Login

फक्त तू... ओढ तुझी भाग बावीस

वीरला बघून अवनीला आश्चर्य वाटत

डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग बावीस

मागील भागात आपण पाहिलं कि, वीर आणि अवनी मध्ये थोडा वाद होतो, तेव्हा अवनी त्याला मुद्दाम साफसफाईच काम देते...जे काम करून तो खूप थकतो, मीरा त्याला समजावते....आता पाहूया पुढे,


त्या दिवशी एवढं काम पहिल्यांदाच केल्यामुळे वीर पूर्णपणे वैतागून घरी जातो.. त्यांच्या अंगात कसलीच ताकद उरलेली नसते. एवढंच काय त्याच्यात कपडे बदलण्याइतकीही शक्ती राहिली नव्हती..तो तसाच सरळ पलंगावर पडतो आणि डोळे मिटतो…पण डोक्यात अवनीचे शब्द,तिचे वागणे, मीराची काळजी हे सगळं एकाच वेळी फिरत असतं... त्यात भर म्हणून तो तिला का भाव देतोय अस डोक्यात येऊन त्याची चिडचिड होत होती..मी खरंच टिकू शकतो का इथे? हा प्रश्न त्याला सतावत होता... पण थकवा एवढा होता कि तो न जेवताच झोपी गेला....

*******************************


इकडे अवनीला खात्रीच वाटत होती की आजचा दिवस त्याच्यासाठी शेवटचाच असेल..एवढा त्रास,एवढी मेहनत केल्यामुळे आणि एवढा अपमान सहन करून
तो उद्या परत येईल असं तिला अजिबात वाटत नव्हतं.

हा काही जास्त दिवस टिकत नाही...,
ती स्वतःशीच म्हणाली. आणि तो विचार मनात येताच तिला हलकं वाटायला लागल...रात्री खोलीत गेल्यावर
ती निवांतपणे फोन बाजूला ठेवते, खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या शहराकडे पाहते... तिच्या चेहऱ्यावर हसू असत...

चला एक गोंधळ कमी झाला, उद्या तो येणार नाही.

आणि ह्याच आनंदात ती खूप शांत झोपेत जाते.

पण नेहमी आपल्याला वाटत तस थोडं ना घडत...

*******************************

सकाळी स्वादिष्टम हॉटेल अजून पूर्णपणे जागंही झालेलं नव्हतं.. अगदी किचनमध्येही मोजकेच लोक होती.. एवढंच काय पूर्ण लाईट्स देखील लावलेले नव्हते कि
भांडी मांडली नव्हती...काम चालूच होत कि वीर साहेब
ठरलेल्या वेळेपेक्षा जवळजवळ अर्धा तास आधीच हॉटेल मध्ये जातात... त्याच्या डोळ्यांत बघून थकवा अजूनही दिसत होता पण त्याच्या चालण्यात, वागण्यात एक प्रकारचा ठामपणा आला होता..

तो थेट किचन मध्ये जाऊन ऍप्रॉन घालतो आणि prep स्टेशन कडे जातो. आज काहीही झालं तरी पळायचं नाही,
हा विचार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


*******************************

थोड्या वेळाने अवनी किचनमध्ये येते. कालच्या प्रकारामुळे तिला खात्री होती कि, तो आज येणार नाही.
पण आत पाऊल टाकताच तिची नजर चॉपिंग बोर्डकडे जाते…आणि ती तिथेच थबकते. तिची नजर जाते तर तो तिथे उभा होता आणि मनापासून कामात गुंतलेला होता..

क्षणभर तिला विश्वासच बसत नाही.. कि हा आला आहे...


काहीतरी विचार करून ती त्याच्या टेबल जवळ जाते....


ती आता त्याला अजून त्रास देईल का??
वीर ह्यातून काय मार्ग काढेल???


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"