पण ती एका सरकारी कारकुनाची (त्यांच्या बरोबरीत न बसणारी किंवा त्यांच्या घराण्याला न शोभणारी) मुलगी दिपकच्या घरच्यांना नको होती. कारण दिपकच्या आईची तब्येत सतत खराब असायची. म्हणजे दिपकची बायकोच पुढे सर्व कारभार पाहणार. त्या अठरा वर्षाच्या सुनीताला हा एवढा मोठा व्याप सांभाळता येईल का? दुसरी गोष्ट इतकी संपत्ती, मोठे घरदार पाहून तिचे हात पाय ती चालवेल का? कारण बऱ्याच मुलींची मानसिकता असते की घरात इतकं सगळं असल्यावर मी कशाला काही करावं.
त्यांच्या नातेवाईकातील एका घरी असेच झाले होते. गरीब घरची मुलगी चांगल्याने साथ देईल म्हणून लग्न करून आणली. तिने मात्र घरातील सर्व कामांना मोलकरीण लावली. इतकेच काय तिने नवऱ्याच्या व्यवसायात हातभार लावायलाही नकार दिला. दिवसभर फक्त नवनवीन कपड्यांची खरीदारी, टीव्ही, मोबाईल, किटी पार्टी यातच ती व्यस्त असे. मुलांकडेही लक्ष देण्यात तिची फार रुची नव्हती. हे सगळं दिपकही पाहून होता. पण त्याचे म्हणणे की सर्वच मुली एकसारख्या निघत नाहीत. ही मला वेगळी वाटली. ती नक्की माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबतीने आपल्या घराण्याच्या भरभराटीला हातभार लावणार.
सत्तावीस वर्षाचा दिपक काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी मुलगा हातातून जाऊ नये म्हणून त्याच्या घरच्यांनी दिपक व सुनिताचे थाटामाटात लग्न लावून दिले.
लग्नाच्या पहिल्याच रात्री दिपकने सुनिताला सर्व परिस्थिती सांगितली व काहीही करण्या आधी कोणी दुखावणार नाही हे लक्षात ठेवायला सांगितले. तिही भान ठेवून वागू लागली. घरातील मोठ्यांना विचारून त्यांना हवे नको याकडे लक्ष देऊ लागली. हळूहळू ती त्यांच्या मनात बसू लागली. लग्नाला चार महिने पुर्ण झाले नाही तो सुनिताने गोड बातमी दिली. घरात आनंदी आनंद झाला. नात नातू, जेही होणार त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. मात्र त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. सुनिताला तिसरा महीना लागला. कोणाच्या ध्यानी मनी नसतांना आपोआप तिचा गर्भपात झाला. तिला दोष देण्याऐवजी त्या देव माणसांनी, कधीकधी होतं असं मुलीचं लहान वय असलं की असं तिलाच समजावून सांगत तिचे सांत्वन केले.
पुढे काही दिवसात सुनिताचे रिपोर्ट आले. तेव्हा दुसरीच गोष्ट समोर आली. रिपोर्ट नुसार तिचा गर्भपात थायरॉईडमुळे झाला आहे तसेच थायरॉईड तिला खूप आधीपासून आहे. सांत्वनेची जागा तिरस्काराने घेतली.
सुनितावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. प्रश्न थायरॉईडचा नव्हता तर प्रश्न थायराॅइडमुळे गेलेल्या बाळाचा होता, प्रश्न सुनिताने तिला थायराॅइड आहे हे लपवल्याचा, दिपक ज्याने सर्वांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न केले त्यालाही ही गोष्ट सांगितल्या गेली नाही याचा होता.
सुनितावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. प्रश्न थायरॉईडचा नव्हता तर प्रश्न थायराॅइडमुळे गेलेल्या बाळाचा होता, प्रश्न सुनिताने तिला थायराॅइड आहे हे लपवल्याचा, दिपक ज्याने सर्वांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न केले त्यालाही ही गोष्ट सांगितल्या गेली नाही याचा होता.
सर्वांच्या दबावाने बिचारी सुनिता तुटली. तिने कबूल केले कि तिला वयाच्या पंधराव्या वर्षांपासूनच थायराॅइडचा त्रास सुरू झालेला. आपल्या लाडकीला हे काय झालं म्हणून गणेशराव, तिचे वडील कोसळलेच. तेव्हा डाॅक्टरांनी त्यांना समजावून सांगितलं होतं,
"तसा थायराॅइड काही गंभीर आजार नाही. व्यवस्थित औषधपाण्याने थायराॅइडला नियंत्रणात ठेवावे लागेल एवढंच. तसेच गर्भारपणात थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा