Login

फिशटॅन्क भाग ३

फिशटॅन्क ही कथा , पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. सत्य परिस्थिती शी या कथेचा काही संबंध नाही. कुठे साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथेत एक आई स्वतःला व आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता मृत्यूनंतर धडपडते. व एक अनाथ म्हणवणारी मुलगी तिला कशी मुक्ती मिळवून देते यावर कथा लिहिली आहे.
फिशटॅन्क ( भाग ३)
---_---_---_---_---_---_---_---_---
एमा करोह पिक येथे पोहोचते. करोह पिक मधे सनीच्या ( एमाचा मित्र) घरी एमा प्रवेश करते.
भल मोठं गेट , आत प्रवेश करताच एक मोठा दरवाजा अगदी जुन्या काळातील मजबूत बांधकाम असल्याचे दर्शवत होता. प्रशस्त घर, सूर्य मावळला होता. मावळतीला लावलेले दिवे, धूप बत्तीचा सर्वत्र दरवळणारा सुगंध सर्व काही एमाला सुखावत होते.

अगदी भारतीय पद्धतीनुसार एमाचे स्वागत केले जाते. एमा हे सर्व पाहून भारावते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद असतो. सनीची काकी ( पिहूची सावत्र आई ) आत येण्यास सांगते. इतक्यात आजी येऊन एमाला मिठी मारते.

" मुलगी थकून आली आहे जेवायचं वगैरे विचारा." म्हणत आजोबा एमाच्या बॅग घरातील गड्याला देतात. एमा फ्रेश होऊन येते तोच डायनिंग टेबल वर जेवण लावलं जातं. सर्व जण आपापल्या खूर्चीवर बसतात. टेबलवर आजी - आजोबा , काका - काकी व त्यांची दोन मुलं नील आणि अंबर. सर्वजण जेवण उरकतात. जेवता जेवता एमा सोबत गप्पा मारताना वेळ निघून जातो. एमा थकलेली आहे हे पाहून सर्वजण तिला आराम कर सकाळी बोलूया म्हणतात. एमा देखील झोपण्याकरिता जाते. रूममधे जाऊन बेडवर पडली असताच तिला हेच घर दिसू लागते पण वेगळे त्या घरात सनीची आई , एक लहान मुलगी, छोटासा एक मुलगा दोन - तीन वर्षाचा. एमा दचकून जागी होते. पाणी पिऊन पुन्हा कुस बदलून झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला झोप लागत नाही. कुस बदलत बदलत पहाटेच्या वेळी कधी काय तो एमाचा डोळा लागतो.

सकाळी घरात भजनाच्या आवाजाने एमाचे डोळे उघडतात. हडबडून एमा जागी होते वेळ पाहते तर सात वाजलेले असतात. भारतीय संस्कृतीबद्दल ऐकून असल्याने एमा अंघोळ वगैरे करूनच खाली तळघरात येते. सर्वांची नजर एमावर खिळते. आजी एकदमच उच्चारते, " कुसूम ! पुत्तर आजा आरती लेनी है। " . उपस्थित सर्व सदस्य आजीकडे आवाक होऊन पाहतात. एमा इथे तिथे पाहत असते. आजी इशार्‍याने तिला बोलावतात व आशीर्वाद देतात. आरती झाल्यानंतर सर्वजण नाश्ता करतात नंतर एमा सर्वांना तिने आणलेले भेटवस्तू देते.

सर्व पुरुष मंडळी आपापल्या कामावर निघतात. आजी एमा ला घेऊन तिच्या खोलीत जाते. आजी एमा ला म्हणते " एमा
पुत्तर तू माझ्या कुसूम सारखी वाटते ." एमा हे ऐकून प्रश्नार्थक नजरेने पाहात होती. आजी म्हणते "त्रास दिला ग माझ्या कळीला त्रास दिला मुलगा हवा होता झाला तरी त्या मुलीशी माझी अजून भेट झाली नाही. मरण्यापूर्वी तर पाहावं मी तिला असं वाटतं. सुंदर बाहुलीसारखी पोरं ती ." म्हणत आजी रडू लागते. एमा त्यांना धीर देते व विचारते, " कुसूम कोण आहे ?" आजी म्हणते " माझी नात तुझ्या मित्राची बहीण, बलविंदर. अमेरिकेत मुलगी लंडनमधे शिकते आहे. वीस वर्ष उलटली अजून तिला पाहिलं नाही मी."

एमा वेळ सांभाळून घेते व म्हणते " येईल ती काळजी नका करू."

आजी एमाला " तू तिथेच राहते ना शेजारी तू पाहिलस का तिला ? कशी दिसते ग ती ? काय शिकते आहे एवढं ? भारतात कधी येतचं नाही ."

एमा : " आजी ती ठीक आहे, खूप उच्चशिक्षण घेत आहे. ती येणार होती पण तिला सुट्टी मिळाली नाही ."

एमा वेळ सावरून घेत खरं पण कुसूम ही सनीची बहीण आहे तर सनीच्या घरी फक्त तीन जणचं कसे ? एमा तात्पुरत दुर्लक्ष करते व ज्या कामानिमित्त ती भारतात आली होती त्या कामावर लक्ष देते. एमाचं पदवी शिक्षण पूर्ण होऊन ती आयुर्वेदीक औषधीवर रिसर्चसाठी भारतात आलेली असते.

दोन दिवसांत सनी देखील तिच्या मदती करता भारतात येतो. सनी आल्यानंतर एमा व सनी रिसर्चकरिता भारतातील विविध इंस्टिट्यूटला भेट देण्याच ठरवतात. दोघेही अचानक पंधरा दिवसांत तयार झाल्याने पूर्वतयारी साठी वेळ मिळत नाही.

सनी एमा सोबत आठवडाभर फिरण्याचं ट्रॅकिंगचं प्लान करतो. एमा देखील चेंज व व्यापातून विश्रांती घ्यावी यासाठी होकार देते. करोह पिक हे एक हिल स्टेशन मस्तपैकी थंड थंड वातावरण, हिमालय पर्वत रांगांनी वेढलेलं नैसर्गिक सौदर्याने नटलेलं ठिकाण.

सनी आलेल्या तिसऱ्या दिवशी सनी व एमा तयार होऊन पर्वत सैर करायला निघतात. एमा रेडी होऊन खाली येत असते. जिन्याच्या बाजूच्या खोलीत तिला कोणी तरी असल्याचे जाणवते. तिला दिलेल्या माहितीनुसार ती खोली सनीच्या बाबांची होती ज्यात सनीचे बाबा वेळ घालवायचे आपले छंद जोपासायचे. ती खोली फक्त सकाळी उघडली जायची त्या व्यतिरिक्त तिथे कोणी फिरकतही नव्हते. एमाला वाटते सनी आतमध्ये असावा. उत्सुकतेपोटी एमा दरवाज्याजवळ जाते तर खोलीत नजर पडताच तिला दरदरून घाम फुटतो.

सनी मागून एमा जवळ येतो " इथे काय करते आहेस ? कोणी जास्त जात नाही ह्या खोलीत. आपण फिरून आलो की तुला दाखवतो खोली. " म्हणत तिचा हात धरून तिला बाहेर आणतो.
जिना उतरुन खाली येताच नील व अंबर "पॅन्ट पहनना भूल गयी क्या ? " म्हणत हसू लागतात. एमाला देखील हसू येते. हसत हसत दोघेही घरातून निघतात. एमाच्या डोक्यात मात्र ती खोली व त्यातील व्यक्ती जात नाहीत.
त्या खोलीत एमाने असे काय बरे पाहिले असेल ? विचार करा. उत्तर मिळेल पुढच्या भागात .

क्रमश:
---_---_---_---_---_---_---_---_---_
लेखिका : अहाना
0

🎭 Series Post

View all