Login

प्रेमासाठी भाग ६

प्रेमासाठी काहीपण


प्रेमासाठी (भाग ६)

मोरपंखी रंगाचा शालू, मोजकेच पण नाजूक दागिने, हलकासा मेकअप ह्या सगळ्यात खुलून दिसणारी नुपूर मामाच्या सोबतीने हळूहळू पावले टाकत लग्नाच्या हाॅलमध्ये आली. नेव्ही ब्लू शेडमध्ये थ्री पिस सूट घालून रितेश देखील आला. दोघांच्या मध्ये अंतरपाट होता पण रितेश आडून आडून नुपूरला बघण्याची पराकष्ठा करत होता. सनईच्या सुरांनी वातावरण मधूर धुंद झाले होते.
" तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रिय स्वरामी |"
भटजींनी मंगलाष्टके म्हंटली आणि रितेश नुपूरचा विवाह संपन्न झाला. त्यांच्यावर अक्षरांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. अंतरपाट बाजूला झाला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. शुभ विवाह संपन्न झाला.

भेटायला येणार्या लोकांची लाईन लागली. दोघे अभिनंदनाचा स्विकार करत होते. दोघांची जोडी खूप छान दिसत होती. जेवणाच्या पंगती उठत होत्या. सगळ्यात शेवटी नवरा नवरी आणि जवळच्या नातेवाईकांच्या पंगत बसली. रितेश आणि नुपूरला एकमेकांना घास भरवून नाव घ्यायचा आग्रह होऊ लागला. " आई बाबांच्या आशिर्वादाने झाली सुरवात
सासू सासर्यांनी केली रूजवात
म्हणून आमच्या जीवनातला दिवस उगवला खास,
रितेशना भरवते रस मलईचा घास. " टाळ्यांचा कडकडाट झाला. " आता रितेश" सगळे एकसुरात ओरडले.

" नुपूर, फक्त नुपूर माझीच आहे खास,
नुपुरशिवाय माझे जीवन म्हणजे वनवास
अहोरात्र फक्त असतो नुपूरचा ध्यास
नुपूरला भरवतो मी जिलब्या घास. " रितेशनी अगदी खास उखाणा घेतला.

नुपूरच्या पाठवणीची तयारी सुरु झाली. बॅगा गाडीजवळ आल्या. नुपूरने ठरवले होते रडायचे नाही, पण आईबाबांना भेटताना आडवलेले अश्रू नताशा गळ्यात पडून रडायला लागल्यावर आवरले नाहीत. साहजिकच होते परत आईबाबांना मिठी मारून नुपूर खूप रडली. " इतके दिवस सावरले आहेस सगळे काही, आताही सगळे नीट सावरशील. आनंदी रहा. सर्वांना आनंदी ठेव. " बाबा म्हणाले.
"सुखी रहा बाळा, रितेशला सर्व सुख दे. सांभाळ सर्वांना. तेही तुला आनंदी ठेवतील. आता रडू नकोस, फक्त हसत रहा. " नेत्रा आई म्हणाली.

गाडी रितेशच्या दारात उभी राहिली. रितेशला आणि नुपूरला ओवाळून आत घेतले. लक्ष्मीच्या पावलांनी नुपूर घरात आली. तिचे तसेच स्वागत झाले. ती आईच्या खोलीत जाताच झटकन झोपून गेली. चार पाच दिवस लग्नाच्या कारणाने खूप दगदग झाली होती आणि जागरणे ही झाली होती. रितेशला मात्र झोप लागत नव्हती, " मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात" अशी त्याची अवस्था झाली होती. कधीतरी झोप लागली. सकाळी लवकर उठून नुपूर तयार झाली. पुजेची तयारी होईपर्यंत रितेशही तयार होऊन आला. नुपूरला पाहून त्याच्या हृदयात समथिंग समथिंग होऊ लागले. निळसर रंगाची नऊवारी साडी, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, नाकात नथ, कपाळावर छान थोडी मोठी टिकली आणि ओठांवर मंद हसू. कुठल्याही मेकपशिवाय छान दिसत होती नुपूर. " सुंदर दिसायला मेकप कशाला हवा, मन सुंदर असले की चेहरा सुंदर दिसतो. " सहज रितेशच्या मनात आले. पूजा आणि संध्याकाळी गोंधळ झाला. स्काय ब्लू कलरची हाफ नेटेड साडी त्यावर स्लिवलेस ब्लाउज, मोकळे सोडलेले केस सुंदर सजून नुपूरला रितेशच्या खोलीत पाठवले. रितेश आधीच खोलीत होता. ती आल्यावर रितेशने तिला घट्ट मिठीत घेतले. हलकेच तिच्या कपाळावर ओठ ठेवले आणि म्हणाला, " खूप दिली आहेस ना? "
"हूम" नुपूर.
" मग झोप निवांत. तसही उद्या लवकर उठावे लागले, सकाळी 7:30 च्या गाडीचे रिझर्व्हेशन आहे. साडेसहा ला तरी घर सोडावे लागेल. प्रवासही खूप होईल. आता झोपू या? " रितेश.
नुपूरने रितेशला गालावर किस केले आणि म्हणाली " हूम. " आणि दोघेही झोपले.

सकाळी उठून आवरून दोघेही रवाना झाले. केरळला पोचल्यावर अतिशय सुंदर अशा हटस् टाईप सूट चे बुकिंग रितेशने केले होते, तिथे गेले आजुबाजूचे निसर्ग सौंदर्य वर्णनातीत होते. नुपूर ते पाहून भान हरवत होती. हटमध्ये प्रशस्त रूम होती. साईडला बेड, बेडसमोर मोठा टिव्ही, एका बाजूला प्रशस्त सोफा, छोटासा फ्रिज आणि सोबतीला तिचा आणि फक्त तिचाच रितेश. गरम गरम पाण्याने फ्रेश होऊन नुपूर आली. तिने लाईट यलो गाऊन घातला होता. आणि केस विंचरत होती. रितेशचा तर कलीजा खलास झाला. त्याने मागून तिला मिठी मारली आणि तिच्या मानेवर किस केले. " Love you sona. \" रितेश.

"I love you, पण आज एकदम शोना? " नुपूर.
" खूप आधीपासून, अगदी तुझ्यावर प्रेम करायला लागलो ना, तेव्हापासून म्हणत होतो तुला, फक्त मनात. आता म्हणायला हरकत नाही. मी तुझे नावच सोना ठेवणार होतो, पण तुझ्या आईवडिलांनी इतके सुंदर नाव ठेवलयं, मग नाही बदलले. " रितेश.
तिला स्वतः समोर करून त्याने तिच्या ओठांवर किस केले. तिही त्याच्या ओठात विरघळून गेली. " तुझ्या ओठांचे गुलाबजाम, गुलाबजाम पेक्षाही गोड आहेत" रितेश म्हणाला तसे नुपूरने लाजून खाली बघितले.
" जा लवकर फ्रेश होऊन ये. जेवायला जाऊ मला खूप भूक लागलीय." नुपूर म्हणाली.
रितेश दहा मिनिटात फ्रेश होऊन आला आणि दोघे जेवायला गेले आणि तिथूनच साईट बघायला गेले. रात्री उशिरा साईट बघून परत आल्यावर दोघेही दमणुकीने झोपून गेले. सकाळी उठल्यावर दोघेही परत फ्रेश झाले. आज नुपूरने ब्लॅक कलरचा गुढ्या पर्यंतचा वनपीस घातला होता. ती सुंदरच दिसत होती. तिला मिठीत घ्यायला रितेश आसुसलेले होता. तो उठून तिला मिठीत घेणार एवढ्यात नुपूरने त्याला आडवले आणि म्हणाली " आधी फ्रेश होऊन ये. " आणि पळाली. बिचारा फ्रेश व्हायला गेला. जाताना कपडे नेलेच नाहीत आणि मुद्दाम नुपूरने टाकवे मागितला. टॉवेल देताना नुपूरला आत ओढून घेतले आणि आपल्या मिठीत घेतले. वर गरम पाण्याचा शारीरिक सुरू होता. दोघेही एकमेकाच्या मिठीत विरघळून गेले.

रात्री लवकरच आले आणि छान गप्पा मारत बसले. रितेश सांगत होता, " लहानपणी अशा काही घटना घडल्या की अभ्यासापेक्षा इतर गोष्टींचा माणसाची हुशारी दिसून येते असे वाटायचे. मी आणि माझा आत्तेभाऊ साधारण एकाच वयाचे, तो बडबड्या, खेळात हुशार आणि अतिशय सुंदर काम करायचा नाटकांमध्ये. दरवर्षी त्याला बक्षीस मिळायचे. मग सतत माझी आणि त्याची तुलना व्हायची. सगळे कौतुक करायचे त्याचे. मी खूप हुशार होतो अस नाही. पण अभ्यासातून लक्षच उडाले. अभ्यासच करायचो नाही मी. कसातरी पास व्हायचो इतकच. पण दहावीला मात्र केला अभ्यास. त्याने नववी दहावीला नाटक सोडले आणि तो अभ्यासात लक्ष देऊ लागला. इंजिनिअर झाला. मी मात्र काहीच नीट केले नाही. "

" परत नको अस बोलू रितेश. तू शिकला नसलास तरी काय झाले, तू पण खूप काही मिळवले आहेस. छान बिझनेस सांभाळतो आहेस. आणखी काय हवे? शिक्षणावरच सर्व काही नसते रितेश. " नुपूर.

" खरतरं मला प्लेगने केरळला आणायचे होते. पण मला कसे परवडणार? मला माहिती आहे तू समजुन घेशील. पण जेव्हा जमेल तेव्हा मी तुला घेऊन प्लेनने पुन्हा एकदा केरळला येणार आहे. चालेल ना? ". रितेश म्हणाल्यावर नुपूर हो म्हणत त्याच्या मिठीत शिरली. रितेशनी हलकेच तिच्या ओठांवर ओठ ठेवले. दोघेही एकमेकांना प्रतिसाद देत होते. रितेश चे हात तिच्या कमनीय देहावर फिरू लागले. अतिशय आवेगाने तो तिला कीस करत होता. सगळे अडसर दूर झाले आणि दोन प्रेमवेडे शरीरानेही एकरूप झाले.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
0

🎭 Series Post

View all