चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025
लघुकथा-आज कालच्या मुली
माधुरी ताई आज सकाळी निवांत, अंगणातल्या जिन्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या होत्या. शेजारची मीनल फाटक उघडून आत आली. आणि जास्वंदाची फुले गणपतीला वहायला म्हणून तोडू लागली.
"काकू! ही फुले घेते मी देवाला वाहायला"
"अगं घे की! मीनल ,तुझ्या लग्नाला पंधरा दिवस राहिलेत ना ?
"अगं घे की! मीनल ,तुझ्या लग्नाला पंधरा दिवस राहिलेत ना ?
"हो काकू! जाम धावपळ चालली आहे. लग्नाची बरीच कामे खोळंबली आहेत.एक एक काम निस्तरणं चालू आहे."
"तू इथून बंगळूर ला जाणार... जॉब करणार आहेस का"?
"अहो काकू ,जॉब करणारच आहे मी. मंदारच्या कंपनीत त्याला, सलग आठ-बारा तास काम असते. त्यामुळे मी घरात राहून काय करू? सोबत त्याचे आई वडील आहेत. पण त्या म्हातांऱ्या बरोबर मी नाही राहू शकत दिवसभर."
"का ग! आजकाल सासू-सासरे एवढेही म्हातारे नसतात".
"तेच तर !माझी सासू करेल की घरची पूर्ण कामे."
"तेच तर !माझी सासू करेल की घरची पूर्ण कामे."
अजून लग्नही झाले नाही, तर सासू-सासर्यांना म्हातारा, म्हातारी म्हणणे आणि सासू कडून पूर्ण कामे करवून घेण्याची वृत्ती ठेवणे, उच्च शिक्षणाने हेच संस्कार केलेत.
फार न बोलता पायऱ्यांवरून उठून त्या घरात आल्या. या पोरी चार पैसे काय कमवतात, इतर माणसं यांच्यापुढे अगदी तुच्छ... त्या स्वतःशीच पुटपुटल्या.
माधुरी ताईंकडे सुद्धा वेगळी परिस्थिती नव्हती. त्यांची सून स्वतःचं व तिच्या नवऱ्याचं आटपून लगेच ऑफिसची तयारी करायची. राहिलेली रोजची  कामे  त्यांच्या वाटेला यायची. उरलेल्या चपात्या करणे, ओटा स्वच्छ करणे, कामवालीला भांडी देणे, इतर अनेक कामे त्यांनीच करायची...
"माधुरी ताई आहात का घरात"? शेजारच्या दुर्गा मावशी आत आल्या.
माधुरी ताईंनी हातची कामे बाजूला ठेवून दुर्गा मावशींना विचारलं.
"कसं काय आलात हो? या बसा".
"अहो ताई ,माझ्या सुनेचं प्रमोशन झालं. तिच्या ऑफिसमध्ये फक्त तिलाच बढती मिळाली. तिचा पगार सुद्धा वाढणार बहुतेक. म्हणून तुमचं तोंड गोड करायला आले. घ्या की पेढे"!

"हो का! तुमची सून पूजा ,आहेच तशी गुणाची, हुशार".
"हो, ती आहेच म्हणा! पण एक सांगू का! तुमच्याजवळ मन मोकळं करते बघा".
"हो, ती आहेच म्हणा! पण एक सांगू का! तुमच्याजवळ मन मोकळं करते बघा".
माधुरी ताईंनी हातात घेतलेली कपडे धुण्याची बादली, तशीच खाली ठेवली. काय झालं दुर्गा मावशी?
"अहो! माझी सून ,ही आनंदाची बातमी सांगायला काल ऑफिसमधून परस्पर तिच्या आईकडे गेली. तिथेच आई-बाबांना पेढे देऊन, नंतर  शरदला ही बातमी सांगितली" .
"मी म्हणते ,नको सांगू मला. पण आधी नवऱ्याला सांगून आनंद नको का साजरा करायला!
त्यालाही ते थोडं खटकलच. पण त्याने नाराजी दर्शविली नाही. तिला म्हटले, देवा पुढे ठेव पेढा. तर म्हणते कशी आईकडे ठेवला देवापुढे .इथे कशाला ठेवायचा"?

माधुरी ताई आणि दुर्गा मावशी दोघेही अस्वस्थ झाल्यात.
त्यांना सकाळचा मीनल सोबत घडलेला संवाद आठवला. सासू सासरे यांना इतके परके वाटतात का? मुलांची लग्ने झालीत की,आपण अगदी म्हातारे झालोत यांच्यासाठी .आपल्याला काहीच भावना नाहीत का?
दुर्गा मावशी म्हणाल्या, "सासू-सासरे म्हणजे या मुलींना ओझं वाटतं का हो"?
दुर्गा मावशी म्हणाल्या, "सासू-सासरे म्हणजे या मुलींना ओझं वाटतं का हो"?
"हो ना! नोकरी करून अर्थार्जन करणं केव्हाही चांगलं. पण लग्नानंतर नवीन नाती जोडली जातात. त्या नात्यांचा आदर करायला यांना कोण शिकविणार?
दुर्गा मावशी सुद्धा विचारात पडल्या.
"काकू! माझी आई आहे का तुमच्याकडे?
"हो आहे! काय म्हणतोस शरद"?
दुर्गा मावशी म्हणाल्या ,"आज कसा काय लवकर आला शरद"?
"अगं तुझ्या सुनेने, आपल्या घरी आज पार्टी ठेवली. प्रमोशनचं सेलिब्रेशन करायचं आहे. चल लवकर तयारी करू लागायला." काकू! या बरं कां सायंकाळी पार्टीला."

"हो हो येणार की"! माधुरी ताईंनी कसं बसं हास्य ओठावर आणलं.
सकाळच्या मीनल सोबत झालेल्या संवादाने, त्यांचं मन जड झालेलं होतंच. सायंकाळी बाहेर थोडं फिरून आल्यावर त्या तिच्याकडे गेल्या.
"काय मीनल ची आई! झाली का लग्नाची तयारी?
"काय मीनल ची आई! झाली का लग्नाची तयारी?
"या ना माधुरीताई, बसा. चहा घेणार का?
"नको आताच झालाय".
"नको आताच झालाय".
"अहो माधुरी ताई !काय सांगू ,या आज कालच्या मुली ...जराही आई-वडिलांचं ऐकायला तयार नसतात. या मुलींचं वागणं पाहिलं की काय बरोबर आहे, काय चूक काहीच कळेनासं होतं बघा.
लग्नात वापरावयाच्या सर्व वस्तूंची खरेदी तिच्याच मनासारखी झाली. तरीही तिला पैसे कमी पडतात .मला वाटते, आम्ही हिला एकुलती एक म्हणून लाडात वाढवली हेच चुकलं आमचं".
लग्नात वापरावयाच्या सर्व वस्तूंची खरेदी तिच्याच मनासारखी झाली. तरीही तिला पैसे कमी पडतात .मला वाटते, आम्ही हिला एकुलती एक म्हणून लाडात वाढवली हेच चुकलं आमचं".
  "आयुष्य जगण्याची तिची कल्पनाच वेगळी आहे.तिच्या मते, सगळी कामे पैशाने होतात. आपण जे रांधा ,वाढा, उष्टी काढा केलंय, हेच चुकलं आपलं ...सतत फोनवर, होणाऱ्या नवऱ्याशी संवाद चालू असतो. घरात तर अजिबात लक्ष नाही तिचं".
माधुरी ताईंनी ,मीनलच्या आईला धीर दिला. त्या म्हणाल्या, "मी समजाविते तिला".
"काय समजावणार ताई !समजावण्याचा पलीकडे गेलेली आहे ही आजची पिढी. ती तर म्हणते, "मी माझ्या सासू-सासर्यांसाठी माझ्या आयुष्याची दहा वर्षे का वाया घालवू"?
दोघेही दररोज कंपनीत काम करून थकून जाऊ. तेव्हा मस्त आठवड्याच्या शेवटी मजा करू".
दोघेही दररोज कंपनीत काम करून थकून जाऊ. तेव्हा मस्त आठवड्याच्या शेवटी मजा करू".
माधुरी ताईंनी डोक्यावरच हात मारला. या पिढीला कसं समजत नाही, नात्यात 'आपुलकी' या शब्दाचा रुजवा व्हावा लागतो. नवीन नातं जोडताना बंध पण जोडावे लागतात. ह्या मुली कुटुंबातून फक्त मुलगा  'वेचून' काढतात. यांना कुटुंबा च्या मायेची ,रेशमी धाग्यांची शाल पांघरायला नको.
हे सगळं ऐकून त्या  खिन्न मनाने घरी परतल्या.
माधुरीताईंचं विचार चक्र पुन्हा सुरू झालं. 
आज कालच्या मुलींना, समजूतदारपणा शिकवायला कुटुंबात कुणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावी लागते.
सासू-सासर्यांना म्हातारी, म्हातारा म्हणू नकोस असं सांगणारी मावशी हवी.
बाहेर जाताना, कुठे जाते? फार वेळ लावू नकोस. अशी म्हणणारी आत्या हवी.
बारीकशा कारणांवरून अहंकार दुखावून घेऊ नये. असे सांगणारी काकू हवी.
प्रमोशन मिळाल्यावर आधी सासरी जा म्हणणारी समंजस आई हवी.

आपल्या सासूने पूर्ण कामे करावीत ही अपेक्षा ठेवताना, आपली भावजय सुद्धा आईशी कशी वागते हे ध्यानात घ्यायला हवे .
असे झाले तर.....
समज गैरसमजाच्या चक्रव्यूहात कुणीही गुरफटल्या जाणार नाही, एवढे मात्र खरे!
समज गैरसमजाच्या चक्रव्यूहात कुणीही गुरफटल्या जाणार नाही, एवढे मात्र खरे!
समाप्त
छाया राऊत अमरावती
छाया राऊत अमरावती
टीम-सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा