Login

फिशटॅन्क भाग २

फिशटॅन्क ही कथा , पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. सत्य परिस्थिती शी या कथेचा काही संबंध नाही. कुठे साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथेत एक आई स्वतःला व आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता मृत्यूनंतर धडपडते. व एक अनाथ म्हणवणारी मुलगी तिला कशी मुक्ती मिळवून देते यावर कथा लिहिली आहे.
फिशटॅन्क (भाग २)
---_---_---_---_---_---_---_---_---_---_---_

स्नॅक्स व ज्यूस घेऊन झाल्या नंतर पिहू तिचा मामा व एमा तिघेही पंचकुला साठी रवाना होतात. अजून दोन तासाचा रस्ता पार करायचा असतो. संध्याकाळ होत आली असल्याने वेळ न दडवता लवकर पोहचण्याचा प्रयत्न करतात.
या दरम्यान एमा व पिहू एकमेकांच्या बद्दल आणखी जाणून घेतात. मधेच एमा ला मामा विचारतात
" एमा ! बेटा तू येणार आहेस हे या लोकांना माहिती नाही का ? "
एमा : " हो माहीत तर आहे ."

मामा : " तू पहिल्यांदाच आलीस इथे मग कोणी घ्यायला का नाही आल बरं ? जर आम्ही नसतो व काही बर वाईट झाल तर ? पाहूणी न तू त्यांची ?"

यावर एमा म्हणते " बरोबर आहे मामा तुमचं पण मी माझी एकटी जाईन घरी हा माझाच हट्ट होता ."

हे ऐकून मामा शांत राहतात.
पाहता पाहता पंचकुला हे ठिकाण जवळ येत.
" एमा कॉल करून कळव त्यांना पोहोचलीस ते . कुठे सोडायच ? विचारून घे ." मामा एमा ला म्हणतात .

एमा कॉल करून मित्राच्या घरच्यांचा फोन नंबर घेते. मित्राकडून कळत की तो देखील २ दिवसांत येणार आहे.
एमा ऐकून खूश होऊन पिहू ला देखील सांगते. बोलता बोलता पंचकुला मधे प्रवेश करतात. पंचकुला जिल्ह्यात मोरनी या शहरात एमा जाणार असते. एमा म्हणते मला फक्त शहरात सोडा मला तिथे घ्यायला येणार आहेत. मामा तिला मोरनी शहरात बस स्टॅन्ड वर सोडतात. पिहू व एमा एक दुसऱ्याचा निरोप घेत असताना नंबर देखील घेतले जातात. थोड्याच वेळात आय 20 येते एमाला घेण्याकरिता. गाडीत एक वयस्क व्यक्ती दिसते व एक वाहन चालक पिहू ची नजर त्या वयस्क व्यक्तीवर थांबते. काय म्हणावे काही सूचत नाही वयस्क व्यक्ती ला पिहू नमस्कार करून एमा ला निरोप देते. पिहूचे मामा फोन आले असल्या कारणाने भेटू शकत नाहीत.
उशीर होतो म्हणून मामा व पिहू देखील निघतात घरी जाण्याकरिता. येथून अर्ध्यातासाच्या अंतरावर पिहू चे घर चंदीगड येथे असते. पिहू तिच्या मामाला म्हणते " मामा ते एमा ला घ्यायला कोण आले होते पाहील का?"
मामा म्हणतात " नाही गं ."
पिहू : " मामा प्रार्थना कर एमा सुखरूप असावी म्हणून. एमा ला प्रवासात मी ओळखल आहे चांगल. अमेरिकेत राहते खरी पण भोळी आहे."

मामा पिहूला :" हो तशी फार चांगली वाटली मुलगी ती . तू प्रार्थना करायला का म्हणाली मला?" काळजी ने .
पिहू : " ते माझे आजोबा होते. त्यांना मुली नकोशा वाटतात हिचा सांभाळ करतील ते ?"
मामा हे ऐकून थक्क होतो. पिहूला म्हणतो कॉल कर तिला विचार पोहोचली का सुखरूप ? नंतर मी बोलतो तिच्या सोबत.
वेळ न दडवता पिहू एमा ला कॉल करते व विचारपूस करते. यावर एमा घरा जवळच असल्याच सांगते. पिहू ला परत शंका येते ती वयस्क व्यक्ती आजोबाच असतील का नेमके ? ती परत एमाला गावाच नाव विचारते एमा उत्तरते " करोह पिक".
पिहू ला हुंदकाच लागतो ऐकून. " माझेच विचार वाईट इतक्या काळात काय काय बदललं नाही मग ही लोक थोडीच तशी च्या तशी राहणार बदलली असणार. आणि हो करोह पिक मधे का फक्त एकट्या माझ्या बाबांच घर थोडीच आहे. " पिहू स्वतःशी पुटपुट करून गाडी बाहेर पाहत शांत बसते. फार थकलेली होती पिहू घराजवळ गाडी येणार त्या दहा - पंधरा मिनीटांत पिहूचा डोळा लागतो.
पिहूचे घर येते मामा " पिहू !बेटा उठ जा. " म्हणत तिला जागवतात. पिहूची आई व मामी भाकरतुकडा घेऊन मुख्य दारात उभ्या असतात.
इथे एमा देखील करोह पिक येथे पोहोचते. तेथील थंड वातावरणाने तिचा थकवा दूर होतो. गावी सर्वांना एमा येण्याची माहीती असते. शेजारची लोक उत्सुकतेने वाट पाहत उभे असतात. गावाच्या वेशीतून गाडी आत वळते हे वळण एमाचे आयुष्य वळवणारे असते.


क्रमश :
---------------------------
लेखिका : अहाना
0

🎭 Series Post

View all