डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग तेरा
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग तेरा
मागील भागात आपण पाहिलं कि, विराजस जॉईन होऊन आतमध्ये प्रवेश करतो आता पाहूया पुढे,
तो वैतागून एप्रन बाजूला ठेवतो आणि जयकडे पाहतो, त्याच्याकडे एकदम चिडून उदगारतो,
“जय,यार मी खरंच सांगतोय…मला ह्यातलं काहीच येत नाही....हे काय आहे रे पांचटपणा नुस्ता? भाज्या चिरा, पातेलं धुवा, त्यावर गर्निश करा…हे सगळं पिचपिचित... हे असल मुलींसारखं काम मी कसं करू, तेच मला समजत नाही!”
जयला त्याला तस बघून खरं तर हसायला येत होत, पण त्याने हे काम मुलीसारखं म्हंटल त्यावर त्याला चिड आली तो हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहून अगदीच शांत आवाजात म्हणाला,
“वीरू,तुझ्या म्हण्याप्रमाणे पैसे उडवणं म्हणजे मर्दानगी,
आणि मेहनत करणं किंवा जेवण बनवणे हे कमीपणाचे... ते काम मुलींचेच हे कोण ठरवणार????"
ते बोलणे जरा वीरला लागत आणि तो पटकन बोलतो,
“अरे भावा.....तसं नाही म्हणत आहे मी…पण मी खर्च सांगतो यार हे माझं जग नाही.मी इथे आलोय तरी का, तेच कळत नाही.... मला..सध्यातरी..”
त्याची परिस्थिती जयला समजत असते तो त्याच्याजवळ जातो,
" मित्र हे तुझं जग’ नसलं तरी काही दिवस तुला ह्याच जगात राहायचं आहे... अहं... नुसतं राहायचं नाही तर इथे जगायचं आहे.... तुझं ते छान जग लिमिटेड होत पण आता इथे तुला actual बाहेर काय असतं ते बघायला मिळेल... तुझ्यातला लपलेला माणूस लवकरच बाहेर येईल...."
त्यावर अजून वीरला काहीही बोलून न देता तोच पुढे म्हणाला,
“आणि एक लक्षात ठेव…
इथे कोण मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे बघत नाहीत...इथे फक्त काम येतं की नाही, ते पाहतात.”
इथे कोण मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे बघत नाहीत...इथे फक्त काम येतं की नाही, ते पाहतात.”
ते ऐकून वीर वैतागून श्वास सोडतो.
“सोपं वाटतं तुला सगळं…... तू फक्त माझी मज्जा घे... तसही दुसरं येत तरी काय तुला???”
तो रागात हातातला चाकू आपटून बोलतो..
" विराजस संजीव कपूर, विकास खन्ना हे टॉप शेफ आहेत हे विसरू नकोस.... "
त्याला हसून दाखवत चिडवत जय बोलला...
"जय, उगाच डोकं खाऊ नकोस.मला आधीच वैताग आलाय!”
त्यावर तो काहीतरी प्रत्युत्तर देणार तेवढ्यात त्यांच्या मागून एक उत्साही, स्पष्ट आवाज येतो.तस ते दोघ त्या दिशेने पाहतात,
“हेय! यु मस्ट बी the न्यू guy.”
एक मुलगी बुटांचा टकटक आवाज करत त्यांच्या दिशेने आली...हसरी चेहऱ्याची,स्वच्छ युनिफॉर्ममध्ये,
तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता आणि चालण्यात पूर्ण प्रोफेशनल ठामपणा दिसत असणारी मीरा त्यांच्यासमोर आली...
तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता आणि चालण्यात पूर्ण प्रोफेशनल ठामपणा दिसत असणारी मीरा त्यांच्यासमोर आली...
पण दोघांना पाहून ती थोडं थांबते,पहिल्यांदा जयकडे पाहते…मग वीरकडे.....क्षणभर तिची नजर वीरवर स्थिरावते...
तो साध्या शर्टमध्ये होता,एप्रन अजून त्याच्या हातातच होता तर केस थोडे विस्कटलेले…पण चेहऱ्यावर एक वेगळाच न समजणारा आत्मविश्वास होता. रागामुळे त्याचे डोळे थोडे तांबूस झालेले होते पण त्याच डोळ्यांत जिद्दही स्पष्ट दिसत होती.
अवनी आणि वीरची भेटू कधी होईल???
**********************************
**********************************
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा