Login

फक्त तू... ओढ तुझी भाग सहा

अवनीची एन्ट्री
डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग सहा

मागील भागात आपण पाहिलं कि, जय विराजसला त्या मुलाकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला सांगतो. आता पाहूया पुढे,


जय वीरूची ही जोडी हॉस्पिटलमध्ये पोहचली तेव्हा त्यांना एकदम शांतता जाणवत होती.नर्सच्या चप्पलांचा हलका आवाज, औषधांचा वास, आणि रडारडीचं वातावरण… वीरला सहनच होत नव्हतं. ते दोघे त्या मुलाला ठेवलेल्या वॉर्डच्या बाहेर उभे होते. विराजसचा चेहरा वरून जरी कडक दिसत असला तरी पण आतून तो स्पष्ट घाबरलेला होता... शिवाय त्याला  अजिबात आतमध्ये जाऊन त्या मुलाला भेटायचं नव्हतं. त्यामुळे ते दोघे बाहेर घुटमळत होते.

विराजसने आतमध्ये डोकावलं तर त्याला मुलाचा पाय प्लास्टरमध्ये, आणि त्याची आई रडत बसलेली दिसली तर बाजूला एक मुलगा टेन्शन मध्ये बसलेला दिसला. ते पाहून नकळत त्याला वाईट वाटलं...


“मला आत जायचं नाही… मला नाही पाहवत हे सगळं.”

वीर म्हणाला तस जयने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि त्याची अवस्था पाहून म्हणाला,

" ठीक आहे नको जाऊया, थोडावेळ थांबूया... आणि मग ठरवूया काय करायचं?? "


"जय… हे माझ्यामुळे झालं…”

एवढंच म्हणून तो नजर खाली करतो. जय काही बोलणार तेवढ्यात कॉरिडॉरममधून जोराजोरात पावलांचे आवाज येऊ लागले... जणू प्रचंड रागानं भरलेली एखादी व्यक्ती येत होती.

वीर मागे वळतो इतक्यात तो मागे बघेपर्यंत ती मुलगी त्या मुलाच्या वोर्डमध्ये पोहचली देखील होती.

तिला वॉर्डमध्ये गेल्याबरोबर पडदा अर्धवट लटकलेला दिसला, तशी तिची नजर त्या मुलावर गेली...मॉनिटर, पट्टी डोक्याला बांधलेली, प्लास्टर केलेला पाय आणि त्याच्या चेहऱ्यावर असलेला वेदना पाहून तिचा जीव कासावीस होतो. ती हे सर्व पाहते आणि तिच्या आत साचलेला राग फुटतो.

ती मुलाच्या आईच्या जवळ बसते, हात धरते. ती रागाने थरथरत होती.

“काकू… कोणी केला हा accident???
किती त्रासात आहे सूचित …”


ते ऐकून सुचितच्या आईच्या डोळ्यातून पाणी वाहत
तशी ती मुलगी तिचं सांत्वन करत उभी राहते पण अचानक तिच्या भावनांचा उद्रेक होतो आणि उफाळून बोलते,

"काकू, सांग ना ग??
कोणी केलं हे?
कोण आहे हा माजोरडा?
दारू पिऊन गाडी चालवणारा?
लोकांना उडवणारा असा निर्लज्ज माणूस?”
श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा?."

ते ऐकून वीर एकदमच दचकतो.
अचानकच तो त्याचे पंजे मुठीत घट्ट आवळतो...पण तो काही बोलत नाही... कारण जय त्याला रोखून धरतो.... पण ती मुलगी काही केल्या शांत बसत नव्हती...अजून तावातावाने बोलत राहते,ते पाहून सुचितची आई म्हणते,


"अवनी बाळा शांत हो.... तो जो कुणी होता भला माणूस होता... हा झाली त्याच्याकडून ही चूक अनवधानाने.. पण त्यांनी जबाबदारी घेतली आहे सगळी... त्याचे वडील रोज चौकशी करतात..."


पण अवनी काही ऐकायला तयार नव्हती...


“म्हणजे श्रीमंत बापाच्या अवलादिना वाटतं की पैशात सगळं विकत घेतलं जातं!
चूक केली, आणि वरून माफी न मागता …फक्त बिल भरून देऊन त्यांचा गुन्हा माफ होणार आहे का??? "


ते ऐकूम वीरच्या मुठी आपोआप आवळतात.
तो उत्तर द्यायला तोंड उघडतो, पण जय त्याला शांत राहायला इशारा करतो.
इकडे अवनी अधिक तीव्र आवाजात बोंबलत असते,


“मला एकदा तरी त्या माणसाला भेटू दे…
ज्याने माझ्या मित्राचं आयुष्य असं उद्ध्वस्त केलंय!
मी चांगलाच दणका देईल त्याला.
काय वाटतं असेल त्याला?
पैशात माणसांचा जीवही विकत मिळतो?”


आता मात्र जयला तिथे थांबणे योग्य वाटल नाही, तो खेचत खेचत विरला बाहेर घेऊन येतो.


अवनी आणि विराजसची पुन्हा भेट होईल का??


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"