संबळ
इथे प्रकाशाच्या आड
मीट्ट काळोखात
कोणी वाजवतो संबळ
त्याला आहे दुःख
की अपार सुख
म्हणून तो वाजवतो संबळ
की अपार सुख
म्हणून तो वाजवतो संबळ
अदृश्य आहे तो
जणू मनात राहतो
मनातल्या भावनांशी
हितगुज करतो
जणू मनात राहतो
मनातल्या भावनांशी
हितगुज करतो
कधी कधी वाटतं
तो दृष्ट राक्षस असावा
तिढा मनाचा वाढवतो
मनावर ताशेरे ओढतो
तो दृष्ट राक्षस असावा
तिढा मनाचा वाढवतो
मनावर ताशेरे ओढतो
कधी कधी वाटे मला
तो देवदूत असावा
नव्या नांदीची खूण देत असावा
नव्या सुरुवातीची खूण
म्हणून वाजवतो संबळ
तो देवदूत असावा
नव्या नांदीची खूण देत असावा
नव्या सुरुवातीची खूण
म्हणून वाजवतो संबळ
.......... योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा