डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग चार
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग चार
मागील भागात आपण पाहिलं कि, विराजसला त्याची आई समजावते. आता पाहूया पुढे,
सकाळच्या वेळी वाड्यात आधी कधी न दिसलेली गडबड होती. एव्हाना विराजस घर सोडतोय ही बातमी क्षणात संपूर्ण घरभर पसरली होती. खाली हॉलमध्ये विराजसचे काका महेंद्र मोहिते पाटील आधीच बसून चहा पित होते.
त्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूतीपेक्षा आनंद जास्त दिसत होता.
विराजसची काकू रेणुका त्यांच्या गेली तस ते हळूच आपल्या पत्नीला म्हणाले,
"रेणू..... पार्टीची तयारी कर... आता दादा अखेर तुटलेच. राज तर गेलाय हातातून…आता तर काय घरातून पण जातोय.... तो कायम घराबाहेरच कसा राहील.. हे मी बघेनच... पण आता प्रॉपर्टीमध्ये आपल्या रोहनला संधी मिळेल .."
ते ऐकून रेणुकाच्या चेहऱ्यावर स्मित पसरले...
“हं… ते होऊ शकतं....विराजस नसेल तर
त्याची जागा रोहन घेईलच.”
त्याची जागा रोहन घेईलच.”
तिकडे रोहन पायऱ्यांवरून उतरत ,आपले तोंड दाबून हसू आवरत खाली येत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं....त्याला झालेला आनंद त्याला स्वतःला ठरवूनही लपवता येत नव्हता....
“मॉम … आता मी खरंच बिझनेस संभाळू शकतो.
विराज दादाला काकाने जेवण बनवायला पाठवलंय म्हणे.... हा... हा.... हा!”
विराज दादाला काकाने जेवण बनवायला पाठवलंय म्हणे.... हा... हा.... हा!”
तो जोरात हसून म्हणाला.... तस त्याच्या आईने रेणुकाने त्याला टाळी देतो म्हंटले.....
“प्रत्येकाला मिळत नाही असं भाग्य.तुझ्या काकांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठीच चांगलाच ठरणार आहे.... त्याच तो काही करो...आपण आपला फायदा बघायचा..... "
एव्हाना विराजस दरवाज्यात पोहचला होता....त्याला बॅग घेऊन येताना पाहून रेणुका मुद्दाम तिला खूप दुःख झालं आहे असं दाखवून ती विराजसच्या जवळ गेली...
“दादा, एवढ्या घाईत राजला तिकडे पाठवणे गरजेचं आहे का... सुखात वाढलेला माझा लेक तिकडे कसा राहील.. "
न येणारे अश्रू पुसत तिने जयंतरावांना विचारले.... ते काही बोलणार तेवढ्यात महेंद्रच म्हणाले,
“जाऊ दे, त्याला अनुभव येऊ दे.
जग बघू दे..... दादा कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही.... पण राज कधी गरज लागली तर कॉल कर... हा काका तुझ्यासाठी धावून येईल... "
जग बघू दे..... दादा कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही.... पण राज कधी गरज लागली तर कॉल कर... हा काका तुझ्यासाठी धावून येईल... "
तस त्याने काकांना मिठी मारली....त्याने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला..... तेव्हा त्याची आई अनुराधा रडत म्हणाली,
“वीरू बाळा, मी काही बोलणार नाही.
फक्त इतकंच सांगेन स्वतःवर विश्वास ठेव.”
फक्त इतकंच सांगेन स्वतःवर विश्वास ठेव.”
ती त्याला बिलगली.
आईच्या मिठीत तो पहिल्यांदा खचल्यासारखा झाला.
त्या क्षणी त्याला जाणवलं....घर सोडणं सोपं नाही…
पण राहणंही शक्य नव्हतं. वडिलांचा कटू असलेला निर्णय
मोडता येणार नाही....
आईच्या मिठीत तो पहिल्यांदा खचल्यासारखा झाला.
त्या क्षणी त्याला जाणवलं....घर सोडणं सोपं नाही…
पण राहणंही शक्य नव्हतं. वडिलांचा कटू असलेला निर्णय
मोडता येणार नाही....
विराजसला जाताना पाहून जयंतरावांनी शांतपणे जाहीर केलं......
“आजपासून विराजस स्वतःचं आयुष्य स्वतः सांभाळेल.”
ते ऐकून रोहनच्या चेहऱ्यावरचा लपलेला आनंद अजूनच वाढला.... पण ते अजून पुढे म्हणाले.....
“ज्याला प्रॉपर्टी हवी असेल,त्याने आधी ती कमवण्याची लायकी दाखवावी.”
हे शब्द ऐकून विराजसला नाही पण त्यांच्या काका काकूंना घामच फुटला... ते विसरले होते जो माणूस स्वतःच्या मुलासोबत असं कठोर वागू शकतो... तो माणूस कुणीही चुकल्यावर त्याची काय गय करेल.....
विराजस बॅग घेऊन मुख्य दाराकडे चालला.
त्याच्या आईने डोळे पुसले तर त्याचे वडील शांत उभे होते....
त्याच्या आईने डोळे पुसले तर त्याचे वडील शांत उभे होते....
तर दारात त्याचा जिवलग सखा जय उभा होता.... त्याची वाट पाहत.......
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा