज--- मला माहीत आहे, तु सकाळपासून काहीच खाल्लेलं नसेल तर पहिले आपण एखाद्या कॅफे मध्ये जाऊन काही तरी खाऊ मग तिथेच ठरवूया, पुढे कुठे जायचं?
श्रीराज व जान्हवी जवळच असलेल्या एका कॅफेत जातात, दोघेही जे खायच त्याची ऑर्डर देतात. फोनवर खूप बोलायचे पण आता प्रत्यक्ष भेटल्यावर काय बोलायचे हा दोघांनाही प्रश्न पडला होता.
श्रीराज--- जान्हवी आपण असेच शांत बसणार आहोत का?
जान्हवी--- अस समोरासमोर आज आपण पहिल्यांदाच भेटतोय ना, मला तर काय बोलाव हेच सुचत नाहीये.
श्रीराज--- माझीही परिस्थिती तशीच आहे.
मग हळूहळू दोघेही बोलायला सुरुवात करतात, जान्हवी श्रीराजला शर्ट, कॅडबरी आणि क्राफ्ट बुक देते, श्रीराजला क्राफ्ट बुक तर खूपच आवडते. श्रीराजने जान्हवी साठी एक हार्ट शेप पेंडेंट असलेली सोन्याची चैन आणलेली असते तसेच टेम्पटेशन कॅडबरी आणलेली असते. जान्हवी चैन बघून खूप खुश होते, तिला चैन प्रचंड आवडते.
अशा रीतीने जान्हवी आणि श्रीराजची पहिली भेट होते.
( मला कल्पना आहे की आपणा सर्वांनाही जान्हवी आणि श्रीराजच्या पहिल्या भेटीची ओढ लागलेली होती. तुम्हाला श्रीराज व जान्हवीची पहिली भेट कशी वाटली हे प्रतिक्रिया द्वारे कळवा)
©® Dr Supriya Dighe