Login

फिशटॅन्क भाग १

फिशटॅन्क ही कथा , पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. सत्य परिस्थिती शी या कथेचा काही संबंध नाही. कुठे साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथेत एक आई स्वतःला व आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता मृत्यूनंतर धडपडते. व एक अनाथ म्हणवणारी मुलगी तिला कशी मुक्ती मिळवून देते यावर कथा लिहिली आहे.
फिशटॅन्क (भाग १)
---_---_---_---_---_---_---_---_---_---_---_
नाव एमा .सडपातळ बांधा, मध्यम पेक्षा जराशी उंच, कमरे पर्यंत रुळणारे रेशमी ;हलक्या सोनेरी रंगाचे केस , गोर्‍या वर्णाची, पाहताक्षणी नजरेत बसणारी, नितळ त्वचा, बोलके पाणीदार डोळे जे लाइनर मुळे अधिक उठून दिसत होते , सरळ नाक, फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेले होठ , फिकट गुलाबी - जांभळ्या रंगाची नाजूक फुलाची नक्षी ; मेगा स्लिव्हस असलेला पोटरी पर्यंतचा फ्रॉक, कमरेला लेदरचा ब्राऊन कलरचा बेल्ट, एका हातात डेनीम चा जॅकेट , पायात मध्यम हील असलेले ब्राऊन कलरचे सॅन्डल व व्हील असलेल्या दोन ट्रॅवल बॅग तसेच खांद्यावर तिरकी स्लिंग बॅग टांगलेली जवळपास चोवीस वर्षाची एक तरुणी दिल्ली एअरपोर्ट मधून हरियाणा येथे जाण्याकरिता कॅब बूक करत होती. भारतात ती पहिल्यांदा आली होती. येथील प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी नवीनच होती. हरियाणा येथे तिच्या एका मित्रा चे घर होते ती तेथेच थांबणार होती. परदेशात ती एका भारतीय कुटूंबा सोबत राहत असल्याने थोडी फार हिंदी कळत होती. पण कॅब मधे एकटे कसे जावे या भितीपोटी तिने फ्लाइट मधे नुकतीच ओळख झालेल्या व हरियाणा मधेच राहणाऱ्या एका मुली सोबत जाण्याचे ठरवते. त्या मुलीला घेण्याकरिता तिच्या कुटूंबातील तिचा मामा आलेला असतो. त्या मुलीला जेव्हा एमा सोबत यायचं विचारण्या करिता जाते तेव्हा पिहू तिला म्हणते आम्ही देखील हरियाणा येथेच जात आहोत तू चल आमच्या सोबत सुखरूप पोहोचशील .तुझी कॅब कॅन्सल कर मी मामा सोबत बोलते तुला सोबत घेऊन जाण्याकरिता. एमा खुश होते व कॅब कॅन्सल करते. पिहूने देखील मामाला विनवणी करून एमा सोबत घेण्यास राजी करते .अशाप्रकारे एमा चा प्रवास हरियाणाच्या दिशेने सुरु होतो. प् पिहूचे मामा एमा ला विचारतात "हरियाणा मधे कुठे जाणार आहेस ? "
यावर एमा उत्तरते "मोरनी हिल्स , पंचकुला " .
पिहूचे मामा ओके म्हणत गाडी चालवू लागतात.
मामा पिहूला उद्देशून : " पिहू आधी एमा ला घरी पोहचवू तिच्या मग आपण आपल्या घरी जाऊ".
पिहू होकारार्थी मान डोलावते.
पंचकुला नाव एकताच पिहू ला बालपणाची आठवण येते. त्या गोड आठवणी सोबतच काही विदारक आठवणी देखील जाग्या होतात. पिहूला त्यांच्या घरी तिच्या काकी सोबत केलेले वाईट कृत्य आठवतात तसेच कशाप्रकारे तिच्या आईसोबत सासरच्यांनी छळ केलेला असतो तो देखील आठवतो.
पंचफुला हे पिहूच्या आईचे सासर जेथून तिच्या आईला हुंड्यासाठी छळ करून बेदखल करण्यात आलेले असते.त्यावर पिहू नंतर तिच्या आईला दुसरे अपत्य पाच-सहा वर्षापर्यंत होत नाही. पिहूच्या आजोळी मुलींचा तिरस्कार करत नसतात मात्र मुलाचा अट्टाहास असतो. याच कारणामुळे पिहू च्या आईला देखील सोडचिठ्ठी देण्यात येते. तेव्हा पिहूचे वय सात वर्षाचा असते. त्यानंतर मात्र पिहू पुन्हा कधीच आपल्या बाबांच्या घरी जात नाही व तिचा मामा देखील भाचीला कधीच पाठवत नाही. ना पिहू चे बाबा कधी यांची विचारपूस करत. पाच वर्षाची असताना तिचे काका बलविंदर हे अमेरिकेत स्थायिक होतात.पिहू ची काकी तेव्हा दुसऱ्यांदा गर्भवती असते. कुसुम ही प्रियाची चुलत बहीण अवघ्या सात महिन्याचे असते. पिहूला पुसटशा आठवणी जाग्या होतात.तिला आठवते तेव्हा तिची काकी देखील काकांसोबत अमेरिकेत जाते. अमेरिकेत गेल्यानंतर पिहूचे काका कुसुमला एका बाईला दत्तक देतात. जेव्हा काकी याचा विरोध करते तेव्हा तिला बंदी करून ठेवण्यात येते.याच काळात पिहूच्या काकीला मुलगा होतो. येथे भारतात घरी कळविण्यात येते व घरी सर्वजण खूप आनंदी होतात.मुलाला घेऊन भारतात येण्याचे घरातल्यांनी आग्रह करताच पिहू चे काका जमत नसल्याचे कारण देत भारतात येण्यास नकार देतात. घरी मात्र सर्वजण सुनेचे कौतुक करत असतात. कुसुम जिला नेहमी टाळले जात असे तिला देखील सर्वजण प्रेम करू लागतात . पण हे सर्व दुरूनच सुरू होते. दूरवर असलेल्या अमेरिकेत काय सुरू आहे याची कोणाला साधी कल्पनाही नसते. पिहू चे बाबा दुसरे लग्न करतात व पिहू च्या आईला टाकून देतात. सात वर्षाची पिहू जिला जरी जे घडत आहे हे काय सुरू आहे कळत जरी नसले तरी देखील ती पाहत असते. ह्याच सर्व विचित्र घडणाऱ्या घटना त्या बालमनावर आयुष्यभरासाठी कोरल्या जातात. पिहू च्या आईला दुसरे लग्न करण्यास सर्वजण विनंती करतात मात्र घरात झालेल्या छळाने ती इतकी घाबरते की पुन्हा लग्न करण्यास नकार देते.
या सर्व आठवणी डोळ्यासमोर एक एक करून येत असतात. पिहूचे डोळे भरून येतात. हे पाहून एमा ला काळजी वाटते. कारण गाडीत खूप वेळा पासून एक शांतता पसरलेली असते. दोन्ही मुली थकून आल्या आहेत तसेच पिहूच्या मनात कोणत्या विचारांचा काहूर माजला आहे याचा अंदाज घेत पिहू च्या मामांनी तासाभरा नंतर गाडी एका हॉटेल मधे थांबवून दोघी मुलींना फ्रेश होण्यास सांगतो. दोघी फ्रेश होऊन थोडासा सॅन्क्स व ज्यूस घेतात.
पंचकुला मधे कोठे ? कोणाच्या घरी ? ह्याची विचारपूस करणे पिहू व मामा दोघेही टाळतात. त्या दुःखद आठवणी त्यांना नकोशा वाटतात .


क्रमशः
----- --------------------
लेखिका : अहाना
0

🎭 Series Post

View all