Login

फक्त तू... ओढ तुझी... भाग एकवीस

काम करून वीर खूप थकतो
डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग एकवीस

मागील भागात आपण पाहिलं कि, वीर आणि अवनी मध्ये थोडा वाद होतो, तेव्हा अवनी त्याला मुद्दाम साफसफाईच काम देते... आता पाहूया पुढे,


पूर्ण फ्लोअर साफ करताना वीरच्या हातांमधली ताकद हळूहळू कमी होत चालली होती.. आयुष्यात पहिल्यांदा काम केल्यामुळे तो एकदम थकला होता.. पूर्ण शरीरामधून घाम झिरपत होता, त्याची पाठ दुखायला लागली होती, त्यात हात पाय एकदम ओढल्यासारखे त्याला वाटत होते. मॉप पुढे ढकलताना त्याच प्रत्येक पाऊल जड होत होतं. पण तो न थांबता काम करतच होता. ह्यात त्याचा खूप वेळ गेला. पूर्ण फ्लोअर जवळपास साफ झालाच होता कि तेवढ्यात मीरा हळूच त्याच्याजवळ जाते..ती थोडा वेळ काही न बोलता त्याला पाहतच राहते.तिला त्याची खूपच दया येते..

मीरा अगदी हळू आवाजात त्याला म्हणते,

“वीर… जरा थांब.”

मीराला पाहताच वीर मॉप खाली टाकतो
आणि तिथेच त्याचा तोल जाऊन तो खाली बसून घेतो.
त्याची छाती जोरजोरात हलत होती. त्यामुळे श्वास सावरायला देखील त्याला वेळ लागत होता.

“थोडं उरलंय…लवकरच संपवतो,”

तो धापा टाकत म्हणाला...


"सांग तुझ्या मॅमला…तिनेच तुला पाठवलं असेल ना
मी काम करतोय की नाही बघायला?”


हे बोलताना देखील त्याचा श्वास फुलला होता... त्याचा तिरकस स्वर ऐकून तिला वाईट वाटत...ती त्याच्याकडे पाहून म्हणते,


" वीर मला अवनी मॅमने नाही पाठवलं मी स्वतःहून आले कारण मला वाईट वाटलं... "


ती शांतपणे म्हणाली तस वीर तिच्याकडे पाहतो. त्याच्या डोळ्यांत थकवा…आणि मीराबद्दल थोडीशी शंका होती, त्यामुळे तो काहीच बोलला नाही पण ते समजून तिचं पुढे म्हणाली,

“वीर अरे, अवनी मॅम वाईट नाहीयेत. त्या खरंच खूप चांगल्या आहेत…फक्त त्यांच्या कामाबद्दल खूप स्ट्रिक्ट आहेत.”

ती क्षणभर थांबते.... त्याचा हात हातात धरून म्हणते,

“मी, संचित आणि त्या....आम्ही तिघंही खूप चांगले मित्र आहोत.... मी जेवढी त्यांना ओळखते त्या कधी कुणाला स्वतःहून मुद्दाम त्रास देत नाहीत.”


ते ऐकून वीर तिचा हात झटकतो आणि जोरात म्हणतो,


"मग, तुला काय म्हणायचं आहे... मीच काही केल आहे ?? माझ्याबाबतीत वेगळं का वागते ती हिटलर..?"


अवनीला हिटलर वीरने हिटलर म्हंटल तस तिला हसू आलं पण सावरून ती म्हणते,


“तेच मला समजत नाही, वीर.
तुझ्याबाबतीत त्या जरा जास्तच कडक आहेत…
का ते मला खरंच कळत नाही.”

ती थोडी जवळ येते.

“पण एक सांगते.....तू हार मानू नकोस.
त्या तुझी परीक्षा घेत असतील कदाचित.”

ह्यावर वीर डोळे मिटतो....एक दीर्घ श्वास घेतो.

" हम्म....मी प्रयत्न करतोय,"


तो हळू आवाजात म्हणाला....

तस मीरा हलकंसं हसून म्हणाली...

“ते दिसतंय.... "

ती उभी राहते... आणि पुन्हा त्याला म्हणते,

“चल… थोडा आराम कर......मग पुन्हा सुरू कर.”

ते ऐकून वीर मान डोळवतो, हळूहळू उठतो.
मॉप पुन्हा हातात घेतो...... राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी.....



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"