डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग अकरा
मागील भागात आपण पाहिलं कि वीरला जय समजावून हॉटेलकडे घेऊन जातो....आता पाहूया पुढे...,
"Focus guys…!”
अवनीचा ठाम आवाज संपूर्ण किचनमध्ये घुमतो.
तिला पाहूनच सगळे कामाला लागले होते पण आता मात्र आवाजाने सगळेच शेफ, हेल्पर्स क्षणात अलर्ट झाले.
तिला पाहूनच सगळे कामाला लागले होते पण आता मात्र आवाजाने सगळेच शेफ, हेल्पर्स क्षणात अलर्ट झाले.
“guys थोड्याच वेळात लंच सर्विस सुरू होणार आहे, तेव्हा कोणतीही प्लेट उशिरा जाणार नाही, पण ते करताना कॅलिटी मध्ये compromise होणार नाही हे पाहावे..कोणतीही चूक मला चालणार नाही.”
एवढं म्हणून ती पुढे पुढे चालत राहते आणि सगळीकडे आपली नजर टाकते. क्षणात निरीक्षण करून ती ज्याला त्याला आवाज देऊन बदल करण्यास बोलते...
“वसू temperature चेक कर.... भाजी करपण्याचा smell नको... खूप जास्त शिजवून नकोस कि कच्ची ठेवू नकोस.”
“मिहीर सॉल्ट बॅलन्स ठेवा.... तुमच्याकडून जास्त पडत मीठ....”
“मीरा यार प्लेटिंग क्लीन हवं… मेस्सी नाही.”
सगळ्यांना माहित होत, तिचं बोलणं कडक असलं तरी तिच्याकडून शिकण्यासारखे खूप काही होत. त्यामुळे
कोणीही तिला उलट उत्तर देत नसायचं , कारण ती फक्त ऑर्डर द्यायची नाही तर त्यांच्यातली होऊन ती स्वतः देखील काम करून दाखवायची.
बोलतच असताना ती पुढे जाते, आणि एक डिश चाखते.
टेस्ट करत असतानाच क्षणभर थांबते आणि त्याच्याकडे वळून म्हणते,
टेस्ट करत असतानाच क्षणभर थांबते आणि त्याच्याकडे वळून म्हणते,
“थिस इस गुड अंबर … बट अजून बेटर होऊ शकतं.”
खाऊन ती चमचा बाजूला ठेवते आणि पुन्हा अंबरला म्हणते,
“थोडंसं कमी तेल कर आणि सोबत गर्निश change करून बघ.... फरक तुला स्वतःला जाणवेल....'
ते ऐकून अंबर होकारात मान हलवतो. ती अजून काही बोलणारच तेवढ्यात अवनीच्या कानावर मॅनेजरचा म्हणजे निशांतचा आवाज पडतो,
“मिस अवनी … new trainee आला आहे. तुम्ही प्लीज त्याला सगळं दाखवून द्या... "
एक सुस्कारा टाकत अवनी मान वळवते, तिला नकळत तोच संचितच्या जागेवर आला आहे असच वाटल्यामुळे त्याला न भेटताही तिच्या मनात त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार झाली होती.
“ok सर, आज मीरा त्याला बेसिक प्रिप्रेशन दाखवून देईल.... नंतर मी बघेन...... बर त्याच नाव?”
अवनी निशांतकडे पाहत म्हणाली..
“विराजस "
अवनी क्षणभर ते नाव ऐकून थांबते, पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता मीराला आवाज देते...
“ठीक आहे..... सर.... मीरा त्या न्यू ट्रेनीला आज तू बेसिक सगळं दाखवून दे... "
" ok मॅम... "
मीरा म्हणते तशी ती पुन्हा किचनकडे वळते.
“next ऑर्डर काय आहे अंबर??”
अंबर तिला माहिती देतो आणि किचन पुन्हा धावायला लागतं...भांड्यांचा आवाज, भाज्यांचा सुगंध, आग…मस्त वातावरण झालं होत, पण या गडबडीत
अवनीला अजून माहितही नाहीये...की ज्याला ती “न्यू ट्रेनी ” म्हणून भेटणार आहे,हा तोच मुलगा आहे
ज्याच्यामुळे संचितचा accident झाला आहे... विचार करा तिला समजलं तर काय होईल???
अवनीला अजून माहितही नाहीये...की ज्याला ती “न्यू ट्रेनी ” म्हणून भेटणार आहे,हा तोच मुलगा आहे
ज्याच्यामुळे संचितचा accident झाला आहे... विचार करा तिला समजलं तर काय होईल???
**********************************
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा