Login

फक्त तू... ओढ तुझी भाग सोळा

वीर मनापासून शिकण्याचा प्रयत्न करतोय


डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग सोळा

मागील भागात आपण पाहिलं कि, मीरा वीरला शिकवत असते आणि तो गोंधळलेला असतो.. आता पाहूया पुढे,


मीरा जमेल तुला अस म्हणाली तस तो हसला....

“बघितलंस ना, जमणार नाही असं काही नसतं. फक्त इच्छा असेल की होतं.”

त्यावर वीरने मान डोळावली आणि तिने पुन्हा त्याला थोडे प्रात्यक्षिक करून दाखवले... ट्रिक्स समजावल्या....ते पाहून यावेळी वीर जरा नीट कप करतो.ते पाहून थोडी इम्प्रेस होतेच नाही म्हंटल तरी....


"हा पटकन शिकेल असं वाटतंय.”

ती मनातच म्हणते आणि त्याच्याकडे पुन्हा पाहत बसते.....तेवढ्यात मागून कडक आवाज येतो,


“मीरा, service सुरू होणार आहे.... वीरला थोडं काम देऊन तू तिकडे जा.....

मॅनेजर निशांतचा आवाज येतो.... तो सगळ्यांचा सीनियर होता त्यामुळे थोडा कडक आणि शिस्तप्रिय देखील त्याला राहावे लागायचे....


“Yeah, कमिंग.... सर ”

निशांतला ती म्हणते आणि वीरकडे पाहून त्याला काही गोष्टी दाखवते व म्हणते,


“Prep चालू ठेव...Overthink नको करू... जमेल तेवढे सगळं कट करून बघ... मी आल्यावर सांगते काय करायचं ते...,"


वीर मान डोळवतो तस ती निघून जाते.... ती गेल्यावर
किचनमध्ये पुन्हा तोच नेहमीचा गडबडलेला गोंधळ सुरू झाला होता..ऑर्डर्स, भांड्यांचे आवाज, कुणाचं कुणाला ऐकू न जात नव्हतं, त्याने नजर फिरवली सगळेच ज्याच्या त्याच्या कामात मग्न होते.एक मोठा श्वास घेऊन तो चॉपिंग बोर्डसमोर उभा राहतो. निर्धार करून हातातला knife तो पुन्हा नीट पकडतो....क्षणभर डोळे मिटतो.

“चलो, वीर…लागा कामाला…”

तो स्वतःशीच पुटपुटतो.

हळूहळू मन लावून तो त्याच काम करत होता, आणि त्याला इंटरेस्ट देखील येत होता.


थोड्या वेळाने निशांत पुन्हा किचनमध्ये फेरी मारतो.
त्याची नजर चॉपिंग बोर्डकडे जाते आणि पर्यायाने विराजसकडे सुद्धा. जो लक्ष देऊन काम करत असतो
हळू, पण नीटनेटके...निशांत क्षणभर थांबतो... आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणतो,


"गुड जॉब, विराजस... पहिल्याच दिवशी तुझा प्रयत्न छान आहे.."

ते ऐकून नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू येत...


" thank you सर... Try करतोय.... "


तो हसून म्हणाला....


निशांत फक्त मान हलवतो.... तो जास्त कौतुक नाही,
पण तेवढंच वीरसाठी पुरेसं असतं... नकळत त्याला आनंद होतो...निशांत पुढे निघून जातो.तस वीर पुन्हा कामाकडे वळतो. यावेळी हातातला चाकू तो अजूनच आत्मविश्वासाने पकडतो...कारण पहिल्यांदाच
कोणीतरी त्याचं कौतुक केल होत...कदाचित मी इथे टिकू शकतो,हा विचार पहिल्यांदाच मनात येतो.... आणि तो पुढच्या कामासाठी वळतो...


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"