Login

फक्त तू... ओढ तुझी...भाग पाच

जय वीरला समजावतो
डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग पाच

मागील भागात आपण पाहिलं कि,विराजस घराबाहेर येतो. बॅग हातात होती त्याच्या डोळ्यांत  दुःख दिसत होतं, पण चेहऱ्यावर असलेला हट्टीपणा काही केल्या गेला नव्हता. आता पाहूया पुढे...,

तेवढ्यात काळी कार घरासमोर थांबते.

तर दारात त्याचा जिवलग सखा जय उभा होता.... त्याची वाट पाहत.......जय देशमाने, विराजसचा लहानपणापासूनचा जिगरी मित्र.
थोडा गंभीर, पण विराजसच्या हट्टीपणाला नेहमीच सांभाळणारा आणि प्रसंगी त्याला ऐकवून दाखवणारा.


त्याला पाहून विराजस पटकन पुढे होऊन मिठी मारतो.
तस त्याला बाजूला करत जय नाटकीपणे म्हणाला,


"चला आता खऱ्या आयुष्याची मज्जा करायला..... राजाचा आता रंक झाला आहे आणि ह्यासाठी तुला ऑल द बेस्ट.."

ते ऐकून विराजस तोंड वाकडं करून बॅग टाकतो.


“माझं आयुष्य माझ्याच बापाने उध्वस्त केलंय.
मला नकोय कोणाचे लेक्चर.... आणि तू शहाण्या शांत बस... पुढे काय करायचं मला सुचत नाही.... आणि मी काही ड्याडने सांगितल्याप्रमाणे करणार नाही आहे... "

जयने दीर्घ श्वास घेत विराजसकडे पाहिलं.
त्याला माहित होतं, त्याचा मित्र वरून कडक आणि हट्टी दाखवतो पण आतून तुटलेला, घाबरलेला आणि मनमिळावू आहे....

“वीरु … शांत हो जरा.
“नीट बोल.
तुझे डॅड वाईट नाहीत… तू चुकलास.
चल, आधी त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये भेटायचंय.”

ते ऐकून विराजस चिडतो.

विराजस:
“कोणाची आणि कसली भेट? मी कोणाला भेटणार नाही पैसे देऊ, आपल काम संपलं.”

जय कारचं दार बंद करत म्हणतो,

"पैसे देऊन सांभाळता येत नाही विराज.
त्या मुलाला आज भेटणं तुझी जबाबदारी आहे... ह्यापासून तू दूर पळू नकोस....”

"माझ्या जागी तू असतास तर पहिल्यांदाच कळलं असतं,
कसं वाटतं ते! सगळे माझ्यावरच बोट ठेवतायत…
जणू मीच जगातला एकमेव वाईट मुलगा आहे!”

जय त्याच्या अगदी जवळ येतो. त्याच्या डोळ्यांत प्रचंड प्रामाणिकपणा वीरला सुद्धा जाणवतो.

“विराज … मी नेहमी तुझ्या बाजूला उभा राहिलो आहे.
पण आज एक गोष्ट मी नक्की सांगतो ...या वेळेला तू चुकीचा आहेस आणि हे मान्य करणं हेच तुझं पहिलं पाऊल आहे.”


ते ऐकून विराजस समजून घेण्यापेक्षा अजूनच भडकतो,


"काय चूक?! दारू पिऊन अपघात झाला… हो! मान्य आहे... त्यात तो मुलगा मेला तर नाही ना...?"

ते ऐकून जय त्याचा हात पकडून म्हणत,

“भावा.... बस झालं.....एवढा इगो कशाला?
चूक मोठी आहे.......त्या मुलाचा पाय मोडला आहे…
तिच्या आईचं रडणं ऐकलंयस तू?
तुझ्या चुकीमुळे त्याचं भविष्य डळमळलीत झालंय.....”

वीर पहिल्यांदाच शांत होतो.
त्याच्या नजरेत अपराधी भाव असतात जे जयला सुद्धा जाणवतात...

“चल, आधी त्या मुलाला भेटूया.
मी ड्रायव्हर नाही… तू माझा जिगरी मित्र आहेस.
पण मित्र असलो म्हणून चूक झाल्यावर तुला मोकळं सोडणार नाही.... आणि ह्या परिस्थिती मध्ये तुझी साथ सुद्धा सोडणार नाही..”

ते ऐकून विराजस सुद्धा भावुक होतो....
“तू पण ना…नाही ऐकणार... चल तू म्हणतोस तस करून बघतो...."

ते ऐकून जय हसतो....

“चला आता..... वीरू, सगळ्यात आधी तू सगळ्यापासून पळून जायचं थांबव…जो चूक मान्य करतो... तोच खरा माणूस आणि तिथूनच बदल घडायला सुरुवात होते....”

वीर मान डोळवत शांतपणे कारच्या मागच्या सीटला टेकतो...

आणि त्यांची गाडी हळूच पुढे सरकते..... त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी....


काय वाटत भेटेल का विराजस त्या मुलाला????

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"