Login

फक्त तू... ओढ तुझी भाग सात

संचितला अवनी आवडते



डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग सात

मागील भागात आपण अवनीला, ह्या कथेच्या नायिकेला भेटलो. जी संचितची मैत्रीण आहे.. आता पाहूया पुढे...,


संचित एकदम हळू आवाजात तिला म्हणाला,

“अवनी… जाऊ दे ना...मी आता ठीक आहे. त्रास आहे, पण सहन होण्यासारखा आहे... सो चिल...”

अवनी त्याच्याकडे पाहते,

“तू असं का बोलतोयस रे नेहमी?? किती तो समजूतदारपणा... आणि तुझ्यामुळे मी गप्प बसायचं नेहमी.... हेच ठरलेले आहे ना???”

संचित हलकंसं हसून म्हणतो,

“तू एवढी का चिडतेस ते मला माहित आहे…
पण राग करून काय मिळणार आहे सांग बर मला?
हा..! काही दिवस लागतील, पण मी परत जॉबला येईन.
पुन्हा उभा राहीन.”

ते ऐकून अवनीचा राग थोडा उतरतो.
“ते आहेच... पण एवढ्या दिवस मला एकटीला करमणार नाही त्याच काय?? आणि तुला हे असं पडलेले पाहून त्रास होतो...त्यामुळे त्या व्यक्तीची चिड येते.."


" अग हो.... मी आधीपेक्षा ठीक आहे आता तस ही तू माझ्या सोबत आहेस,मग अजून कशाची भीती?”

अवनी हळूच त्याचा हात धरते.

“ठीक आहे…मी नेहमीच माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत असणार पण तू स्वतःची काळजी घेतलीच पाहिजेस.
माझ्यासाठी.”

तस संचित मान हलवतो,

" प्रॉमिस, मी लवकरच बरा होईन.. "


थोडा वेळ शांततेत जातो.
अवनी काही न बोलता उठते.
एकदा संचितकडे पाहते…
तिच्या डोळ्यांत अजूनही काळजी होतीच पण ओठांवर हलकंसं हसू आणून ती म्हणते,


“मी निघते आता काही लागलं तर कॉल कर.... "

असं म्हणून त्याच्या आईचा व भावाचा निरोप घेऊन ती हळूच वॉर्डच्या बाहेर जाते.

संचित तिला जाताना पाहतच राहतो. त्याला तस बघताना पाहून त्याच्या बाजूला उभा असलेला त्याचा धाकटा भाऊ सिद्धेश पुढे येतो.


आणि एकदम हळू आवाजात म्हणतो,,

“दादा…तू अजूनही अवनी दी ला तुझ्या मनातलं सांगत नाहीयस का?”

ते ऐकून संचित क्षणभर शांत राहतो.
आणि मग हलकंसं हसून म्हणतो,

“लवकरच सांगेन ”


“खरंच काय दा..... व्वा म्हणजे अवनी दी माझी लवरच वाहिनी होईल... "

तस ते दोघे एकमेकांना टाळी देतात आणि हसतात... आणि संचित मनातच म्हणतो,

"वेळ आली की नक्की मी अवनीला माझ्या मनातलं सांगेन.... "


संचित सांगू शकेल काय अवनीला?
तिच्या मनात काय असेल??



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"