Login

सांगली स्पेशल - लाटी वडी

खमंग मेजवानी
आवडते व्यंजन - लाटी वडी

सांगली मधला हा पारंपारिक पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायलाही सोपा आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे....

साहित्य - एक वाटी गव्हाचे पीठ
एक वाटी बेसन
अर्धा चमचा मीठ
एक चमचा लाल तिखट मसाला
पाव चमचा हळद
मोहन घालण्यासाठी दोन चमचे गरम तेल
पाऊण वाटी पाणी
खसखस

सारणाचे साहित्य - दोन चमचे काळे तीळ
दोन टीस्पून पांढरे तीळ
एक वाटी बारीक केलेला सुख खोबरं
एक चमचा लाल तिखट
एक चमचा गरम मसाला
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ

कृती - गव्हाचे पीठ आणि बेसन एका परातीमध्ये एकत्र करा. त्यात एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद मीठ घालून मिक्स करून घ्या. मोहन केलेला तेल दोन चमचे त्यात घालून ते चांगलं ढवळून घ्या..
थंड झाल्यावर थोडं पाणी घालत पीठ मळून घ्या. महिलेला पीठ वरून सुती कापड ठेवून थोडा वेळासाठी बाजूला ठेवा.

एका कढईत काळे ते पांढरे ते बारीक केलेलं सुकं खोबरं मंद आचेवर परतून घ्या. मग हे तिन्ही पदार्थ मिक्सरला लावून त्याची भरडसर पूड करून घ्या. या सारणात एक चमचा गरम मसाला , एक चमचा लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं मीठ घालून त्याचं छान पैकी सारण तयार करून घ्या.

मळलेल्या पिठाचे थोडे मोठे असे गोळे करून घ्या... त्यापैकी एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटा. घातलेल्या पोळीला एका बाजूने खसखस लावायची आणि पुन्हा एकदा त्याच्यावरून लाटणं फिरवून घ्यायचं त्यामुळे ती खसखस होळीला चांगली चिकटेल.. आता खसखसची बाजू वडीला बाहेरून लागेल अशा प्रकारे पोळी पलटी करा...

खसखस नसलेल्या बाजूला चमच्याने सगळं सारण पसरून घ्या. सारंग व्यवस्थित पसरले की पोळी गोल गुंडाळत जायची आणि बोटाने हलकी दाबत राहायची म्हणजे वडी घट्ट बसते आणि सारण बाहेर पडायचं टेन्शन नाही राहत.. सगळ्या पोळ्या सारणाने भरून झाल्या की सारण बाहेर पडणार नाही अशा अंदाजाने नाजूकपणे कापून घ्या.

कापलेल्या वड्या दहा मिनिटं वाफेवर शिजू द्या वड्या थंड झाल्या की तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या या वड्या चहा सोबत स्नॅक्स म्हणून खायलाही छान वाटतात...