Login

फक्त तू.... ओढ तुझी.... भाग आठ

विराजस भावुक होतो

डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग आठ

मागील भागात आपण पाहिलं कि, अवनीला संचित समजावतो, तर तिकडे संचितला अवनी आवडते. आता पाहूया पुढे,


इकडे वैताकून वीर आणि जय हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकावर येऊन बसतात.
वीरचा चेहरा आधीच लाल झालेला असतो, पण आता रागापेक्षा अवनीचे शब्द त्याच्या कानात सतत घुमत असतात.
तो शांत होण्याऐवजी अजूनच चिडलेला असतो.
वीर एकदम उद्विग्न स्वरात जयकडे पाहून म्हणतो,


“ऐकलंस ना ती पोरगी काय काय बोलत होती?!
जणू मी काही अट्टल गुन्हेगार आहे!
श्रीमंत आहे तर काय झालं?
हिच्या बापाने दिलेली काय दारू मला प्यायला??”

तो चिडून हात तिथल्या बाकावर आपटतो...

“दारू मी प्यायलो… हो!... हिच्या बापाच्या पैश्याने तर नाही ना... न ही कोण मला.... The ग्रेट विराजसला ऐकवणारी.... "

जय हळू उठतो आणि त्याच्याकडे निर्विकारपणे पाहून म्हणतो,


“तू का तिचं बोलणं एवढं मनाला लावून घेतोस, वीर?
सोड ना…
काकांनी तुला त्या हॉटेलवर जायला सांगितलं आहे.
तिकडे जाऊन स्वतःला कामात गुंतव.”

हे ऐकताच वीर अजूनच भडकतो.
तो जयकडे अजूनच रोखून पाहतो.

"जय...मुर्खा … तू ऐकलंस ना तर काय मूर्खासारखं बोलतोस....आता जे मी ऐकलं, जे पाहिलं…
त्याचा काहीच फरक पडत नाही का तुला?
आणि वरून तू मला हॉटेलची आठवण करून देतोयस?”


तो अस्वस्थपणे उभा राहतो,
हात केसांत फिरवतो.

“कधी कधी खरंच मला समजत नाही, जय…
तू माझा दोस्त आहेस की माझ्या विरोधात उभा राहिलेला माझा कट्टर दुश्मन.....
मी चिडलेला आहे दिसतोय ना????
आणि अशा वेळी तू मला शांत बसायला सांगतोयस?
मी सोडून सगळ्या दुनियेचा तुला पडलेले आहे....

एवढं बोलून तो थोडा थांबतो.त्याचा आवाज जड होतो.

“जय मला सध्या सल्ल्यांची गरज नाही रे…
फक्त थोडं मला समजून घेणे हवं आहे...."


तस जयला पटकन मिठी मारतो.....थोडा वेळ त्याच्या केसातून हात फिरवतो.. जयला चांगलंच ठाऊक होत.. विराजस किती हळव्या मनाचा आहे ते..हा त्याला राग येतो पण तेवढाच तो मनाने नाजूक आहे. कुणाचंही बोलणे त्याला पटकन लागत... पण तो फक्त त्याच्या पुढेच मोकळा होतो. लहानपणापासून कडक शिस्तीत वाढल्यामुळे तो जरा बंडखोर झाला होता. पण जेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते तो लगेच माफी मागतो....


आता कश्या प्रकारे जय वीरला समजावेल...???



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"