एवढे लांछनास्पद बोलून गिरीशने रागातच आपला बेल्ट काढला आणि तो संगीताला मारणार तोच मागून कोणीतरी त्याचा हात पकडला.त्याने चमकून मागे पाहिले.कोणीतरी बाई होती ती..
“कोण तुम्ही?”गिरीश
“ मी ऍडव्होकेट दिशा जाधव.खरं तर एक तृतीयपंथी अर्धनारीनटेश्वर कम ऍडव्होकेट.”
तेवढ्यात प्रज्ञादेखील टाळ्या वाजवत त्याच्या समोर आली.
तेवढ्यात प्रज्ञादेखील टाळ्या वाजवत त्याच्या समोर आली.
“ अच्छा! हे षडयंत्र तुझे आहे होय?” गिरीशने अत्यंत रागाने प्रज्ञाकडे पाहिले.
तेवढ्यात त्या ऍडव्होकेट बाईंनी त्याच्या एक जोरदार कानशिलात लगावली.तो खाली कोसळला.त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले.तो वर पाहू लागला तरीही त्याला अंधुक दिसू लागले.
“ओह!सॉरी हं.मी एक स्त्री नाही तर तृतीयपंथी स्त्री असूनही किती जोरदार लगावली ना तुझ्या कानशिलात? पण काय करणार?त्याशिवाय तुला एका स्त्रीची ताकद कशी कळाली असती? एक लक्षात ठेव, तुम्हा पुरुषांची मर्दानगी आम्हा स्त्रियांपुढे नेहमीच फिकी आहे आणि राहणार ..”ऍडव्होकेट
जखमी अवस्थेत असूनही गिरीश म्हणाला,
“ खोटं बोलत आहात तुम्ही सगळे! तृतीयपंथी कधी ऍडव्होकेट बनू शकतात का?”
जखमी अवस्थेत असूनही गिरीश म्हणाला,
“ खोटं बोलत आहात तुम्ही सगळे! तृतीयपंथी कधी ऍडव्होकेट बनू शकतात का?”
“हा घे पुरावा.सरकारने केव्हाच आम्हाला शिक्षणाचा हक्क बहाल केला आहे.त्यामुळे स्त्री जातीपासून तसेच तृतीयपंथी लोकांपासून जरा लांबच राहायचं.”ऍडव्होकेट
प्रचंड वेदना होत असल्याने गिरीश शांत होता.
“संगीता तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस?”प्रज्ञा
“ हो.”संगीता
गिरीशने हे सारे तुटकपणे ऐकले.
"अगं संगीता, ऐक माझं .असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. माझे आयुष्य बरबाद होईल. प्लीज मला सोडून जाऊ नको."गिरीश वेदनेने विव्हळत म्हणाला.
"हा विचार तू मला वाईट वागणूक देण्याआधी करायला हवा होता.चल रोहन."संगीता
गिरीश आपल्या वाईट कृत्याची शिक्षा भोगत एकटाच त्या घरात विव्हळत होता.
नंतर संगीताने छान जॉब शोधला. तिच्या आई-वडिलांना या साऱ्या गोष्टी समजल्या , तेव्हा त्यांनीही तिला धीर दिला, तसेच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे सांगितले.
संगीताने प्रत्यक्ष भेटून प्रज्ञा आणि ऍडव्होकेट दिशा यांचे खूप आभार मानले. ऍडव्होकेट दिशा म्हणाल्या,
“ संगीता, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. प्रज्ञाने शिताफीने गिरीशच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्याची तुझ्यासोबत असलेली वागणूक प्रत्यक्ष पाहिली.एक तृतीयपंथी असुनही प्रज्ञाने तुला तुझ्या नवऱ्याच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरंच खूप थोर आहेत.स्त्री कधीही अबला नसून नेहमीच सबला राहायला हवी असे मला प्रांजळपणे वाटते.त्यामुळे गिरीशसारख्या उन्मत्त हुकूमशहा असणाऱ्या लोकांना वेळीच धडा दिला गेला पाहिजे. होय ना?”

संगीता त्यांच्या गळ्यात पडली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
प्रज्ञा तिला म्हणाली,
“ आता तुझ्या आयुष्याचे नवे सूर शोध आणि त्या दिशेने मार्गस्थ हो.”
प्रज्ञा तिला म्हणाली,
“ आता तुझ्या आयुष्याचे नवे सूर शोध आणि त्या दिशेने मार्गस्थ हो.”
आपला छंद, आवड,आनंद शोधून संगीता आपल्या लाडक्या रोहनसोबत मुक्तछंद आयुष्य जगू लागली; कारण आयुष्यातील आनंदाचे सूर तिला नव्याने गवसले होते.
पुरुष असूनही स्त्रीचे औदार्य लीलया पेलणाऱ्या तृतीयपंथी महिलांनी,संगीताच्या आयुष्याचे नवे सूर गवसण्यासाठी मैलाचे दगड म्हणून कार्य केले आणि ते सुफळसंपुर्ण केले.
पुरुष असूनही स्त्रीचे औदार्य लीलया पेलणाऱ्या तृतीयपंथी महिलांनी,संगीताच्या आयुष्याचे नवे सूर गवसण्यासाठी मैलाचे दगड म्हणून कार्य केले आणि ते सुफळसंपुर्ण केले.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे