Login

फक्त तू.....ओढ तुझी... भाग नऊ

जय विराजस ला समजावतो

डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग नऊ


मागील भागात आपण पाहिलं कि वीरला जय समजावतो पण तो त्याच्यावरच भडकतो.. आता पाहूया पुढे...,


जय थोडा वेळ काहीच बोलत नाही. काही वेळ असाच तो जाऊन देतो...पण जेव्हा वीर शांत होतो तेव्हा मात्र जय वीरकडे एकदम मायेने पाहतो....राग तर नव्हताच त्याच्या बद्दल कि त्याच्या विषयी तक्रारही नव्हती जयच्या मनात … फक्त समजुतीने तो त्याला काहीतरी समजावणार होता....जे खूप गरजेचे होते. खरा मित्र तोच जो आपला मित्र चुकत असेल तर कान धरून त्याची चूक दाखवून देणारा.. ना कि त्याच्या चुकीमध्ये साथ देणारा.


जय हळू  आवाजात पण एकदम ठाम आवाजात त्याच्याकडे पाहून म्हणतो,

“वीर… मी तुला आता शांत बसायला सांगतोय,
कारण रागात माणूस आपली सूद बुद घालवून बसतो त्यामुळे तू जे काही बोलशील,ते रागातूनच बोलशील i know …पण मित्रा रागात माणूसकधीच योग्य निर्णय घेत नाही. भावा तू जे पाहिलंस, जे ऐकलंस…
ते त्रासदायक आहे हे मला कळतंय.
पण प्रत्येक वेळी कोणी आपल्याला आरसा दाखवला की आपण त्याच्यावर दगड फेकायचे नसतात. तर त्या आरश्यात आपल्या चुका कश्या सुधारता येतील हे पाहायचं असत.... "

ह्यावर वीर काही बोलणार इतक्यात त्याला थांबवून जयच पुढे म्हणतो,

“भावा, मी तुला हॉटेलची आठवण करून दिली,
कारण मला वाटलं होत आता ते तुझं ध्येय झालं असेल... तुझी चुकी सावरायला ती एक उत्तम संधी आहे. तू त्यातून त्या मुलाला मदत करून आपल्या मनावरच ओझे हलके कर ना... काका काकूंना अभिमान वाटेल असं काहीतरी कर..."

विराजसला विचारात पडलेले पाहून जय थोडा थांबतो...

“वीरू यार... माय जिगर का टुकडा.....मी तुझा दोस्त आहे म्हणूनच सांगतोय...आज जर तू तुझ्या रागाला थांबवलंस ना,तर उद्या तुला स्वतःकडे पाहताना लाज वाटणार नाही. तुझं मला माहित नाही पण मला माझ्या मित्रावर पूर्ण विश्वास आहे.. कि तो एक उत्तम व्यक्ती आहे... फक्त थोडे लाड आडवे येतात...."

एवढं बोलून तो हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. ते पाहून वीर त्याच्याही नकळत बोलून जातो...,

“कदाचित तुझं बरोबर आहे... तसही माझ्या पूज्य पिताश्रीनी माझ्यापुढे काहीच पर्याय ठेवला नाही आहे... चला हॉटेल गाठूया...... कितपत मला जमेल गॉड knows... पण try करायला हरकत नाही... "

तस जय हसतो आणि त्याची पाठ थोपटून ते दोघे गाडीच्या दिशेने चालू लागतात. जयने आधीच हॉटेलचा पत्ता शोधून ठेवून हॉटेलच्या मालकाशी बोलून ठेवलं होत. त्यामुळे त्याबाबतीत विराजस रिलॅक्स होता. जय गाडी चालवत होता तर विराजस गाडीच्या सीटला मागे डोकं टेकवून आईला आठवत होता.....


**********************************


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"