" रोहन,हा घे डबा. वेळेवर खा हं बाळा. उष्टे पाडू नकोस.पूर्ण फिनिश करायचं बरं का!”
" हो गं आई. मी करेन सर्व फिनिश. डोन्ट वरी."
" माझं शहाणं गुणी बाळ. स्कूलबॅग भरलीस ना नीट?"
संगीता रोहनला विचारत होती.
संगीता रोहनला विचारत होती.
" अगं संगीता तो लहान आहे अजून. तूच त्याचे सर्व सामान नीट बॅगमध्ये टाकून द्यायचे ना? सारखं काय रोज त्याला विचारतेस? तू करायचं त्याचं सगळ,तेही जातीने लक्ष देऊन. समजलं?"
" अरे गिरीश, मी त्याला चांगल्या सवयी आतापासूनच लागाव्या म्हणून समजावून सांगत होते."
" ए बास कर.. माझ्यापुढे अशी मान वर करून बोलायचं नाही,गुपचूप ऐकून त्यानुसार वागायचं.चल निघ इथून! आवर त्याचं लवकर. काय बघतेस गं माझ्याकडे? चल डबा आण माझा."पुरुषी अहंकाराने उन्मत्त होत गिरीश बोलत होता.
" हो,हो आणते."संगीता घाबरतच किचन मध्ये गेली आणि गिरीशचा डबा आणला.
गिरीश रोहनला घेऊन निघाला.कारमध्ये बसला.कार भरधाव निघाली.
गिरीश रागातच बोलला,“आधीच ऑफिसला उशीर झालाय आणि त्यात ही संगीता रोज डोकं लावते,कधी माझ्यासोबत,कधी तुझ्यासोबत.हो ना?”
“हो पण बाबा,आई हे सगळं आपल्या चांगल्यासाठी सांगतेय ना..” छोटा रोहन म्हणाला.
“ हो का? आईचा चमचा!शाळा आली बघ.इतक्या जवळ असूनही रोज मला सोडावं लागतं तुला शाळेत..जरा म्हणून जबाबदारी नको असते संगीताला.. उतर खाली लवकर..”गिरीश
बिचारा रोहन! चांगलं काय आणि वाईट काय हे समजत असूनही आई चांगली की बाबा चांगले या द्वंद्वात उगाचच अडकला.इवल्याशा मनाला विचारांच्या कंगोऱ्यांनी घेरले अन् त्यातून कसाबसा सावरत तो आपल्या क्लासच्या प्रेयरच्या रांगेत उभा राहिला.
इकडे संगीताच्या नावाने खडे फोडत,तिच्याविषयी एकटाच बडबड करत गिरीश कार चालवत होता.
तेवढ्यात सिग्नल लागले.गिरीशने गाडी थांबवली.टाळ्या वाजवत एक तृतीयपंथी त्याच्या गाडीच्या खिडकीजवळ आला.
तेवढ्यात सिग्नल लागले.गिरीशने गाडी थांबवली.टाळ्या वाजवत एक तृतीयपंथी त्याच्या गाडीच्या खिडकीजवळ आला.
“तुम्हाला काही कामच नाही. जरा गाडी दिसली की येतात लगेच पैसे मागायला.हे घे १० रुपये.”गिरीश
“ साहेब,फुकट घेणार नाही.हा घ्या पेन,लांबच लांब आणि टिकाऊ.”
“ पेन घेऊन करू काय मी? आजकाल सगळं मोबाईल वरच काम होतं. पेनचा वापरच कमी झालाय.तुमची इज्जत तर नाहीच समाजात, कारण कवडीची अक्कल नाही ना तुमच्या डोक्यात!पुरुष असून बाईच्या कपड्यात मिरवायचे आणि स्वतःला अर्धनारी नटेश्वर म्हणवून आशीर्वाद द्यायचं नाटक करायचं. महिला कितीही शिकल्या तरीही कोलकाता आणि बदलापूरची कहाणी रिपीट करायला आमच्यासारख्या पुरुषांना वेळ लागणार नाही.समजलं? म्हणून पुरुष म्हणून समाजात वावरा आणि स्वतःची मर्दानगी दाखवा. डोकं लावून पैसे कमवा, खरा मर्द बनून समजलं? दे ते १० रूपये परत.चल सरक, ग्रीन सिग्नल लागलंय आता.”
प्रभा नावाची ती तृतीयपंथी गिरीशचा उद्दामपणा पाहून फार व्यथित झाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा